शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मेगाभरती उठली मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 22:23 IST

भाजपचे संख्याबळ १२२ वरुन १०५ वर आले. ६३ वरुन ५६ वर आल्याने सेनेचेही बळ घटले.

मिलिंद कुलकर्णीयशाचे श्रेय अनेक जण घेतात, पण अपयशाला कोणीही वाली नसतो अशा आशयाची म्हण आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्याची आठवण हमखास मराठी जनांना येत आहे. भाजपचे संख्याबळ १२२ वरुन १०५ वर आले. ६३ वरुन ५६ वर आल्याने सेनेचेही बळ घटले. पाच वर्षे सत्तेत राहून आणि युती म्हणून मतदारांना सामोरे गेल्यावर असा निकाल येत असेल तर याची जबाबदारी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी. परंतु, तसे होताना दिसत नाही. बहुमत मिळविल्याचा आनंद साजरा करताना काही फसलेल्या रणनीतीकडे साफ डोळेझाक केली जात आहे.भाजप आणि सेना या दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या तोंडावर मेगाभरती केली. जळगाव, धुळे, नाशिक महापालिका निवडणुकीत हाच फॉर्म्युला वापरण्यात आला आणि तो यशस्वी ठरला. तोच कित्ता विधानसभा निवडणुकीत गिरवायचा ठरवला, परंतु, जनमानसाचा अंदाज घेताना दोन्ही पक्षाचे धुरीण चुकले. एकीकडे समाजातील सर्वच घटकांमध्ये सरकारविरोधी वातावरण होते. ते कमी करण्यासाठी फार तर तुम्ही काही उमेदवार बदलून पक्षातील निष्ठावंत, नवे चेहरे दिले असते तर एकवेळ चालून गेले असते. परंतु, काँग्रेस-राष्टÑवादीमधील प्रस्थापित नेत्यांना घेऊन सत्ताधारी पक्ष निवडणुकीला सामोरे गेला आणि नाराजी दुप्पट वेगाने मतदान यंत्रात नोंदविली गेली.खान्देशातील उदाहरणे घेऊया. शिरपूरचे अमरीशभाई पटेल यांना भाजपमध्ये घेण्यात आले. धुळ्यात माजी केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे दिग्गज नेते असताना आणखी एका वजनदार नेत्याचा प्रवेश झाला. साक्रीत पटेल व रावल यांनी मंजुळा गावीत यांना डावलून मोहन सूर्यवंशी या निवृत्त अभियंत्याला तिकीट दिले. धुळे शहर मतदारसंघातील घोळ अद्याप भल्याभल्यांना उमजत नाही. खासदार, आमदार आणि महापालिका भाजपच्या ताब्यात असताना ही जागा शिवसेनेला सोडताना कोणता तर्क लावला गेला हे कळायला मार्ग नाही. शेजारील जळगावात अशीच स्थिती असताना भाजपने सेनेची मागणी असूनही जागा सोडली नाही. बरे, सेनेला सोडली तर पटेल गटाचे राजवर्धन कदमबांडे यांना अपक्ष म्हणून उभे करण्यात आले. त्यांना पक्षाच्या नेत्यांनी उघड बळ दिले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ.फारुक शाह यांनी एमआयएमची उमेदवारी स्विकारली. हे सगळे अनिल गोटे यांना रोखण्यासाठी असेल, असे समर्थन केले जात असेल तर भाजपच्या हाती काय लागले? विश्वासघात, दगलबाज अशी शिवसेनेकडून झालेली संभावना, एमआयएमचा उमेदवार निवडून आल्याने हिंदू व्होट बँकेला बसलेला धक्का आणि भाजपविषयी निर्माण झालेली नाराजीची लाट. याठिकाणी भाजप नेत्यांची रणनीती पुरती फसली.दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवून पराभूत झालेल्या, भाजपच्या पहिल्या महिला महापौर म्हणून ओळखल्या जाणाºया अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांनी पक्षनेत्यांना बोल लावत शिवसेनेला समर्थन दिले, ही मोठी चपराक आहे. डॉ.जितेंद्र ठाकूर पराभूत झाले असले तरी भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला गेला हे दुर्लक्षून चालणार नाही. एवढे सगळे करुन भाजपचे संख्याबळ २०१४ मध्ये होते, तेवढेच दोन राहिले. मग मिळविले काय, याचा विचार होण्याची शक्यता तशी कमीच आहे.तिकडे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत व त्यांचे पूत्र जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. नवापूरमध्ये भरत तिसºया क्रमांकावर राहिले. भाजपचे दुसरे नेते डॉ.विजयकुमार गावीत यांचे बंधू हे त्याठिकाणी दुसºया क्रमांकावर राहिले. मग भरत यांच्याऐवजी शरद यांना उमेदवारी का दिली गेली नाही? असा प्रश्न उपस्थित होतोच. डॉ.गावीत यांचे शालक जगदीश वळवी हे गेल्या निवडणुकीत चोपड्यात भाजपचे उमेदवार होते, यंदा ते राष्टÑवादीतर्फे लढले. अर्थात पराभूत झाले. तिकडे नाशिक जिल्ह्यात भरत गावीत यांच्या भगिनी आमदार निर्मला गावीत यांनी काँग्रेस सोडून सेनेचे शिवबंधन बांधले. पण मतदारांनी दोन्ही भावंडांना नाकारले.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी सेनेत आले, पण तरीही नंदुरबार जिल्ह्यात सेनेचा पहिला आमदार निवडून येऊ शकला नाही. काँग्रेसच्या के.सी.पाडवी यांनी विक्रम नोंदविला.अमळनेर हा भाजपचा गड असताना सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. दोन वेळा भाजपकडून पराभूत झालेले अनिल भाईदास पाटील यंदा राष्टÑवादीकडून नशिब अजमावत असताना मतदारांनी त्यांच्या पदरात यश घातले.मतदारांनी दिलेल्या कौलाचा दोन्ही सत्ताधारी पक्षांनी अभ्यास केला तर पुढील वाटचाल सुकर राहील. अन्यथा येरे माझ्या मागल्या, असेच होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव