शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

ग्रामीण उत्तर भारतातील पुरुषी वर्चस्व

By admin | Published: December 27, 2014 2:39 AM

काही वेळा हे वर्चस्व सूक्ष्म व अप्रत्यक्ष स्वरूपातही असते. उत्तर भारतात विशेषत: हरियाणात हे पुरुषी वर्चस्व विशेषकरून दाखविले जाते.

ज. शं. आपटेलोकसंख्या अभ्यासकभारतातील बहुसंख्य हिंदू समाजात पितृप्रधान व पुरुषसत्ताक कुटुंबव्यवस्था आहे. घरातील बहुतेक सर्व महत्त्वाचे निर्णय पुरुषांनी घ्यायचे असतात व तसे घेतले जातात. त्यामुळे पुरुषांची सोय पुरुषांच्या अडचणी, पुरुषांच्या कामाला व्यवसायाला प्राधान्य, महत्त्व दिले जाते. त्यामुळे पुरुषवर्गाला आपले आपले प्रभुत्व, अधिकार, स्वामित्व, वर्चस्व ठिकठिकाणी उघडउघड दाखविता येते. काही वेळा हे वर्चस्व सूक्ष्म व अप्रत्यक्ष स्वरूपातही असते. उत्तर भारतात विशेषत: हरियाणात हे पुरुषी वर्चस्व विशेषकरून दाखविले जाते. त्यासंबंधी नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (नवी दिल्ली)चे माजी आध्यापक व स्वतंत्र संशोधक प्रेम चोप्रा यांनी विस्ताराने अभ्यास केला आहे. त्याचाच आधार या विवेचनास आहे.हरियाणामध्ये दिसून आलेले पुरुषी वर्चस्व उत्तर भारतातील ग्रामीण भागात अधिक ठळकपणे दृष्टीस पडते. एखाद्या मोठ्या घरातील काही जागा केवळ पुरुषांसाठीच राखून ठेवलेल्या असतात. बैठक ही जागा केवळ पुरुषांसाठीच असते. चौपाल (समूहाची इमारत) येथे पारंपरिक पंचायत, मोकळ्या वेळेतील खेळ, मद्यपान, धूम्रपान, पत्ते खेळणे अथवा फक्त पुरुषांचे रिकाम्या वेळेतील उद्योग दिवसभर चाललेले असतात. त्यामुळे येथे महिलांना प्रवेशबंदी असते. याचबरोबर सार्वजनिक जागा, म्हणजे खेड्यातील रस्ता दिवसातील काही काळ फक्त पुरुषांसाठीच राखीव असतो. एखाद्या जागेवर, जमिनीवर हक्क, स्वामित्वभावना पुरुषी वर्चस्व वृत्तीस पोषक व अनुकूल असते. त्यामुळे पुरुषवर्गाला ती वृत्ती, भावना प्रकट करणे सहजसाध्य आहे. जागेच्या, जमिनीच्या बाबतीत पुरुषांची अधिसत्ता असते. ‘हमारा’ गाँव असे हरियाणातील पुरुषवर्ग अभिमानाने, अस्मिता भावनेने म्हणत असतो. भाईचारा, बिरादरी ही मुख्यत: पुरुषी संकल्पना आहे, स्त्रियांना त्यातून वगळले आहे. हरियाणातील जमिनीची मालकी असलेल्या जातिगटातील घरात ३ ठळक जागा असतात. एक राहण्यासाठी, दुसरी गुराढोरांसाठी आणि तिसरी बैठक. हरियाणातील पुरुषांच्या दोन महत्त्वाकांक्षा असतात- पक्की रोटी व पक्का घर. म्हणजे उत्तम जवेण व चांगले घर. १९८४-८५मध्ये शेतकरी कुटुंबात सरसरी ४ टक्के ते ५ टक्के रक्कम घरासाठी खर्च होत होती. २००४-०५मध्ये ती सरासरी १३.८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. हरित क्रांतीमुळे व नंतरच्या निम्न शहरीकरण व शहरीकरणामुळे हरियाणातील ग्रामीण भागात खूपच बदल झाला आहे. पुरुषी सत्तेचे एक बलशाली केंद्र म्हणजे पारंपरिक पंचायत. या पंचायतीमध्ये मोठ्या संख्थेत पुरुष एकत्र येतात. तेथे संपत्ती, इस्टेट, त्यासबंधीचे हक्क, वारसाविषयक प्रश्न, जाती व आंतरजातीय समस्या, वैवाहिक प्रश्नासबंधीचे वाद, गावाच्या शांततेस धोका आणण्याऱ्या बाबी यासंबंधी न्यायनिवाडा होतो. या पंचायतींच्या कार्यपद्धतीविषयी अधिक तपशील उपलब्ध नसला, तरी उत्तर भारतातील ग्रामीण भागात आजही त्यांचा प्रभाव कायम आहे. या पुरुषांसाठीच असलेल्या पंचायतीमध्ये कनिष्ठ जातीतील पुरुष मात्र मागच्या भागात बसलेले वा उभे राहिलेले असतात. ते उच्च जातीच्या पुरुषांबरोबर मिसळत नाहीत. महिलांना पंचायतीच्या जवळपास फिरकूही दिले जात नाही. त्यांच्यासबंधीचे प्रश्न असले, तरी त्या तेथे नसतात. घरातील बैठक ही जागा विशेष महत्त्वाची असते. या जागेतच सत्तेचे डाव खेळले जातात व ती जागा म्हणजे घराचे सत्ताकेंद्र मानले जाते. सार्वजनिक व खासगी अशी विभागाणी असल्यामुळे महिलांना महत्त्वाच्या सार्वजनिक कामापासून दूर ठेवले जाते. महिलांचा कशात सहभाग असूच नये, असेच पुरुषांना वाटते. मोकळ्या जागेत पत्ते खेळत व हुक्का ओढत वेळ घालविणारे पुरुष हे खेड्यांत दिसणारे नेहमीचे चित्र आहे; पण तेथेही भेदभाव आहेच. उच्च जातीतील कोणीही आपला हुक्का कमी दर्जाच्या जातीतील पुरुषाला देणार नाही, कारण हुक्का देणे म्हणजे त्याला आपल्या बरोबरीचा मानणे. जेव्हा एखाद्या समूहाला बहिष्कृत केले जाते, तेव्हा त्याचबरोबर हुक्कापाणी बंद असते. पुरुषांना एकत्र आणणारी दुसरी बाब म्हणजे खेळ-कुस्ती. हा विशेष लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे.कुस्ती हा पुरुषांच्या मर्दानी, कणखर जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शक्ती, सामर्थ्य, पौरुष यांचे ते प्रतीक आहे. कुस्ती समितीचा सदस्य असणे ही मानाची बाब मानली जाते; पण अलीकडे कुस्तीसाठी सातत्याने तयारी करणे कमी झाले आहे. आता शारीरिक सुदृढता कमावून पोलीस दल अथवा निमलष्करी दलात नोकरी मिळविणे, हे मुख्य उद्दिष्ट झाले आहे. कुस्तीतील गुणी पुरुषांना पैलवान मानले जाते व त्यांना व्यापार-उद्योग क्षेत्रात योग्य ते काम व जबाबदारी दिली जाते. खेड्यात होत असलेल्या सामाजिक व आर्थिक बदलामुळे आता परिस्थितीत फरक पडत आहे. हरियाणातील पुरुषी अस्मितेला आधुनिकेतचा स्पर्श होत आहे. पुरुषवर्गाचा दबदबा कमी होत आहे. पण, खाप पंचायतीचा प्रभाव जाणवू लागला आहे. पुरुषवर्गाला सध्या खाप पंचायतीचा आधार आहे.