शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

मनाचिये गुंथी - ... कधी होशिल माणूस

By admin | Published: July 08, 2017 12:14 AM

माणसाच्या मनाचा थांगा लागत नाही. ते अथांग सागरासमान गहन, गूढ आहे. खूप खोल असून

- कौमुदी गोडबोले माणसाच्या मनाचा थांगा लागत नाही. ते अथांग सागरासमान गहन, गूढ आहे. खूप खोल असून त्याचा तळ गाठणं कठीण! अत्यंत चपळ, चंचलदेखील आहे. वाऱ्याचा वेग कमी पडेल इतकं वेगवान आहे. क्षणात आकाशात झेपावतं तर क्षणात जमिनीवर सैर करतं. स्वैरपणानं सैर करणारं मन स्वच्छंदी असतं. आपल्या नादात गिरक्या घेत जातं. आजूबाजूच्या परिसराचा विसर पडून आत्ममग्न होतं. कधी खळखळून हसतं तर कधी खळखळाट करणाऱ्या निर्झरासमान पुढे पुढे झेपावतं! निरागस बालकासमान निर्व्याज होऊन आनंद लुटतं. निराशेला सहजपणानं दूर लोटतं.मनाच्या किती विविध छटा अनुभवायला मिळतात. त्याचे रंग कधी आकर्षक तर कधी भडक! कधी सौम्य आल्हाददायक तर कधी उग्र नको वाटणाऱ्या रंगछटा! रंगांची दुनिया जादूभरी तशीच मनाची दुनिया अनोखी! मन कळायला सोपं आहे का? अत्यंत गुंतागुंतीचं असल्यामुळे समजायला अवघड आहे. ते कशात ... कधी... कसं अडकेल ... गुंतेल त्याचा काही नेम नाही. वस्तूंमध्ये ... माणसांमध्ये... नात्यांमध्ये ते गुंतून जातं. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या मागे मागे जातं. त्याच्या प्राप्तीसाठी तळमळतं. घडणाऱ्या घटनांमध्ये सदैव अडकून राहतं. भ्रमर जसा कमळामध्ये अडकतो ना! माणसाच्या मनाची अवस्था भ्रमरासमान होऊन ते विषयांमध्ये बंदिस्त होऊन जातं.अस्वस्थ, अस्थिर, अशांत मनाची अवस्था मोठी कठीण आणि केविलवाणी होऊन जाते. कलियुगामध्ये याचा उच्चांक गाठलेला दिसतो. शिक्षण आणि संस्काराचा संबंध संपल्यापासून मनं सैरभैर न झाली तर नवल? ते भलतीकडे भरकटत जातं. स्वत:बरोबर समाजाला त्रस्त करतं. वासनांचा भडका उडून विकृती जन्म घेते. शिक्षणातल्या गुणांचा जीवन जगताना, माणूसपण जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी उपयोग होताना दृष्टीस पडत नाही. बहिणाबाई चौधरी लिहितात अरे माणसा माणसा कधी होशिल माणूस?ही ओळ आजच्या काळातील माणसाच्या मनाची अधोगती अधोरेखित करणारी आहे. अशा माणसांच्या मनाला सुयोग्य वळण लागण्यासाठी सात्विकतेची गरज आहे.नको त्या स्थानी... नको त्या भावनेत गुंतल्यानं त्याची फार गुंतागुंत होऊन जाते. मनाचा गुंता हळूवारपणानं सोडवायचा असतो. शब्द, शस्त्र यांचा वापर त्यासाठी केला तर जखमा होण्याची दाट शक्यता! शरीराच्या जखमा लवकर भरून येतात परंतु मनाच्या जखमा भरून येणं कठीण! स्नेहाचं सुंदर मलम लावून प्रेमाची पट्टी लावली की मनाच्या जखमा भरून यायला साह्य होतं. हे अमूल्य कामं असहृदयी, संयमी, सोशिक संत करीत असतात.