यंदा श्रावणात मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी होणार असली तरी काही नवी गाणी गाण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसातील काही रसाळ घडामोडींमुळे समस्त महिला वर्गाला ‘त्या’ गाण्यांचा मोह पडला नसता तरच नवल. ही नवी गाणी गात महिलांनी फुगड्या, बसफुगड्या, झिम्मा, गाठोडं आदी प्रकार करावेत, असा सूर आहे.आंबा पिकतो रस गळतो राजाचे काम तोच करतो. जिम पोरा जिम कपाळाचा भीमभीम गेला पळून पोरी आल्या उठूनसरसर आंबा पिकतो, मजवरी जादू टाकीतोया या आंबा खायालाआमच्या वेण्या घालायाएक वेणी मोकळीआंब्यासाठी केली साखळीपाड पाड रे पोराआंब्यांचा हा डोलाराकुटुंबकबिल्याचा पेटारामंगळागौरीच्या वेळी नेहमीप्रमाणे कुणीतरी नासक्या बाठ्यासारखी न नाचता घुम्यासारखी नाराज होऊन बसल्यावर तिची समजूत काढण्याकरिता नवं गाणं आलं आहे.नाच गं घुमा, कशी मी नाचूनाच गं घुमा, कशी मी नाचूया गावचा, त्या गावचाआंबेवाला न्हाई आलागोडी न्हाई मला, कशी मी नाचू?या गावचा, त्या गावचाआंबा महोत्सव न्हाई झालाविनोद, आशिषनं बोलावलं न्हाई मला कशी मी नाचू?मंगळागौरीच्या या कार्यक्रमात काही आंबटशौकिनांनी जुनंएक लिंबू झेलूबाई दोन लिंब झेलू या गाण्याऐवजीएक कैरी झेलूबाई दोन आंबे झेलूदोन कैऱ्या झेलू बाई तीन आंबे झेलूतीन कैºया झेलू बाई चार आंबे झेलूचार कैºया झेलू बाई पाच आंबे झेलूमाळ घाली वाघोबालावाघोबाची भगवी घोडीयेता जाता कमळ तोडीकमळाच्या पाठीमागे लपली मोदी-शहा जोडीअगं अगं २०१९ ला दाखवं तुझं पाणी...हे नवं गाणं आणलं आहे. आता आंब्यानं सोशल मीडियावर इतका पिंगा घातल्यावर पिंग्याचं गाणही फर्मास झालं पाहिजे हा आग्रह असणे स्वाभाविक आहे. त्यामुळं पिंग्याचं नवं गाणं बाजारात आल आहे.पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगापोरगा गं तुझा, पोरगी गं माझीपोरगा गं तुझा चकणापोरगी गं माझी देखणीपोरगा गं तुझा, त्याच्या आंब्याच्या गं बागापोरगी गं माझी, तिला लागतो गं झिंगापोरगा गं तुझा, त्याचा सफेद लेंगापोरगी गं माझी, त्याला दावेल ठेंगापोरगा गं तुझा, युतीसाठी घोळतोय गोंडापोरगी गं माझी, गळ््यात बांधायची नाय हा धोंडाआता वेगवेगळ््या गाण्यांवर कलम केल्यावर महाआघाडीनं तरी का बरं मागं रहावं. त्यामुळे त्यांनाही फेर धरलायला लावलाचचला चला गं चला सयाचला गं चला फेर धरु यामहाआघाडीचा खेळ खेळू चलाईव्हीएम घपला जागवूया चलालोकशाहीचा आंबा पिकवू चला
आंबा पिकतो रस गळतो...
By संदीप प्रधान | Published: June 15, 2018 12:31 AM