शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

कोवळ्या कळ्यांचा हा बाजार उठवला पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 6:06 AM

कोवळ्या मुलींच्या स्वप्नांचा, भवितव्याचा कसलाही विचार न करता त्यांच्यावर अकाली बाईपण लादणं हे सतीप्रथेपेक्षाही क्रूर आहे.

- नंदकिशोर पाटील(संपादक, लोकमत, औरंगाबाद) 

गेल्या  आठवड्यात राज्यातील कोरोनामुक्त गावांतील शाळांची घंटा वाजली. अनेक दिवसांनंतर शाळेची दारं उघडताच  धरणाच्या कालव्यातून पाणी खळाळत जावं तशी मुलं शाळेत धावत गेली. जाणारच ती. कारण, कोरोनामुळं मुलांचा अक्षरश: कोंडमारा झाला होता. ऑनलाइन शिक्षणात गोडी  नव्हती. संसर्गाच्या भीतीपोटी घराबाहेर पडण्याची  मनाई. खेळणं, बागडणं तर सोडाच मित्रांशी असलेला साधा संवादही खुंटला होता. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली सतत डोळ्यांसमोर मोबाइल धरून ही मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही थकली होती. चोवीस तास पालकांच्या पहाऱ्यात राहण्याची मुलांना सवय नसते. मुलं शाळेत, शाळेच्या प्रांगणात रमतात. तिथे सवंगडी असतात, मित्र-मैत्रिणी भेटतात. गप्पागोष्टी रंगतात. रुसवेफुगवे होतात. तिथं मोकळा श्वास घेता येतो. साने गुरुजी म्हणायचे, शाळेत जाणारी मुलं ही देवाघरची फुलं असतात. संस्काराचं खतपाणी घालून त्यांना जोपासायचं असतं. आपल्या अवतीभवती बागडणारी मुलं आणि वाऱ्याच्या झुळकीने डोलणारी झाडं असावी लागतात. म्हणूनच, गुरुजींनी वर्गातील पटसंख्येबरोबरच वृक्षलागवडीला तितकंच महत्त्व दिलं होतं. मात्र, लॉकडाऊनच्या काळात शाळेच्या पटसंख्येला आणि एकूणच सामाजिक पर्यावरणाला नख लावण्याचे प्रकार समोर आले आहेत. लॉकडाऊननंतर शाळा उघडल्या खऱ्या, परंतु आठवी ते दहावीची पटसंख्या कमी झाल्याचं दिसलं.  विशेषतः मुलींची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं मराठवाड्यात दिसलं.  या मुली गेल्या कुठे? मुख्याध्यापकांनी घेतलेल्या शोधानंतर समोर आलेलं वास्तव  धक्कादायकच नव्हेतर, संतापजनक आहे. मराठवाड्यातील अनेक गावांत कोरोनापत्तीचं निमित्त साधून अनेक अल्पवयीन मुलींचे विवाह उरकून टाकण्यात आले. त्याविषयी ना कुठे तक्रार, ना कारवाई! काही बालविवाह रोखले गेले हे खरं, पण ती संख्या अगदीच नगण्य.  बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक गावात स्वतंत्र यंत्रणा असते. ग्रामसेवकच ‘बालविवाह प्रतिबंध अधिकारी’ असतो. शिवाय, बालसंरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हा आणि गावस्तरावर समित्याही असतात. तरीही बालविवाह होतात.  एकतर असे विवाह लपूनछपून होतात. जातीधर्माच्या भिंतीही आड येतात. परिणामी, तक्रारीच येत नाहीत.  लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला. कुटुंबावर आर्थिक अरिष्ट आलं. मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि तिची जबाबदारी आता पेलवत नाही, अशी कारणं पुढे करून अल्पवयीन मुलींच्या गळ्यात अकाली डोरलं बांधलं गेलं. पण, ही कारणं साफ खोटी आहेत, असं सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे. एकतर बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहे. गावात शाळा असेल तर इतर खर्चही येत नाही. आरक्षित वर्गातील मुलींसाठी पुढील शिक्षणासाठी सरकारच्या सोयी-सवलती असतात. त्यामुळे आर्थिक कारणांसाठी अल्पवयीन मुलींच्या लग्नाचं समर्थन होऊ शकत नाही. यामागे निश्चितच इतर प्रलोभनं असतात. पालकांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांना अशा प्रकारचं बेकायदा कृत्य करण्यास भाग पाडणारे ‘मध्यस्थ’ असतात. साधारणपणे आपल्याकडे हुंडापद्धतीत वरपक्षाला हुंडा दिला जातो. (कायद्याने मनाई असली तरी!)  बालविवाहाच्या प्रकारात नेमकं उलटं घडतं. वरपक्षाकडची मंडळी मुलीच्या पालकांना पैसे देतात. हा  राजीखुशीचा मामला असला तरी तो एकप्रकारचा सौदाच! दिव्यांग, विदुर आणि वडिलांच्या वयाच्या पुरुषाबरोबर अल्पवयीन मुलींची लग्नं लावण्यात आल्याची प्रकरणं घडली आहेत. कोवळ्या वयातील या मुलींच्या स्वप्नांचा, भवितव्याचा कसलाही विचार न करता त्यांच्यावर अकाली बाईपण लादणं हा तर सतीप्रथेपेक्षाही भयंकर, अघोरी आणि क्रूर असा प्रकार आहे. कळ्यांचा हा बाजार वेळीच उठवला पाहिजे.  काल-परवापर्यंत शाळेत जाणारी, आईच्या मागे-पुढे करणारी, शेतातून दमून थकून आलेल्या बाबांना बिलगणारी ती चिमुरडी पोर एकाएकी परक्याचं धन कशी होते? तिच्या गळ्यात बाईपणाचं डोरलं बांधताना आई-वडिलांचं काळीज जराही हेलावत नाही? शेजारघरी एक अल्पवयीन पोर सून म्हणून आलेली असताना तिची खबरबात कोणालाच कशी लागत नाही?  - समाजाची ही डोळेझाकच बालविवाहाच्या पथ्यावर पडते  आहे.nandu.patil@lokmat.com

टॅग्स :marriageलग्नStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र