शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
4
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
5
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
6
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
7
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
8
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
9
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
10
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
11
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
12
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
13
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
14
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
15
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
16
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
17
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
18
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
19
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मालेगावी ‘पिक्चर’चा बॉम्ब ‘थेटरात’ नव्हे, दर्दी लोकांच्या हृदयात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2023 11:07 AM

सलमान, शाहरूखच्या ‘पिक्चर’ला मालेगावी ‘थेटरात’ फटाके फुटतात; पण त्याच्या वाती आधी मनामनांत पेटलेल्या असतात!

-समीर मराठे

काही दिवसांपूर्वीचीच ‘गोष्ट’. दिवाळीत मालेगाव येथे सलमान खानचा ‘टायगर ३’ हा नवा ‘पिक्चर’ सुरू असताना हौशी रसिकांनी भर ‘थेटरात’ भुईनळे, रॉकेट, फटाके, सुतळी बॉम्ब फोडले ! ही ‘गोष्ट’ अशासाठी की मालेगावसाठी असे प्रकार नवे नाहीत. मात्र त्याला ‘गोष्ट’ म्हटले तरी ती ‘कहाणी’ नाही, ते एक वास्तव आहे. दुसरी गोष्ट. थेटरच्या स्क्रीनवर जे काही चालू असेल, त्याला ‘पिक्चर’च म्हणायचं. कारण मालेगावात तो फक्त ‘पिक्चर’ असतो. तो सिनेमा, चित्रपट, मूव्ही असलं काहीही नसतं. पिक्चर सुरू असताना भर थेटरात फटाके फोडणं

चुकीचं आणि धोक्याचंच. अशा आततायी जल्लोषानं नस्ती आफत ओढवू शकते. थिएटरचे मालक, पोलिस आणि खुद्द सलमान खाननं ‘कृपा करून असं काही करू नका’, असं आवाहन मालेगावी चाहत्यांना अनेकदा केलंय! मालेगाव हे चित्रपट शौकिनांचं गाव. त्याला तिथली सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक, राजकीय आणि ‘रोजगारीय’.. परिस्थितीही कारणीभूत आहे. मालेगावचा इतिहास तसा खूप मोठा, पण या शहराला ‘पिक्चरप्रेमींचा एक छोटा देश’ म्हटलं तरी चालेल, इतकं पिक्चरप्रेम त्यांच्या मनात, हृदयात घुसलेलं आहे. मालेगावात पिक्चर पाहणारे शौकिन जसे आहेत, तसंच पिक्चर बनवणारेही. इथली ‘मॉलीवूड’ इंडस्ट्री कदाचित ‘बॉलीवूड’इतकी फेमस नसेल, फाटक्या खिशामुळे त्यांना मर्यादा असतील, पण इथल्या कलावंतांची गुणवत्ता, जिगर, धडपड, मेहनत, त्यांचं ‘जुगाड’ आणि परिस्थितीला हार न जाणारी त्यांची वृत्ती जगातल्या कोणत्याही कलाकारापेक्षा, इंडस्ट्रीपेक्षा कमी नाही.  या मॉलीवूडचे  लक्षावधी चाहते जगभरात पसरलेले आहेत. 

एक काळ होता, जेव्हा निर्मात्यानं एखादा चित्रपट बनवला की, तो चालेल की नाही, आपला पैसा वसूल होईल की नाही, हे तपासण्याची एक ‘लिटमस टेस्ट’ म्हणून मालेगावच्या पिक्चर शौकिनांकडे पाहिलं जायचं. मालेगावच्या पिटातल्या पब्लिकनं पिक्चर उचलून धरला म्हणजे, तो चालणार ही गॅरंटीच!  इंटरनेट, मोबाइल, यूट्यूब, नेटफ्लिक्स.. यासारख्या गोष्टींनी मालेगावच्या पिक्चरवेडाचा हा सुवर्णकाळ घालवला, पण पिक्चर मालेगावकरांच्या रक्तातच आहे. मालेगावकरांचा पहिला धर्म कोणता?- तर पिक्चरच! पिक्चर म्हणजे आनंदाची, मौजेची, करमणुकीची, विरंगुळ्याची, ‘पार्टी’ची बाब!

डोक्याच्या कटकटी, चिंता, त्रास यातून काही तास सुटका मिळवण्याचा बहाणा म्हणजेही पिक्चरच! पिक्चर हाच ‘अभ्यास’, तीच ‘पॅशन’ आणि ‘फॅशन’, ‘खेळ’ आणि ‘मैदान’, ‘तहान’ आणि ‘भूक’, अगदी ‘टाइमपास’ आणि ‘झोप’ही पिक्चरच. वेळ घालवायला काही नाही म्हणून थेटरात जाणारे, समोर दिसेल त्या पिक्चरला जाऊन बसणारे अनेक पिक्चरप्रेमी मालेगावी आहेत. घरातल्या विवंचना, कटकटी, नवरा-बायकोची भांडणं, जबाबदाऱ्या, रात्रपाळ्या, रात्रीची जागरणं, छोटी घरं, घरात मुलांची तसंच इतरांचीही गर्दी. अगदी लैंगिक क्रियाकर्म, ‘प्रेम’ करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वाट पाहाणं यामुळे झोप न होणारे लोक तिकीट काढून थेटरात जातात. कोपऱ्यातल्या सीटवर तीन तास शांतपणे झोपतात! 

‘पहला दिन, पहला शो’, मॅटिनीपासून ते रात्रीच्या शेवटच्या शोपर्यंत प्रत्येक शो पाहणारे, महिनाभर रोज कोणता ना कोणता पिक्चर थेटरात जाऊन पाहणारे, त्याचबरोबर तिकीट खिडकी उघडल्यावर पहिलं तिकीट मीच मिळवणार आणि थेटरात सर्वांत पहिल्यांदा पाऊलही मीच ठेवणार, अशा कोणत्याही गोष्टीसाठी जीव पणाला लावणारे, हिरोची एंट्री होण्याआधी टाळ्या, शिट्या, आरोळ्यांनी थेटर दुमदुमून टाकणारे, डान्स सुरू झाल्यावर पैसे उधळणारे, पडद्यासमोर येऊन डान्स करणारे, हिरोइनची एंट्री झाली की अश्लील शेरेबाजी करणारे, व्हीलनला कचकचीत शिव्या घालणारे, पिक्चरसाठी रोजंदारी बुडवणारे, मालकानं कामावरून काढून टाकलं तर त्याचीही पर्वा नसलेले असे असंख्य पिक्चरदर्दी हे मालेगावचं खास, जगावेगळं वैशिष्ट्य आहे. तसं मालेगाव हे बॉम्बवरच वसलेलं शहर!  हे शहर कधी फुटेल याचा भरवसा नसतो, नाही, पण आता लोकच समंजस झाले आहेत, होताहेत. राहता राहिला प्रश्न थेटरमधल्या बॉम्बचा. थेटरात एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाके गेलेच कसे, ‘तपासणी’ का झाली नाही, असे प्रश्न विचारले जाताहेत, या चाहत्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होते आहे, पण या प्रश्नांची उत्तरं कायदा-सुव्यवस्थेपेक्षा रसिकांच्या मनात दडलेली आहेत. पिक्चरचा ‘बॉम्ब’ चाहत्यांच्या मनात, हृदयात आहे, आधी तो तिथेच फुटतो. थेटरातले फटाके फुटताना कधीतरी आपल्याला दिसतात खरे. पण ते तर केवळ एक छोटं प्रतिबिंब आहे!

टॅग्स :TigerवाघSalman Khanसलमान खान