शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

स्टार्ट अप्सच्या तोट्यामागचं अर्थकारण

By admin | Published: March 27, 2016 12:30 AM

स्टार्ट अप्सच्या सक्सेस स्टोरीज्बद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. मात्र जवळपास सगळेच स्टार्ट अप्स तोट्यात आहेत. स्टार्ट अप्स करोडोंची फंडिंग आणि लाखोंच्या संख्येने दरवर्षी ग्राहक

(स्मार्ट-स्टार्ट)- कुणाल गडहिरे स्टार्ट अप्सच्या सक्सेस स्टोरीज्बद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. मात्र जवळपास सगळेच स्टार्ट अप्स तोट्यात आहेत. स्टार्ट अप्स करोडोंची फंडिंग आणि लाखोंच्या संख्येने दरवर्षी ग्राहक मिळवत असतानासुद्धा ते तोट्यात कसे, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. याचा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येते की स्टार्ट अप्स जाणीवपूर्वक हा तोटा सहन करत आहेत. मुळात स्टार्ट अप्स कंपन्या ग्राहकांना त्यांची एक प्रकारे सवय लावत आहेत. त्यांच्या आॅनलाइन शॉपिंगच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास करून जाणीवपूर्वक घडवले जात आहे.आपण देत असलेल्या सेवा या ग्राहकांना एकमेव पर्याय ठरल्या पाहिजेत हा व्यापक दृष्टिकोन स्टार्ट अप्स आपल्या नजरेसमोर ठेवत आहेत. भविष्यातील फायदा नजरेसमोर ठेवून सुरुवातीपासून ग्राहक मिळवण्याकडे लक्ष दिले जात आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि बाजारात आपलं वर्चस्व राहावं यासाठी स्टार्ट अप्स मोठ्या डिस्काउंट आॅफर्सचा कल्पकतेने वापर करत आहेत. या डिस्काउंट आॅफर्समुळे त्यांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागतो. या सर्व प्रक्रियेतून ग्राहक मिळवण्यासाठी जो एकूण खर्च येतो त्याला कस्टमर अ‍ॅक्विजिशन कॉस्ट (उ४२३ङ्मेी१ अू०४्र२्र३्रङ्मल्ल उङ्म२३ - ग्राहक मिळवण्यासाठी येणारा खर्च) म्हणतात. सध्या प्रत्येक स्टार्ट अप्सची जाहिरातीची गणितं ही या ग्राहक मिळवण्यासाठी येणाऱ्या खर्चाला केंद्रस्थानी ठेवून आखण्यात येतात. स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार या खर्चाचा गांभीर्याने विचार करतात. किंबहुना हा खर्च आवाक्याबाहेर गेल्याने अनेक चांगले स्टार्ट अप्स बंद पडतात. भारतातील टॅक्सी फॉर शुअर हे अशा प्रकारे बंद पडलेल्या स्टार्ट अप्सचं उत्तम उदाहरण आहे. टॅक्सी फॉर शुअरला त्याच क्षेत्रातील ओला कॅब्स या मोठ्या स्टार्ट अप्सने विकत घेतलं. टॅक्सी फॉर शुअर या कंपनीचे ओला कॅब्समध्ये विलीनीकरण होण्यापूर्वी या दोन्ही कंपन्यांमध्ये ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जास्तीतजास्त डिस्काउंट देण्याची स्पर्धा चांगलीच रंगली होती. दोन्ही कंपन्यांना यामुळे प्रचंड तोटा सहन करावा लागत होता. मात्र भरपूर मोठ्या प्रमाणावर फंडिंग असल्याने ओला कॅब्स या स्पर्धेत टिकून राहिली तर पैसे संपल्याने टॅक्सी फॉर शुअरला माघार घ्यावी लागली आणि अखेरीस त्यांना आपली कंपनी, प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या ओला कॅब्सलाच विकावी लागली. अशा प्रकारे तोटा सहन करून ग्राहक मिळवण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भविष्यात मोठ्या प्रमाणावर फंडिंग मिळविण्यासाठी मोठ्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करणे हे आहे. आजकाल प्रत्येकाच्या मोबाइलवर असणारे व्हॉट्स अ‍ॅप आणि अतिशय वेगाने वाढत असणारे इन्स्टाग्राम ही दोन्ही स्टार्ट अप्सची महत्त्वाची उदाहरणे आहेत. फेसबुकने या दोघांनाही विकत घेतले ते, ही दोन्ही एप्लिकेशन वापरणाऱ्यांच्या संख्येमुळे. फेसबुकपेक्षा व्हॉट्स अ‍ॅप नियमितपणे वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यांना व्यावसायिक स्पर्धेत हरवणे हे अशक्य ठरत होते. एसएमएस पाठवणे व्हॉट्स अ‍ॅपमुळे जवळपास बंदच झाले होते. २०१३ साली व्हॉट्स अ‍ॅपला सुमारे १३८ मिलियन अमेरिकन डॉलर इतका तर २०१४ला २३२ मिलियन अमेरिकन डॉलर इतका तोटा झाला होता. अशा वेळी कंपनीलासुद्धा भक्कम आधार हवा होता. इन्स्टाग्रामच्या बाबतीतसुद्धा अशीच परिस्थिती होती. या वेळी या दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास जगभरातील गुंतवणूकदार उत्सुक होते. मात्र फेसबुकने या दोन्ही कंपन्यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व राखून ठेवण्यासोबत आणखी वाढ करण्यासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन देऊन विकत घेतले. इन्स्टाग्रामने २०१५पासून जाहिरातींच्या माध्यमातून नफा कमवायला सुरुवात केली आहे. तर व्हॉट्स अ‍ॅप मात्र अजूनही नफ्यापेक्षा आणखी वापरकर्ते मिळवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. फक्त काही मोजक्या ठिकाणी त्यांनी वर्षाला नाममात्र एक डॉलर इतके शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. स्टार्ट अप्सच्या तोट्यामागच्या अर्थकारणामागे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची मूल्यांकन करण्याची पद्धत. स्टार्ट अप्स विद्यमान परिस्थतीत किती नफा कमवत आहेत किंवा किती तोटा सहन करतात याला दुय्यम स्थान दिले जाते. स्टार्ट अप्सचे मूल्यांकन करताना, त्यांची भविष्यात नफा कमावण्याची क्षमता नेमकी किती आहे ही गोष्ट प्राधान्याने विचारात घेतली जाते. मुळात स्टार्ट अप्स इकोसिस्टम अगदी प्रारंभिक अवस्थेत आहे. इंटरनेटवर आधारित बिझनेसची सुरुवात झाली होती तेव्हासुद्धा डॉट कॉमचा फुगा फुटणार अशी चर्चा होती. मात्र तेव्हा सुरू झालेल्या कंपन्याचे भवितव्य हे वेगाने बदलत असलेल्या टप्प्यावर टिकून राहण्याच्या त्यांच्या क्षमतेने ठरवले होते. या अनुभवातून व्यावसायिक गुंतवणूकदार आणखी प्रगल्भ झाले आहेत. आत्ताच्या स्टार्ट अप्स कंपन्यांचे भवितव्यसुद्धा त्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्याच्या क्षमतेवरच अवलंबून असणार आहे. यामुळेच तोट्यात असतानासुद्धा अनेकवेळा गुंतवणूकदार स्टार्ट अप्सला आर्थिक पाठिंबा देत आहेत.मार्च २०१५ साली संपलेल्या आर्थिक वर्षात भारतातील सर्वांत मोठ्या २२ स्टार्ट अप्स कंपन्यांनी जाहीर केलेली आर्थिक उलाढाल १६ हजार १९९ कोटी होती. या कंपन्यांचा एकत्रित तोटा हा सुमारे सात हजार आठशे करोड इतका होता. मार्च २०१६पर्यंत तोट्याची आकडेवारी यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. असा तोटा सहन करण्यामागचे एक कारण म्हणजे ग्राहकाच्या एखादी वस्तू खरेदी करण्याच्या सवयीचा बारकाईने अभ्यास करणे आहे.