शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

विवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 4:35 AM

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी १९२६ साली ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ हा अतिशय महत्त्वाचा संशोधनपर ग्रंथ लिहून ठेवला आहे.

- वर्षा विद्या विलासइतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी १९२६ साली ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ हा अतिशय महत्त्वाचा संशोधनपर ग्रंथ लिहून ठेवला आहे. या ग्रंथाला तत्कालीन धर्ममार्तंडांनी तीव्र विरोध केला. मात्र, तरी आजही हा ग्रंथ शाबूत आहे. या ग्रंथात वि. का. राजवाडे यांनी एकूणच भारतीय विवाह संस्थेविषयी प्रचंड अभ्यासपूर्ण असे संशोधन मांडले आहे. आज या ग्रंथाची आठवण येण्याचे कारण एवढेच की, भारतीय समाजाची विवाह संस्थाच आज धोक्यात आली आहे. एकट्या मुंबई शहरात हजारो जोडपी घटस्फोट घेऊन विभक्त झाली आहेत, तर तितक्याच जोडप्यांचा निकाल अजून कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळेच भारतीय विवाह संस्था इतकी खिळखिळी होण्याची नेमकी कारणे शोधणे आज क्र मप्राप्त आहे.खरे तर भारतीय विवाह संस्था अशी अधू होण्यामागे भारतीय विवाह संस्थाच कारणीभूत आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. याचे कारण असे की, भारतीय विवाह संस्थेकडे स्त्री-पुरुष यांच्यातील नातेसंबंधांना सामाजिक प्रतिष्ठा आणि मान्यता मिळवून देणारी संस्था या एकाच दृष्टिकोनातून पाहिले गेले. आजही पाहिले जात आहे. दोन भिन्न लिंगी व्यक्तिंना एकत्रित राहण्यासाठी जे सामाजिक संकेत पाळण्याची आवश्यकता सांगितली जाते, त्याची सुरुवात ‘विवाह’ या शब्दापासून होते. जोवर स्त्री आणि पुरुष विवाहबद्ध होत नाहीत, तोवर त्यांना एकत्र राहण्याचा सामाजिक अधिकार नाही, असे आपल्याकडील सामाजिक संकेत आहेत. आज जरी भारतात लिव्ह-इन-रिलेशनशिपला महत्त्व प्राप्त झाले असले, तरीही अशा जोडप्यांना अद्याप समाजात पती-पत्नी म्हणून मान्यता दिली जात नाही, हे वास्तव आहे आणि म्हणूनच वाढत्या घटस्फोटांचे कारण शोधायचे असेल, तर या समस्येच्या मुळाशी जावे लागेल.आपल्याकडे अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज अशा दोन पद्धतीने विवाह करण्याचा प्रघात आहे. यातही लव्ह मॅरेजला अद्याप पूर्णत: सामाजिक मान्यता मिळालेली नाही. आॅनर किलिंगच्या घटनांची आकडेवारी पाहिल्यास ही गोष्ट सहज लक्षात येऊ शकते. मात्र, काही प्रकरणांत लव्ह कम अरेंज असा सोईचा मार्ग काढून उभयतांचे लग्न लावून दिले जाते. मात्र, हे लग्न लागताना किंवा लावून दिले जात असताना, जे वैचारिक संस्कार त्या जोडप्यावर व्हायला पाहिजे, तसे संस्कार करण्याचे/होण्याचे कोणतेच मार्ग आपल्या आजच्या विवाह संस्थेच्या कार्यपद्धतीत नाहीेत.परंपरेने चालत आलेले विधी करणे म्हणजेच विवाह अशीच धारणा आजही आपल्या समाजात रूढ आहे. अशा प्रकारांमुळे वराला आपण नवरा झालो, म्हणजे नेमके कोण झालो, हेच माहीत नसते. त्याचप्रमाणे, वधुलाही आपण बायको झालो, म्हणजे नेमके कोण झालो, हे माहीत नसते. पाठवणीच्या वेळेस मात्र, मुलीचे आई-वडील, नातेवाईक तिला सांगतात की, दिल्या घरी सुखी राहा! इथेच खरी गोम आहे. २०-२२ वर्षे जी मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहिलेली असते, तिला एके दिवशी अचानकच दिल्या घरी सुखी राहा, असे सांगून दुसऱ्या घरी पाठविले जाते. यात केवळ त्या मुलीचे घर बदलत नाही, तर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर मानसिक संक्रमण होण्याची वेळ बहुधा भारतीय स्त्रीवरच येत असावी. तिचा रोजचा चहाचा कप, टॉवेल, हातरुमाल सारे काही एका दिवसात बदलून जाते. हा बदल पचविताना त्या मुलीच्या मानसिक स्थितीचा विचार करणे खरोखरच खूप महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत जर ते नवे घर आणि त्या घरातील नवºयासकट सारी माणसे त्या मुलीला समजून घेणारी निघाली नाहीत, तर मात्र सारेच कठीण होऊन बसते आणि इथेच घटस्फोटाची पहिली ठिणगी पडते.मुळात विवाह किंवा लग्न करणे म्हणजे एक मालकीची व्यक्ती घरात आणणे ही मानसिकता अलीकडच्या काळात चांगलीच बळावली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचे कारण केवळ शिक्षणाचा अभाव एवढेच नाही, तर आपल्या समाज व्यवस्थेत स्त्रीचे जे स्थान आजही आहे, त्या स्थानाविषयीच्या आकलनात याचे कारण दडले आहे.बाबा आमटे आणि साधनाताई आमटे हे जोडपे सर्वात वरच्या स्थानावर आहे. बाबा आणि साधनाताई केवळ एकत्र राहिले नाहीत, तर ते एकत्र जगले. या दोघांनी एकत्र काम केले आणि समाजा पुढे आदर्श पती-पत्नीचा किंबहुना आदर्श जोडीदाराचा एक पायंडा घातला. डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, ज्यांनी सहजीवनाचे महत्त्व या समाजाला पटवून दिले आहे. मात्र, या सगळ्याकडे पाहायला कुणालाच वेळ नाही. एकमेकांतील संवाद संपणे हेही या समस्येमागील एक कारण आहे. जोडीदारांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, आपल्या अडचणी, तक्र ारी एकमेकांना सांगितल्या पाहिजेत. ही नि अशी अनेक कारणे आहेत, जी आज विवाहितांना कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडत आहेत. म्हणूनच जर हा फारकतीचा मुद्दा कायमचा निकालात काढायचा असेल, तर सहवासापेक्षा सहजीवनाला महत्त्व द्यावे लागेल. याशिवाय दुसरा पर्यायच नाही! अजूनही वेळ सरलेली नाही. विभक्त होण्यापेक्षा एकसंध व्हा आणि सहजीवनाचा आनंद लुटा!(सामाजिक कार्यकर्त्या)