शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

मनाचिये गुंथी - कट्टा

By admin | Published: January 09, 2017 12:34 AM

समाज सरोवर आहे की नदी, तो अखंड पाझर आहे की गटार, तो पवित्र तीर्थ आहे की डिस्टील्ड केलेलं कृत्रिम पाणी.

समाज सरोवर आहे की नदी, तो अखंड पाझर आहे की गटार, तो पवित्र तीर्थ आहे की डिस्टील्ड केलेलं कृत्रिम पाणी. खूप प्रश्न पाडलेत या समाजाने. सभ्यता जागविलेला जमाव म्हणजे समाज किंवा संवेदना माळलेला जमाव, असेही म्हणता येईल. ठरावीक कारणाने जमतो तोही समाजच असतो. स्मशानात जमलेली माणसं त्या त्या जातीचा समाजच असतो. ज्ञानेश्वरांनी पसायदानात एक शब्द वापरला, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. ही मांदियाळी सज्जन माणसांचा समुदायच असतो. वर्षानुवर्षे हे आपल्यावर संस्कारित झालंय. हा समाज ज्या एका जागेवर जमतो ते भले पटांगण असो, सभागृह असो, छोटा हॉल असो, लगेच त्या जागेला विचारांचे एक वेगळे वलय प्र्राप्त होते. पण जागा बदलली की हेतू बदलतात. उदा. पार्टीचं कार्यालय आणि कट्टा. कट्टा म्हटलं की सगळंच बदलतं. माणसांचा वयोगट बदलतो. विचार बदलतात. भाषा बदलते. एरवी जे असभ्य, अश्लील म्हणून डोळे मोठे करून बघितलं जातं ते एकदम रुटीनचं किंबहुना आवडीचं, नेहमीचं होतं. समाजात पडद्यामागील शब्द, भाषा, स्तर, संबंध एकदम मोकळे होतात. जात येते ती शिवी म्हणून. घर येतं ते बोअर कोंडवाडा म्हणून. आई-बाबा म्हातारी-बाप होतात. यार भंकस नुस्ती, पकवतात रे बोलून बोलून. हे बघा, कुठलीच भीडभाड न ठेवता बोललं पाहिजे. ही थिअरी आणि नियम इथले. इथली भाषा आणि चर्चा घरापर्यंत जाऊच द्यायची नाही. फळ चोरून खाल्ल्यानंतर कुणाला कळू नये म्हणून मुलगा तोंड स्वच्छ धुतो. पुसतो. हात धुतो घाईने चड्डीला पुसतो. पण नेमके होते काय की चड्डीला पुसलेले हात आईला कळतात. कारण ठराविक भागच ओला दिसतो. तसे काहीसे होते. चुकून मित्र घाईने घरी येतो. डोकं भेंगाळलेला, तो त्याच्या परवलीच्या भाषेत मित्राला हाक मारतो. शिवाय भ ची बाराखडी जोडूनच. आजोबा दारात येतात. मित्र बावरतो. क्षणभर त्याची बोबडी वळते. आपले संदर्भ ह्यांना कळले तर? आजोबा हसतात म्हणतात, ये बाळा आहे तो घरात! आजोबा एका हास्याने भाषा सुधारतात. खरं तर पुन्हा प्रश्न! आधीची मुलाची भाषा चांगली होती की आताची.खरं तर दोन्ही एका गटाला संमत असलेले शब्द दुसऱ्या वयाला पचत नाहीत, पटत नाहीत, पण त्यांचा रोष उमटतही नाही. स्वीकारायला हवे, आजोबांचे सरोवर झालेले. त्यामुळे दगड टाकला की ढवळणारच सारे. पण तरण्या पोरांची खळखळ नाही. ते त्या वयाची भाषा बोलतात. राग, वैताग, विद्रोह आणि प्रेमही व्यक्त करतात. नकळत तो समाजच वेगळा होतो. मग आजोबाही उठतात. हातात काठी घेऊन त्यांच्या कट्ट्यावर येतात. त्यातल्या त्यात तरुण म्हाताऱ्याला डोळा मारतात. बायकोचा डोळा चुकवून थोडी मिठाई खाल्ल्याचे सांगतात. पलीकडे कट्ट्यावर वडापाव शिळा होता रे म्हणून घमासान शिव्यायुद्ध चालू असते. एकंदर समाजाचे दोन्ही घटकच! एक धट्टाकट्टा दुसरा मठ्ठाकट्टा!किशोर पाठक