- प्रसाद ताम्हनकरअनोखे लग्न : अमेरिकेच्या लास वेगास शहरात एक लग्नसोहळा रंगला होता. लिटिल वेगासचे पादरी जातीने लग्न लावण्यासाठी हजर होते. नवरदेव एरॉन चेर्वेर्नाक अत्यंत खुशीत होता. पण या सगळ्यात अनोखे काय होते? हे नवरदेव एरॉन चेवेर्नाक चक्क स्मार्टफोनशी लग्न करत होते. आहे ना अनोखी बात? द लिटिल लास वेगास या चॅपलचा मालक मायकल केली याच्या हवाल्याने अनेक वृत्तसंस्थांनी ही अनोख्या लग्नाची गोष्ट छापली आहे. केलीच्या मते आधी सगळ्यांना हा सोहळा बघून आश्चर्यच वाटले, मात्र ‘ठीक आहे.. असेदेखील घडते’ असे म्हणत सगळ्यांनी त्याचा आनंददेखील लुटला. पादरीनी चक्क एरॉन चेर्वेनाकला ‘एरॉन तू या स्मार्टफोनला कायद्यानं पत्नी मानतोस? तिचा सन्मान करतोस? तू तिच्यावर प्रेम करतोस,’ असे प्रश्न एकामागोमाग एक विचारले आणि एरॉननेदेखील, ‘हो.. मी असे करतो!’ असे सांगत या विधीच्या पूर्ततेला हातभार लावला. सध्या ह्या अनोख्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.ट्विटर डॅशबोर्ड : सध्या युवकांबरोबरच फेसबुक, ट्विटरसारख्या मातब्बर सोशल नेटवर्क्सनी आपले लक्ष आता छोट्या व्यावसायिकांवरतीदेखील केंद्रित केले आहे. अत्यंत कमी खर्चात त्यांना जाहिरातीसाठी आणि ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि सोशल स्पेस पुरवायची हे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. त्याचा त्यांना प्रचंड मोबदलादेखील मिळू लागला आहे. ट्विटरनेदेखील आता या क्षेत्रात एक पाऊल टाकत छोट्या व्यावसायिकांना डॅशबोर्ड हे अनोखे अॅप उपलब्ध करून दिले आहे. छोट्या व्यावसायिकांना टिष्ट्वटरवरचा जास्तीतजास्त उपयोग हा मनोरंजनापेक्षा, आपल्या व्यवसायाची जाहिरात आणि ग्राहकांशी थेट संवाद ह्यासाठी करायचा असतो. त्यांची हीच गरज लक्षात घेऊन विविध सोयींसह हे अॅप टिष्ट्वटरने दाखल केले आहे. वेब आणि आयएसओ दोन्ही प्रणाल्यांवरती हे उपलब्ध आहे. लवकरच हे अॅप एण्ड्रोइडसाठीदेखील ट्विटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.रोबोचे आधुनिक तंत्रज्ञान : ‘एक मशीन अर्थात रोबो, तुमच्या घरातली सर्व कामे झाडणे, पुसणे, कपड्याच्या घड्या इ. अगदी सराईतपणे करेल आणि तोच रोबो गरज पडला तर सीमेवरती एखाद्या कुशल जवानाचे कार्यदेखील पार पाडेल’ असे तुम्हाला सांगितले, तर तुम्ही कितपत विश्वास ठेवाल? मात्र अमेरिकेतील बोस्टन डायनॅमिक्सने असा उच्च तंत्रज्ञान असलेला रोबोट तयार करण्यात यश मिळविले आहे. त्याच्या सफाईदार हालचाली, कामाचा आवाका पाहून उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले. या रोबोटच्या हालचाली आणि तंत्रज्ञान अजून थोडे अद्ययावत करण्यासंदर्भात काही सूचना कंपनीला अमेरिकन संरक्षण दलातर्फे देण्यात आल्या आहेत. आता येत्या काळात हे रोबो सीमेवरती रक्षणाला उभे दिसले तरी आश्चर्य वाटायला नको.
आधुनिकतेचे फंडे
By admin | Published: July 03, 2016 2:40 AM