लोकमित्र
ज्येष्ठ पत्रकार
मोदींनी आपल्या कार्यक्रमाला ज्या पद्धतीने ‘मेगा शो’मध्ये पलटवले, ती त्यांच्या वाक्चातुर्याएवढीच त्यांच्या राजकीय दृष्टिकोनाची दय़ोतक आहे. 8क् पेक्षा अधिक देशांमध्ये त्याचे थेट प्रक्षेपण दाखविले गेले, हे सारेच अद्भुत आहे. मोदींनी हा समारंभ स्वत:पुरता ठेवला नाही. त्याला भारत महोत्सवाचे स्वरूप दिले.
आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले. जगज्जेत्या सिकंदराच्या भारतविजयाचे हे वर्णन आहे. परवा न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअरमधील नरेंद्र मोदी यांचा मेगा शो पाहिल्यावर काहीसे असेच शब्द ओठावर येतात. लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकामागून एक षट्कार मारीत सुटले आहेत. अमेरिकेच्या दौ:यातही ते माहोल बनवतील अशी अपेक्षा होतीच; पण तेथे त्यांना अपेक्षेपेक्षाही अधिक यश मिळाले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील त्यांचे ऐतिहासिक भाषण, त्यांनी केलेली जगाची कानउघाडणी आणि मग पाकिस्तानला सुनावलेले खडे बोल पाहिले, तर मोदींनी हा दौरा सहज खिशात टाकल्याचे लक्षात येते. पाकिस्तानला तर त्यांनी आपल्या भाषणात अजिबात भाव दिला नाही. उलट, नेमका प्रहार करून पाकिस्तानची उपस्थिती निर्थक करून टाकली.
न्यूयॉर्कचा चौक जगातल्या लोकप्रिय नेत्यांच्या लोकप्रियतेचे कसोटीस्थळ म्हणून ओळखला जातो. जगातले हे स्टेडियम सर्वाधिक महागडे आहे. प्रसिद्ध रॉकस्टार आपल्या गाण्यांच्या कार्यक्रमासाठी हे स्टेडियम वापरतात. त्यातून त्यांना आपली लोकप्रियता सिद्ध करायची असते. राजकीय पुढारी हे स्टेडियम वापरण्याची सहसा हिंमत करीत नाहीत. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे मात्र हे स्टेडियम गाजवून गेले आहेत. विदेशी नेत्यांमध्ये मोदींशिवाय कुणाला या स्टेडियममध्ये भाषण करण्याची संधी मिळाली नाही. इथल्या लोकांच्या त्यांच्याविषयी असलेल्या अपेक्षा त्यांनी दामदुपटीने पूर्ण केल्या. अवघ्या चार महिन्यांत मोदींनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची जगावर मोहिनी घातली आहे तिला तोड नाही. पंतप्रधान म्हणून मोदी उद्या काही दिवे लावू शकले नाहीत, तरी ते लोकप्रिय पंतप्रधान म्हणून ओळखले जातील. भारत महाशक्ती व्हायला निघालाय, एकविसावे शतक भारताचे आहे.. असे खूप बोलले जाते. मोदी या गोष्टी प्रत्यक्षात साकार करतील, असा विश्वास त्यांच्या आतार्पयतच्या देहबोलीतून प्रगट होतो.
मेडिसन स्क्वेअर मोदींनी जिंकणो, ही एक ऐतिहासिक घटना आहे. खरे तर मोदींच्या भाषणात वेगळे व जादूमय असे काही नव्हते; पण ते जे काही बोलले ते ठाम विश्वासाने आणि स्पष्टपणाने बोलले. त्यांचे बोलणो मंतरलेले असते. त्यांचे भाषण म्हणजे शब्दनक्षत्रंच्या शर्यती असतात. मोदींनी आपल्या कार्यक्रमाला ज्या पद्धतीने ‘मेगा शो’मध्ये परिवर्तित केले, ती पद्धती त्यांच्या वाक्चातुर्याएवढीच त्यांच्या राजकीय दृष्टिकोनाचे द्योतक आहे. मेडिसन स्क्वेअरमध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, 8क्पेक्षा अधिक देशांमध्ये त्याचे थेट प्रक्षेपण दाखवले गेले, हे सारेच अद्भुत आहे. मोदींनी हा समारंभ स्वत:पुरता ठेवला नाही. त्याला भारत महोत्सवाचे स्वरूप दिले. अमेरिकेत ‘भारत माता की जय’ हे नारे अमेरिकेने प्रथमच एवढय़ा बुलंद आवाजात ऐकले असतील. खुद्द मोदी अशा पद्धतीने बोलत होते, की जणू अहमदाबाद किंवा भारतातल्याच कुण्या शहरात बोलत आहेत.
तसे पाहिले तर त्यांचे भाषण मुख्यत्वे अनिवासी भारतीयांसाठी होते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी ते बोलले. त्यांच्या भाषणाविषयी जगभर प्रचंड उत्सुकता होती. मोदीही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बोलले. त्यांनी अनिवासी भारतीयांच्या समस्या, त्यांची स्वप्ने तर रंगवलीच; पण सहजपणो भारताचा विचार, भारताची गरज आणि भूमिकाही मांडली. बोलता-बोलता त्यांनी जगालाही युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. अनिवासी भारतीयांना त्यांनी फार काही दिले नाही; पण त्यांचे वाक्चातुर्य, हजरजबाबीपणा, दूरदृष्टी यांवर लोक फिदा होते. मोदींनी त्यांच्या भावनेला हात घालताना मातृभूमीविषयीच्या बांधिलकीची आठवण करून दिली. भारताच्या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. घरचे कार्य असल्याप्रमाणो ते बोलत होते. प्रथमच कुणी पंतप्रधान कळकळीने देशाची केस जगापुढे मांडताना दिसला. बोलता-बोलता त्यांनी जगालाही दोन गोष्टी ऐकवल्या. संपूर्ण जगाला भारताची आवश्यकता आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारताची बाजारपेठ सर्वात मोठी आहे आणि इथली लोकशाही जिवंत आहे.. भारताची ही दोन बलस्थाने मोदींनी खणखणीतपणो वाजवून सांगितली. तुम्हाला आपला माल खपवण्यासाठी भारतातच यावे लागेल, असे त्यांना सांगायचे होते. जग म्हातारे होत चालले आहे; पण भारत हा तरुणांचा देश आहे, हेही सांगायला ते विसरले नाहीत. आमच्या मनुष्यबळावर उद्याचे जग विसंबून असेल, असे त्यांना सुचवायचे होते. एकतर्फी फायद्याची गणिते आता चालणार नाहीत, असाही त्यांनी इशारा दिला. भारताचे महत्त्व, भारताची शक्ती आणि उद्याचा भारत मोदींनी जगापुढे मांडला. मोदी हवेत बोलत नाहीत. पूर्ण विचार करून बोलतात. त्यामागे गृहपाठ असतो. निश्चित व्यूहरचना असते. त्यामुळेच मोदींचा शब्द जग गंभीरपणो घेऊ लागले आहे.