शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

'पंढरीची वाट चालतात इंग्लंड-अमेरिकेतली मराठी माणसं...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 9:22 AM

असाल त्या देशात दररोज जमेल तसे किमान एक ते कमाल तेरा किलोमीटर अंतर हरिनामाचा उच्चार करीत चालायचे ही ग्लोबल वारी' मागची कल्पना!

 - शरद कदम (वॉरीक, यूके)

'वारी' हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे. तोंडाने विठ्ठल नामाचा गजर करीत आणि मनात 'विष्णुमय जग वैष्णवाचा, धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हा भाव ठेवत दरवर्षी लाखो लोक या सोहळ्यात सामील होतात. यंदाची माझी वारी चुकली, कारण दोन महिन्यांपूर्वी मी माझ्या मुलाकडे इंग्लंडला आलो आहे. इथे बसून 'संविधान समता दिंडी'चे व्हॉट्सअॅपद्वारे संयोजन करतो आहे. अर्थात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही याची रुखरुख आहेच. माझी ही धडपड माझा मुंबईतला मित्र आणि सध्या लंडनला राहत असलेला संतोष पारकर सोशल मीडियातून बघत होता. माझी तळमळ बघून त्याने मला एके दिवशी फोन करून ग्लोबल वारीची माहिती दिली आणि इंग्लंडमधून माझी ग्लोबल वारी सुरू झाली.

"एकदा तरी वारी अनुभवावी' असे म्हणतात. मराठी माणूस शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने घर-गाव सोडून परदेशात जातो, तेव्हा त्याला घरच्या सणावारांचे आणि वारीचे वेध लागतात. दिवाळी, गुढीपाडवा आदी परदेशात साजरे होतातच; पण त्याचबरोबर पंढरपूरच्या दिशेने वारी चालू लागली की परदेशस्थ महाराष्ट्रीय माणसाची तगमग सुरू होते. या तगमगीतूनच पुण्यात असताना आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या अनिल खेडकर यांच्या मनात ग्लोबल वारीची कल्पना आली आणि इंग्लंडमधल्या आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत लंडन शहरात चार वर्षापूर्वी ही वारी प्रत्यक्षात सुरूही झाली.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील अनिल खेडकर सध्या इंग्लंडमधील 'स्टेंस' येथे राहतात. आयटी क्षेत्रातील डॉ. शिवानंद जाधव पंढरपूरचे ते गेली चार वर्षे ते लंडनमध्ये राहतात. 'संत तुकाराम महाराजांच्या तत्त्वज्ञानाची सद्यकालीन प्रस्तुतता' या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. केलेली आहे. संतोष पारकर मूळचे मुंबईकर. गेली वीस वर्षे लंडनमध्ये राहतात. तेथील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्षही होते. यांच्या सोबतच लक्ष्मण खाडे, अरुण पालवे, रुस्तम खेडकर, नीलेश देशपांडे आणि इतर समवयस्क मित्रांनी ही ग्लोबल वारी सुरू करण्यात पुढाकार घेतलेला आहे.

जगभरात विखुरलेली मराठी भाषिक माणसे ग्लोबल वारीच्या माध्यमातून वारीच्या काळात चालत असतात. माझ्यासारखी काही काळापुरती परदेशात आलेली माणसेही यात सहभागी होतात. आपापली दररोजची कामे करीत, जिथे असाल त्या देशात, आपल्या परिसरात दररोज जमेल तसे किमान एक ते कमाल तेरा किलोमीटर अंतर हरी मुखे म्हणा' असा हरिनामाचा उच्चार करीत चालायचे ही या ग्लोबल वारी मागची कल्पना यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दिवसांपासून मी वॉरीक या शहरात दररोज काही किलोमीटर अंतर चालत आहे. दररोज चालणाऱ्या सदस्यांची नावे आणि त्यांचे अंतर ही आकडेवारी एका एक्सेल शीटमध्ये गोळा केली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी इंग्लंडमधील ग्लोबल वारीचे सदस्य प्रत्यक्ष आणि ऑनलाइनच्या माध्यमातून लंडनसारख्या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र जमून वारीचा समारोप करतात. यावेळी इथे जन्मलेल्या आपल्या मुलांना सोबत आणून संतांच्या समतेचा विचार या तरुण मुलांना समजावून देण्याचा प्रयत्न करतात. संत विचारातील मानवी मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे वारी हे साधन आहे, असे इथल्या बहुसंख्य लोकांना वाटते. 

महाराष्ट्रातील कित्येक वर्षांची वारीची ही परंपरा आता सातासमुद्राच्या पलीकडे नव्या स्वरूपात रुजू पाहतेय. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे' असे विश्वाचे पसायदान मागणारे ज्ञानदेव, 'सकळांसी आहे येथे अधिकार' असे ठणकावून सांगणारे संत तुकाराम, काय कवे कैलास' म्हणजे काम करीत राहिल्याने मोक्ष मिळतो, असे सांगणारे बसवण्णा, 'स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास' हा विश्वास देणाऱ्या संत जनाबाई या साऱ्या संतांनी मानवी मूल्यांची जोपासना करण्याचा आग्रह धरला. वारीच्या निमित्ताने या परदेशातील महाराष्ट्रीयन माणसांची उजळणी झाली. इथल्या वैज्ञानिक विचारांची जोड देता आली तरी ही वारी सार्थकी लागली....

टॅग्स :Pandharpurपंढरपूरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022