गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात सोशल मीडियावर रोझ मॅकगोवन आणि अॅशले जूड या दोन अभिनेत्रींनी हार्वे वाइन्स्टाइन या हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध निर्मात्यावर काम देण्याच्या बदल्यात आपला लैंगिक छळ केला गेल्याची तक्रार केली. त्यानंतर, हार्वे याने आपलाही असाच लैंगिक छळ केल्याची तक्रार अन्य काही अभिनेत्री व महिलांनी केली. विदेशात ही वावटळ पसरताच आलिसा मिलानो हिने जगभरातील महिलांना ‘मी-टू’ हा हॅश टॅग वापरून आपल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या जगासमोर आणण्याचे आवाहन केले. वर्षभरानंतर हे वादळ भारतात येऊन थडकले. बॉलिवूडची अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार मी-टू माध्यमातून केली आणि त्यानंतर भारतामधील सिनेसृष्टी, राजकारण, पत्रकारिता अशी ग्लॅमरस विश्वं ढवळून निघाली. ज्येष्ठ पत्रकार एम.जे. अकबर यांच्यावर तर तब्बल १९ महिलांनी लैंगिक छळाची तक्रार केली आहे. अकबर यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. ‘मी-टू’चे हे वादळ अजून नोकरदार मध्यमवर्गापर्यंत पोहोचलेले नाही. ग्रामीण भागाला तर त्याची गंधवार्ता नाही. ‘मी-टू’ मोहिमेत पुरुषांवर दीर्घकाळानंतर सोशल मीडियावर तक्रारी करण्यामुळे महिलांना त्यांच्यावरील अन्यायाबाबत न्याय मिळेल का? महिला बोलू लागल्या, हे या मोहिमेचे यश आहे का? ‘मी-टू’च्या माध्यमातून महिला पुरुषांची बदनामी करत आहेत का? अगोदर पुरुषांचा शिडीसारखा वापर केला, यश प्राप्त केले व आता आरोप करून महिला स्वार्थी भूमिका घेत आहेत का? यामुळे स्त्री विरुद्ध पुरुष असा संघर्ष वाढीस लागेल का? भविष्यात कुठल्याही कार्यालयात पद रिक्त असेल, तर मुलगा किंवा मुलगी यांच्यापैकी एकाची निवड करताना वरिष्ठपदावरील व्यक्ती मुलीऐवजी मुलाचा पर्याय स्वीकारतील का? समलिंगी संबंधांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असल्याने भविष्यात पुरुषपुरुषांविरुद्ध कामाच्या बदल्यात लैंगिक शोषणाचे आरोप करू लागतील का? या व अशा असंख्य प्रश्नांची मालिका सध्या सोशल मीडियावर चर्चिली जात आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांतील महिला, पुरुष, युवक, युवती यांनी याच विषयावर व्यक्त केलेली मते येथे दिली आहेत. बहुतांश स्त्री-पुरुषांनी ‘मी-टू’चे स्वागत केले आहे. उशीर झाला असला, तरी महिला तक्रारीकरिता पुढे आल्या, याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. मात्र, यातून कायद्याच्या कसोटीवर किती गोष्टी सिद्ध होतील, याबाबत समाजमन संभ्रमावस्थेत आहे. मात्र, हेतुत: पुरुषांची बदनामी करण्याकरिता कुणीही ‘मी-टू’चा वापर करू नये, असे महिलांचेही म्हणणे आहे. अशा तुरळक घटनांनीही या मोहिमेच्या मूळ हेतूला हरताळ फासला जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.>ज्या उद्देशाने मी-टू मोहीम सुरू आहे, ते योग्यच आहे. केवळ मनोरंजन क्षेत्रच नाही, तर प्रत्येक क्षेत्रात महिलांना अशा प्रसंगातून जावे लागते. याविरोधात केवळ त्यांनीच आवाज उठवून चालणार नाही. समाजातील प्रत्येकाने त्यांना बळ दिले पाहिजे. आता उठलेली राळ पाहता, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. जे काही सत्य आहे, ते समोर येईलच. मात्र, केवळ प्रसिद्धीसाठी या मोहिमेचा वापर होत असेल, तर ते चुकीचे ठरेल. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचता, योग्य निर्णयाची वाट पाहू या. - संकेत ओक, कल्याण>मी-टू मोहीम अत्यंत चांगली आहे. यातून पीडित महिला पुढे येतील. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फुटेल. मात्र, या मोहिमेचा वापर प्रसिद्धीसाठी होत असेल, तर ते गैर आहे. त्यामुळे मोहिमेचा उद्देश फसण्याची शक्यता नाकारता येत नाही.- नीलय घैसास, कल्याण>कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शोषण ही गंभीर बाब आहे. अनेक तक्रारी कायद्याच्या कचाट्यात येतच नाहीत. भीतीपोटी महिला तक्रार करण्यासाठी पुढे सरसावत नाही. एखादी तक्रारीची मोहीम चालल्यानंतर तक्रार करणे योग्य नाही. वेळीच तक्रार करणे गरजेचे आहे. त्यामुळे तक्रारीचे महत्त्व कायम राहते. उशिरा आलेल्या तक्रारी नोंदवल्या जातात; मात्र त्यातून निष्पन्न काय होईल, हे सांगणे अवघड आहे. यासंदर्भातील तक्रारी करण्यासाठी महिलांनी पुढे येण्यास सुुरुवात केली, तर शोषणाचे प्रकार कमी होतील. कामाच्या ठिकाणी अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे अन्याय सहन न करता तक्रारीसाठी पुढे आल्यास त्या व्यक्तीला योग्य न्याय मिळतो. मात्र, हे करत असताना महिलांनी खोट्या तक्रारींचा मार्ग स्वीकारणे योग्य नाही. - अॅड. साधना निंबाळकर, अंबरनाथ>मी-टू अभियानामुळे शोषित महिला तक्रारीसाठी पुढे येत आहेत. मात्र, आजही अनेक क्षेत्रांतील महिला कर्मचारी तक्रारीसाठी धजावत नाहीत. एक प्रकरण पुढे आल्यानंतर त्याअनुषंगाने तक्रारी करणे, हा पर्याय नाही. कायद्यातील तरतुदींचा आधार महिलांनी घेणे गरजेचे आहे. महिलांचे शोषण अनेक ठिकाणी होते. मात्र, तक्रारी कमी प्रमाणात होतात. ज्यांचे खऱ्या अर्थाने शोषण होते, त्या महिला भीतीपोटी गप्प बसतात. काही प्रकरणांमध्ये महिला खोट्या तक्रारी करून एखाद्याला अडचणीत आणण्याचेही काम करतात. खोट्या तक्रारींमुळे खºया अन्यायग्रस्त महिलांच्या तक्रारींना महत्त्व राहत नाही. त्यामुळे खोटी तक्रार करणाºयांनाही आळा घालण्याची गरज आहे. ज्या महिलांचे शोषण होत आहे, त्यांना न्याय मिळण्यासाठी सर्वस्तरांवर प्रयत्न व्हावेत. - सुबोध उबाळे, अंबरनाथ>ज्या स्त्रियांनी एवढ्या नाजूक विषयावर उघडउघड आरोप केले, त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. एवढे गंभीर आरोप करून त्यांनी त्यांच्या करिअरचा धोका पत्करला आहे. त्यामुळे त्यांना किमान मानसिक बळ देण्याचे काम आपण माणुसकीच्या नात्याने करू शकलो, तरी ते पुरेसे राहील.- सायली चव्हाण, ठाणे>महिलांचा सर्वच क्षेत्रांत वावर वाढला असून महिला व पुरुष खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. सोबत काम करत असताना महिलांना कमी लेखू नये, अथवा त्यांचा गैरफायदा घेऊ नये. सिने व राजकीय क्षेत्रांत या प्रकरणामुळे वादळ उठले असून राजकीय नेत्यांना राजीनामा देण्याची वेळ आली. सिनेअभिनेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. महिला अत्याचाराविरोधात पुढे येत असून त्यांनी जाणीवपूर्वक कुणाला त्रास देऊ नये. शासनाने व पोलिसांनी आरोपांचा सखोल तपास करून महिलांना न्याय द्यावा. - जगदीश तेजवानी, उल्हासनगर>जे अयोग्य आहे, त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही आणि ते कुणी करूही नये. हा प्रकार नकारात्मक प्रवृत्तीचा आणि फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा एक सोपा पर्याय आहे. त्यामुळे समाजानेही याबाबत विचार केला पाहिजे. न्यायव्यवस्था, पोलीस आणि प्रसारमाध्यमे यासारख्या यंत्रणांनी योग्य आणि अयोग्य याबाबत पडताळणी करणे गरजेचे आहे.-विश्वासराव पाटील, ठाणे>असे अनुभव येत असणारच. हे काही आताचे नाही. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. त्याची घृणा येते. अनेकदा महिला उघडपणे बोलू शकत नाहीत. एकीकडे तिला देवीसमान मानायचे आणि दुसरीकडे तिच्याविषयी वक्तव्ये करायची, हे योग्य नाहीच. हे असेच सुरू राहिले, तर कुणी कुणावरच विश्वास ठेवणार नाही. समाजमन नष्ट झाले आहे. याला राजकीय मंडळी खतपाणी घालत असतील, तर ते आणखीनच भयंकर आहे.- अंजली मनोहर गचके, डोंबिवली>काही प्रकरणांमध्ये चूक दोघांचीही असते. जो शोषण करतो त्याची आणि जो सहन करतो, तोही चुकीचाच. आवाज न उठवणे, ही त्या व्यक्तीची चूक असते. शाळांमध्ये मूल्यशिक्षणाची तासिका होती, ती आता बंद करण्यात आली आहे. त्यातून संस्कार शिकवले जायचे. समाजामध्ये कसे वागावे, हे नकळत शिकवले जायचे. ती तासिका पुन्हा सुरू व्हायला हवी. - प्राची संदीप भावे, डोंबिवली>मी-टू मुळे सिनेक्षेत्रात खळबळ उडून काही जणांवर गुन्हे दाखल झाले. महिलांनी अत्याचाराला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून स्वागत व्हायला हवे. तरच, सर्वसामान्य महिला अत्याचाराविरोधात उभ्या ठाकतील. अत्याचार झालेल्या महिला एवढी वर्षे गप्प का, असा प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडू नये. त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी गप्प राहणे पसंत केले असावे. याचा अर्थ असा नव्हे की, त्यांनी आयुष्यभर गप्प बसावे. मात्र, यामध्ये महिलांनी पूर्वग्रहदूषित भावना ठेवून कुणाला टार्गेट करू नये. - परमानंद गिरेजा, उल्हासनगर>हॉलिवूडचे वारे वेगाने बॉलिवूडमध्ये शिरले. प्रत्येक क्षेत्रात महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यानंतर त्यांच्यावर टाकण्यात येणाºया दबावाला आता वाचा फुटत आहे. हे अतिशय आवश्यक होते. एकीकडे नवरात्रीत दुर्गेची पूजा केली जाते. स्त्रीशक्तीला नमस्कार केला जातो. दुसरीकडे महिलांवर आजही अत्याचार होत आहेत, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. मोठ्या चेहºयांमागे दडलेले खरे चेहरे जगासमोर येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. यात किती तथ्य आहे, याचा तपास झाला पाहिजे. ज्या महिलांनी आरोप केलेत, त्या कोणत्याही चित्रपट किंवा मालिकांमध्ये दिसत नाहीत. इतकी वर्षे गप्प राहून अचानक आरोप करण्यामागे वेगळे कारण किंवा पब्लिसिटी स्टंट आहे का, हे तपासणे सर्वांच्या
‘मी-टू’ हे तर दुधारी शस्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 3:34 AM