शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपने लक्ष्मणरेषा ओलांडली, गुंता झाला!

By shrimant mane | Published: June 05, 2024 9:43 AM

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: पेच मतदारांची मने जिंकण्याचा नाही तर पक्षीय राजकारणातील डावपेचाच्या मर्यादांचा! 

 - श्रीमंत माने, (संपादक, लोकमत, नागपूर)

भारतीय जनता पक्ष व काँग्रेसचा आलटून-पालटून बालेकिल्ला असलेल्या विदर्भात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, तसेच यशोमती ठाकूर व सुनील केदार यांनी प्रतिष्ठेच्या जागा जिंकल्या. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दणका बसला. विदर्भात फासे उलटे पडले. नितीन गडकरींसारखा कर्तबगार चेहरा असूनही नागपुरातील मताधिक्य घसरले, सुधीर मुनगंटीवारांना बळेच घोड्यावर बसविणे अंगलट आले. प्रतिष्ठेची रामटेकची जागा गेली. पक्षसहकाऱ्यांचा रोष पत्करून नवनीत राणा यांना अमरावतीच्या उमेदवारीचा जुगार उलटा पडला. खानदेशातील जळगाव, रावेरने लाज राखली. अकोल्याने दिलासा दिला, तरी  तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे आव्हान भाजपसाठी आता अधिक कडवे बनले आहे. 

भाजपपुढील पेच मतदारांची मने जिंकण्याचा नाही तर पक्षीय राजकारणातील डावपेचाच्या मर्यादांचा आहे. फडणवीस-बावनकुळे ही जोडी इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर इतके काही करीत गेली, की एका क्षणी त्यातून काही कळूच नये इतका त्याचा गुंता झाला. एक गाठ सोडवायला गेले की दुसरी आपोआप बसू लागली. जागावाटपाच्या पुढे जाऊन कथित सर्व्हेचे कारण देत मित्रपक्षांचे उमेदवार ठरविणे, उमेदवार नसेल तिथे तो उपलब्ध करणे, त्यांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन हातात ठेवणे, हे सारे आघाडीच्या राजकारणातील लक्ष्मणरेषा ओलांडणे होते. तसे झाल्याने रामटेक, परभणी, उस्मानाबादच्या जागा गेल्या. मतदारांना हे एकाच पक्षाचे व त्यातील निवडक नेत्यांचे इतके नियंत्रण खरेच रुचते का, याचा आता विचार करावा लागेल. 

या गुंत्याला आणखी मोठा, राज्यव्यापी कंगोरा आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे विधानसभेतील सर्वाधिक जागांचा भाजप सत्तेवर आला. लोकसभा निवडणुकीत सत्तेची मदत झाली, हे खरे. परंतु, ही फोडाफोडी मतदारांना आवडली नाही. खापर भाजपवर फुटले. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती तयार झाली. तिचा फटका बसू नये म्हणून महापालिका, जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. सगळीकडे प्रशासकीय राजवट आली. त्यामुळे निवडणूक व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाच्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले गेले. सामान्यांची कामे होईनात व त्यांच्या तक्रारी ऐकण्याची, सोडविण्याची व्यवस्था माजी नगरसेवक, जि. प. सदस्यांकडे नाही. त्या रागाचा सामना लोकसभेच्या उमेदवारांना करावा लागला. आता लोकसभेच्या निकालानंतर लगेच त्या निवडणुका घ्याव्यात तरी पंचाईत होणार हे नक्की आणि  न घ्याव्यात तर विधानसभेवेळी काय करायचे, असा आणखी जटिल पेच उभा राहिला आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल