शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

महात्मा गांधी : सामान्यातला असामान्य माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:22 AM

पुढे महात्मा झालेल्या मोहनदास करमचंद गांधी यांचा सत्याचा हा निर्धार लहानपणापासूनच झाला आणि तो त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम ठेवला. सत्य, अहिंसा, सर्वधर्म सहिष्णुता आणि सत्याग्रह हे गांधी विचारांचे मूलाधार असेच त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभव व उदाहरणावरून साकार झाले होते.

- डॉ. रत्नाकर महाजन(प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते)‘शनिवारच्या व्यायामाच्या तासाला तू गैरहजर का राहिलास?’ एक मुख्याध्यापक हजेरीपटावर नजर टाकत असताना एका विद्यार्थ्याला विचारत होते.‘मी माझ्या आजारी वडिलांची शुश्रुषा करीत होतो. माझ्याजवळ घड्याळ नव्हते आणि आकाश ढगांनी भरलेले होते. त्यामुळे मला वेळ समजली नाही. मी शाळेत आलो तेव्हा सारी मुले निघून गेली होती’, विद्यार्थी म्हणाला.‘तू खोटे बोलतोस’, मुख्याध्यापक रागाने म्हणाले. १८८३ सालातील ही घटना राजकोटच्या अल्फ्रेड हायस्कूलमधली होती. मुख्याध्यापकाचे नाव होते दोराबजी एडल्जी जिमी आणि तो विद्यार्थी होता मोहनदास गांधी. मुख्याध्यापकांनी आपल्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला हे त्याला मुळीच सहन झाले नाही आणि तो ओक्साबोक्सी रडला. आपण खरेच बोलल्याचे त्याला माहीत होते. पण ते मुख्याध्यापकांना कसे पटवावे हे कळत नव्हते. या प्रसंगावर पुन्हा पुन्हा विचार करताना सत्यवादी माणूस हा काळजीपूर्वक वर्तन करणारा असला पाहिजे, असा निष्कर्ष त्यांनी काढला. आयुष्यात आपण कधीही मनापासून सांगितलेल्या सत्यावर खोटेपणाचा आरोप होता कामा नये, असा त्यांनी निर्धार केला.पुढे महात्मा झालेल्या मोहनदास करमचंद गांधी यांचा सत्याचा हा निर्धार लहानपणापासूनच झाला आणि तो त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम ठेवला. सत्य, अहिंसा, सर्वधर्म सहिष्णुता आणि सत्याग्रह हे गांधी विचारांचे मूलाधार असेच त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभव व उदाहरणावरून साकार झाले होते.गांधीजींची अहिंसा ही दुर्बलांची अहिंसा होती, असा निरर्थक व बालिश आरोप त्यांचे विरोधक व काही भ्रमित विचारवंत करीत आले आहेत. प्रत्यक्षात अहिंसा हे पराकोटीच्या हिंसक व्यक्ती व जमावालादेखील हतबल व पराभूत करणारे हत्यार आहे हे गांधीजींनी प्रत्यक्षात सिद्ध केले आहे. त्यांची अहिंसा ही पुस्तकी नव्हती तर त्याला प्रत्यक्ष जीवनातील आचरणाचा आधार होता. उदा. स्त्रीच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा कुणी प्रयत्न केला तर तिला स्वसंरक्षणार्थ शस्त्र वापरण्याचा अधिकार आहे असे त्यांनी सांगितले. या अहिंसेचा संस्कारही लहानपणीच त्यांच्या आईकडून त्यांच्यावर झाला होता. अर्ध्या जगावर राज्य करणाºया आणि ज्याच्यासाम्राज्यावर सूर्य कधीच मावळला नव्हता अशा बलाढ्य ब्रिटिश सत्तेलाही त्यांनी सत्य व अहिंसा या ‘शस्त्रां’पुढे नमविले.सर्वधर्मी समानत्व हा गांधी विचारांचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. गांधीजींच्या मते माणूस कुठल्याही धर्मात जन्मला असला तरी माणूस म्हणून त्याचे अधिकार आणि कर्तव्ये सारखीच आहेत. जन्माने मिळालेल्या धर्म वा जातीवरून माणसा-माणसांत भेदाभेद करणे गांधीजींना मुळीच मान्य नव्हते. एका विदेशी पत्रकाराने विचारलेल्या, ‘स्वतंत्र भारतात धर्माचे स्थान काय असेल’, या प्रश्नाला उत्तर देताना गांधीजींनी स्पष्टपणे सांगितले, ‘धर्म ही ज्याची त्याची व्यक्तिगत बाब असेल, प्रत्येकाने आपल्या घराच्या चार भिंतीआड तो अवश्य आचरावा. सार्वजनिकरीत्या त्याचे प्रदर्शन वा आचरण करण्याचे काहीही कारण नाही. शासन संस्थांचे वर्तनही कुठल्याही एका धर्माला उत्तेजन किंवा विरोध न करणारे असले पाहिजे.’ त्यांच्या आश्रमातील सर्वधर्मीय प्रार्थना सभेतसुद्धा या तत्त्वाचे काटेकोर पालन होत असे. सर्व धर्मातल्या उच्च मानवी मूल्यांचा उच्चार या प्रार्थना-सभांमधून होत असे. पण कुठल्याही धर्माच्या कर्मकांडाला यात जराही स्थान नसे. त्याचबरोबर अंधश्रद्धेला खतपाणी घालणाºया, माझे तेच सत्य, माझा धर्मच सर्वश्रेष्ठ अशा अभिनिवेशाला जराही स्थान नसे. गांधीजींची व्यक्तिगत पातळीवरची धर्मश्रद्धा किंवा देवावरची श्रद्धा इतरांवर लादण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही.अशा या लोकोत्तर, लोकनेत्याचा अंत मात्र अत्यंत अनपेक्षित व जगाला धक्का देणारा आणि भारताला शोकसागरात लोटणारा ठरला. असे का झाले? वर म्हटल्याप्रमाणे गांधीजी स्वत:ला सनातन धर्माचा पाईक म्हणवीत असले तरी त्यांनी केवळ बहुसंख्येने असलेल्या धर्मापुरता विचार केला नाही किंवा त्या धर्माच्या लोकांना संघटित करून आपला धर्माभिमान किंवा देशभक्ती यांचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट आपल्या उदारमतवादाचा व समतावादी विचारांचा प्रसार अशा रीतीने केला की, त्यामुळे देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदू धर्मीयांचा मुळातला उदारमतवाद जागा राहिला व वृद्धिंगत झाला. हिंदू धर्मीयांना संघटित करून त्यांना आक्रमक राष्टÑवादाच्या झेंड्याखाली एकत्र करण्याचा १९२५ साली स्थापन झालेल्या राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा हेतू त्यामुळे कधीच सिद्ध झाला नाही. हिंदूंना हिंदू राष्टÑवादाची दीक्षा देण्याच्या आपल्या प्रयत्नाआड येणाºया व हिंदंूना वाढत्या क्रमाने उदारमतवादी बनवणाºया महात्मा गांधींबद्दल म्हणूनच राष्टÑीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांचे अनुयायी यांच्यामध्ये तीव्र अढी, तिरस्कार व राग होता. या रागापोटीच संघ किंवा हिंदू महासभेच्या एकाही कार्यकर्त्याने गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. अपवाद फक्त डॉ. हेडगेवार यांचा. पण तेही १९२५ साली संघाची स्थापना केल्यानंतर या लढ्यापासून अलिप्तच राहिले. बहुसंख्य हिंदूंवरील गांधीजींचा वाढता प्रभाव संघ आणि सावरकरवादी हिंदुत्ववाद्यांच्या डोळ्यांत खुपत होता. इतका की, ‘‘या दैत्याचा वध केल्याखेरीज आपला हिंदू संघटनचा हेतू साध्य होणार नाही’’, अशा निष्कर्षाला ते आले. या विचार प्रवाहाचा प्रतिनिधी नथुराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८च्या प्रार्थना सभेत त्यांचा खून केला असला तरी प्रत्यक्षात त्याचे व त्याच्या साथीदारांचे हे प्रयत्न ८-१० वर्षांपासून चालू होते. याचे अनेक कागदोपत्री पुरावे आता उपलब्ध झाले आहेत.२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यापासून मात्र संघाचा पवित्रा हळूहळू बदलू लागला आहे व अधिक आक्रमक होत चालला आहे. पण गांधींच्या खुनाचा ठपका काही केल्या दूर होत नाही. तो दूर करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून नथुराम गोडसेच्या तिन्ही गोळ्यांनी त्यांचा मृत्यू झालाच नाही, तर एका अज्ञात इसमाच्या चौथ्या गोळीमुळे त्यांचा मृत्यू झाला अशी तद्दन बालिश व पलायनवादी भाकडकथा पसरविण्याचे काम चालू होते. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गांधी खुनाचा पुन्हा नव्याने तपास करावा, अशी याचिकाही दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायमित्राने तपासाअंती हा दावा सपशेल फेटाळला असून, गांधीजींचा खून नथुराम गोडसेनेच केला, असा निर्वाळा या न्यायमित्राने दिला आहे. जगाला अहिंसेचा संदेश देणाºया अहिंसा पूजकाचा अंत अशा हिंसक पद्धतीने व्हावा हा कुठला न्याय म्हणायचा? गांधीजींविषयी अखिल मानव जातीची भावना १९४४ साली विख्यात वैज्ञानिक आईनस्टाईन यांनी पुढील शब्दात व्यक्त केली आहे : ‘हाडा-मांसाचा असा एक माणूस या पृथ्वीतलावर वावरत होता. यावर कदाचित येणाºया पिढ्यांचा विश्वास बसणार नाही.’ 

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत