शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

दिव्यत्वाची जेथ प्रचिती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:54 PM

मिलिंद कुलकर्णी पंचवार्षिक निवडणुकांचा हंगाम काही महिन्यांवर आलेला असताना जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील दोन ऋषीतुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड जाणे ...

मिलिंद कुलकर्णीपंचवार्षिक निवडणुकांचा हंगाम काही महिन्यांवर आलेला असताना जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील दोन ऋषीतुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड जाणे हे संपूर्ण राजकारणाचे मोठे नुकसान आहे. राजकीय क्षेत्र केवळ निसरडे नाहीतर अतीशय गढूळ झाल्याच्या वातावरणात ज्यांच्याकडे पाहून राजकारण आणि राजकीय नेत्यांवरील श्रध्दा आणि विश्वास काही अंशी टिकून राहत होता, तीच पटलावरुन दूर झाल्याने जनतेला हे क्षेत्र निर्नायकी वाटू लागेल.शिक्षकी पेशातून राजकारणात आलेले वाय.जी.महाजन आणि वैद्यकीय व्यवसायातून राजकारणात आलेले डॉ.गुणवंतराव सरोदे या दोन निगर्वी, सालस आणि ऋषीतुल्य व्यक्तीमत्वांचे निधन हे सर्वसामान्य जनतेला चटका लावून जाणारे आहे. दोन्ही नेते सत्ताधारी भाजपाचे असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आजच्या भाजपाला आहे. भाजपा सत्तेत असल्याने मोठ्या संघर्षाचा अनुभव पक्ष घेत आहे. सत्ता राबवित असताना विविध समाजघटकांची वाढलेली अपेक्षा, वर्षानुवर्षे उपेक्षित व वंचित राहिलेल्या घटकांना या सरकारकडून असलेली आशा, २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना होणारी ओढाताण, पक्षातील निष्ठावंत आणि पक्षाबाहेरुन आलेली नेते-कार्यकर्ते यांच्यातील अंतर्विरोध अशा पार्श्वभूमीवर महाजन, सरोदे यांच्यासारख्या समंजस, समन्वयवादी नेत्यांची आवश्यकता होती. परंतु, त्यांच्या निधनाने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.दोन्ही नेत्यांचे विचार, आचरण आणि कार्यशैली ही कार्यकर्त्यांसाठी आदर्श आणि अनुकरणीय राहिली आहे. राजकारण हे जनतेच्या सेवेचे एक साधन आहे, अशा विचारसरणीच्या दिनदयाल उपाध्याय, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी, नानाजी देशमुख, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या साखळीतील हे दोन्ही नेते एक धागा होते. वैद्यकीय व शिक्षकी पेशा सांभाळून त्यांनी राजकारण केले. पक्षाने जबाबदारी दिली, ती सांभाळली. यशस्वीपणे पेलली. पक्षाने थांबायला सांगितले, तेव्हा थांबले आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत आजीवन कार्य केले. कोठेही खळखळ नाही, असंतोष नाही, उद्वीग्नता नाही की अस्वस्थता नाही. शांत, संयमी आणि समाधानी असे आयुष्य दोन्ही नेते जगले.डॉ.सरोदे हे रावेरसारख्या कॉंग्रेसी विचारधारेच्या मतदारसंघातून निवडून आले. सर्वोदयी विचारसरणीतून ते भाजपामध्ये स्थिरावले. जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे पहिले आमदार आणि खासदार बनण्याचा मान त्यांच्या नावे जमा असला तरी कधीही त्यांनी अहंकार बाळगला नाही. किंवा त्याचा सतत उच्चार केला नाही. त्यांच्यानंतर पक्षात आलेले आणि पक्षाने सगळी पदे दिल्यानंतरही काही काळ सत्तेपासून दूर होताच अन्यायाची भाषा करु लागतात. ४० वर्षे पक्षासाठी दिली, पक्ष वाढवला असा दावा करीत असताना महाजन, सरोदे, मेंडकी, फडके, पालवे, करमरकर ही नावे सोयीस्कर बाजूला ठेवली जातात. पण इतिहास बदलता येत नाही आणि व्यक्तींच्या हृदयातील नावे पुसता येत नाही, हे त्यांना कोण सांगेल.वाय.जी.महाजन यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापासून तर खासदारकीपर्यंत कारकिर्द राहिली. धिप्पाड देह, पीळदार मिशा असलेला हा माणूस मनमोकळा आणि दिलदार होता. लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरुन त्यांची खासदारकी गेली; महाजन सर सक्रीय राजकारणातून स्वत:हून बाजूला गेले. सर असे करणार नाही, असा विश्वास सर्वसामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना होता, त्यामुळे त्यांच्याप्रती लोभ कायम होता.दुसऱ्यांच्या ताब्यातील संस्था बळकाविण्याचा उद्योग करणारी मंडळी असताना महाजन, सरोदे यांना इतर पक्षीय, विचारसरणीची मंडळी आवर्जून संस्थांमध्ये आमंत्रित करीत असत. फैजपूरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याशी सरोदे यांचा स्रेह शेवटच्या आठवड्यापर्यंत कायम होता. नशिराबादचे वाचनालय असो की, जळगावचे मॉडर्न गर्ल्स हायस्कूल असो, महाजन यांच्या शब्दाला तिथे मान होता.राजकारण आणि पक्षात काळानुसार बदल होत असतात, परिस्थिती आपण बदलू शकत नाही, हे लक्षात घेऊन स्वत:हून दूर होण्याची दूरदृष्टी आणि समंजसपणा या दोघा नेत्यांमध्ये होता. त्यामुळे राजकारण्यांमध्ये विरळा आढळणारा शांत, समाधानीपणा या दोघांमध्ये आकंठ भरलेला दिसला. कधीही खाजगीत उखाळ्यापाखाळ्या करणार नाही. त्यांची भेट आणि सहवास हा उर्जा देणारा आणि दिशादर्शक असाच राहिले आहे. पक्षाने, नेत्यांनी उपेक्षा केली तरीही ‘इदं न मम्’ असे म्हणत मी निष्ठावंत सैनिक आहे, समाजाने मला खूप दिले अशीच भावना त्यांच्या उक्ती आणि कृतीतून सतत झिरपत असे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव