शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अस्तित्वाच्या कड्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 9:22 AM

मगो पक्ष ढवळीकरांच्या ताब्यातून सोडवून त्याला ऊर्जितावस्था मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

- राजू नायकमहाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने निवडणुकीत भाजपशी सवतासुभा उभा केल्यामुळे सत्ताधारी पक्षाला दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक जिंकता आली नाही. परंतु एक जागा कमी झाल्याने भाजपला फारसा फरक पडला नाही. कारण शिरोडय़ासह, मांद्रे व म्हापसा या विधानसभेच्या जागा पदरी पडल्या. त्यामुळे त्यांचे गोव्यातील सरकार भक्कम झाले.आता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगोप) अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली २० वर्षे या ना त्या पक्षाची साथ करीत हा पक्ष सत्तेची ऊब घेत राहिला. कधी त्या पक्षाने संघटनात्मक बांधणी केली नाही की कधी पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला नाही. याचे कारण सुदिन ढवळीकरांना पक्ष वाढविला तर आपल्या हातातून सुटेल अशीच नेहमी भीती वाटली.ढवळीकरांच्या घरातच सध्या हा पक्ष अंग चोरून उभा आहे. सुदिन ढवळीकर व त्यांचे  बंधू दीपक- जे मगोपचे अध्यक्ष आहेत, पक्षाची धुरा सांभाळतात. २०१७च्या निवडणुकीत दीपक यांचा शेजारच्या प्रियोळ विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. परंतु सत्तेविना अस्वस्थ असल्याने शिरोडा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होताच, तेथे नशीब अजमावण्याचा त्यांनी चंग बांधला.सरकारात स्थैर्य निर्माण करण्यासाठी भाजपने काँग्रेस पक्षाचे शिरोडा व मांद्रे मतदारसंघाचे आमदार फोडून भाजपमध्ये आणले. तो व्यूहरचनेचा भाग असल्याने सरकारचा घटक पक्ष असलेल्या मगोपने ती जागा लढवू नये यासाठी भाजपने प्रयत्न केले व नितीन गडकरी यांचीही शिष्टाई कामी आली नाही. मगोप ताठर भूमिका घेण्याचे आणखी एक कारण सुदिन ढवळीकरांची मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा. हा पक्ष सध्या एकच सदस्यीय आहे; परंतु पोटनिवडणुकीत भाजपला पराभव सहन करावा लागून गोव्यातील सरकार कोसळले तर काँग्रेसच्या पाठिंब्याने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची गादी मिळेल असे मांडे ढवळीकर खात होते. काँग्रेस पक्षाने यापूर्वीही ढवळीकरांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.दुर्दैवाने शिरोडा मतदारसंघात दीपक ढवळीकरांचा पराभव झाला. राजकीय निरीक्षकांच्या मते ढवळीकरांनी तेथे हातातील सारी संसाधने वापरण्यात कुचराई केली नाही. केंद्रात मोदींचे भरभक्कम सरकार आल्यानंतर जो काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करण्याची स्वप्ने पाहात होता, त्याचेही अस्तित्व धोक्यात आहे व ढवळीकरांच्या नेतृत्वाला शह दिला जाऊ शकतो. मगोपमधील एक घटक पक्षाचे नेतृत्व बहुजन समाजाकडे सोपवावे व पक्षाने रितसर बांधणी करावी यासाठी प्रयत्नशील आहे. ढवळीकर बंधूंनी पक्षातून हाकललेले माजी आमदार लवू मामलेदार यांना मानाने पक्षात घ्यावे यासाठीही चळवळ उभारली जाणार आहे. तसे घडले नाही तर हा पक्ष लवकरच विस्मरणात जाईल अशीच भीती आहे.(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.  )

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण