शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
3
Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा
4
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
5
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
6
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
7
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
8
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
9
बर्थडे दिवशी किंग कोहलीचा खास अंदाज; अनुष्कासोबत या ठिकाणी झाला स्पॉट (VIDEO)
10
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
11
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
12
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
13
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
14
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
15
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
17
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
20
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत

मोसादचा धाक आणि भारतीय 'जेम्स बॉंड...'!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 6:07 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना 'जेम्स बॉंड' ठरवणारा मोठा वर्ग भारतात आहे...

- सुकृत करंदीकर- 

भारतात कुठेही दहशतवादी हल्ला झाला की हटकून नाव घेतले जाते ते इस्रायलच्या मोसाद किंवा अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थांचे. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात, केव्हाही जे हवे ते घडवून आणू शकणारी संघटना अशीच मोसाद किंवा सीआयए यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. ती किती अवास्तव, अतिशयोक्त आणि सत्य किती याचा धांडोळा घेणे आवश्यक आहे. भारतातल्या राष्ट्रवाद्यांना आणि त्यातही हिंदुत्त्ववाद्यांना इस्रायल आणि मोसादचे कमालीचे कौतुक आहे. त्या मागचे एकमेव कारण म्हणजे इस्रायलची सगळी शत्रुराष्ट्रे अरब-मुस्लिम आहेत. ही बाब अगदीच खरी आहे, की डेव्हिड बेन गुरियन यांच्या नेतृत्त्वाखाली १४ मे १९४८ मध्ये जेव्हा स्टेट ऑफ इस्रायल अस्तित्त्वात आले, त्या क्षणापासून या नवजात राष्ट्राच्या नरडीचा घोट घेण्यासाठी अनेकजण आसुसले होते. इस्रायल या ज्यू राष्ट्राचा जन्म सीमेवरच्या एकाही मुस्लिम राष्ट्राला किंबहुना त्या संपूर्ण मध्य आशियालाच अमान्य होता. मध्य आशियातल्या अरब-मुस्लिमांच्या दृष्टीने इस्रायल हे अतिक्रमण आहे. इस्रायलच्या माथ्यावर उत्तर दिशेला लेबनॉन आणि सिरिया हे दोन देश आहेत. पुवेर्ला जॉर्डन आहे. पश्चिम सीमेवर इजिप्त वसला आहे. या देशांच्या पल्याड सौदी अरेबिया, इराक, इराण आहेत. यातल्या बहुतेक देश इस्रायल-ज्यूंचे कडवे शत्रू आहेत. तरीही या सगळ्या अरब-मुस्लिमांचा कमालीचा विरोध, टोकाचा तिरस्कार आणि द्वेष झेलत इस्रायल १९४८ पासून या भूभागात पाय रोवून ठामपणे उभा आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अशी परिस्थिती कोणत्याच राष्ट्राच्या स्थैयार्साठी चांगली नसते. तरीही गेली सत्तर वर्षे इस्रायल टिकून आहे.  इस्रायलची, ज्युंची कडवी देशभक्ती आणि तिखट धर्मनिष्ठा नवल करण्याजोगी आहे. याच्याच जोडीला मोसादच्या हिकमती, धाडसी इंटेलिजन्सची भक्कम साथ आहे. 

दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात युरोपात ज्युंची हत्यांकांडे घडवून आणणारा हिटलरनिष्ठ अ‍ॅडॉल्फ आईशमन १९४५ नंतर पृथ्वीवरुन जणू गायबच झाला होता. पण मोसादने त्याचा पिछा सोडला नाही. पासपोर्ट, ओळख, नाव बदलून अर्जेंटिनात दडून राहिलेल्या आईशमनपर्यंत मोसादचे हात पोहोचण्यास पंधरा वर्षे लागली. अथक प्रयत्नांनंतर १९६० मध्ये आईशमनला मोसादने अर्जेंटिनात जेरबंद केले. अर्जेंटिनाच्या सरकारला चकमा देत विमानाने ते त्याला इस्रायलमध्ये घेऊन आले. आईशमनच्या विरोधातले  युद्ध गुन्हे इस्रायली कोर्टात सिद्ध करुन त्याला रितसर फासावर चढवूनच मोसाद शांत झाली. मोसादच्या अचूक हेरगिरीमुळे इस्रायली सैन्याने १९६७ मधे अवघ्या सहा दिवसात सर्वार्थाने  तगड्या आणि बलिष्ठ अरबांना धूळ चारली होती. या सिक्स डे वॉरने अरबांची नाचक्की झाली होती. जर्मनीतल्या १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिक स्पधेर्साठी म्युनिक येथे दाखल झालेल्या ११ इस्रायली खेळाडूंची हत्या पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी घडवून आणली. त्यानंतर तत्कालीन इस्रायली पंतप्रधान गोल्डा मायर यांनी संबंधित खुन्यांना जगात असतील तेथून शोधण्याचे आणि त्यांना संपवण्याचे आदेश मोसादला दिले. मोसादने पुढच्या काही वर्षात त्याची पूर्तता केली. मोसाद बद्दलच्या या आणि अशा अनेक कहाण्या प्रसृत आहेत. त्यांनी कित्येक हॉलीवुडपट आणि थरारक कादंबऱ्यांना जन्म दिला आहे. मोसादची कारस्थाने, या संघटनेबद्दलच्या वदंता, त्यांच्या शौर्याच्या खऱ्या -खोट्या कहाण्या हा नेहमीच कुतुहलाचा विषय ठरला आहे.इस्रायलचा इतिहास आणि त्यांचे राजकीय व भौगोलिक स्थानच असे आहे, की हा देश सदोदित फडा काढून उभा राहिला तरच तो टिकून राहिल. पश्चिम आशियाच्या टोकावरची भूमध्य समुद्राला चिकटून असणारी चिंचोळी जमीन म्हणजे इस्रायल देश होय. भारताच्या तुलनेत तो अगदी चिमुकला. जेमतेम २१ हजार चौरस किलोमीटरपेक्षा कमी क्षेत्रफळाचा आख्खा इस्रायल फार तर पश्चिम महाराष्ट्रातल्या दोन-अडीच जिल्ह्यांइतका. ऐंशी लाख डोकी ही इस्रायलची लोकसंख्या मुंबईपेक्षाही कमी असणारी. त्यातही ज्यू या एकाच धमार्चे लोक ८२-८३ टक्के. उरलेले ख्रिश्चन आणि मुस्लिम. स्वाभाविकपणे इस्रायलने स्वत:च्या संरक्षणासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकाला तत्पर ठेवले आहे. इस्रायली नागरिकांना किमान कालावधीची सैन्यातली सेवा बंधनकारक आहे. एका अर्थाने प्रत्येक इस्रायली माजी सैनिक असतोच. इस्रायलमधली गाझा पट्टी ही पॅलेस्टिनी मुस्लिम आणि ज्यू यांच्या संघषार्चा केंद्रबिंदू आहे. माज्या पहिल्या इस्रायल दौऱ्यात जेरुसालेम, डेड सी पाहण्याचे मला जितके आकर्षण होते, तितकीच उत्सुकता मला गाझा पट्टीत जाण्याची होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मेक्सिकोच्या सीमेवर जशी अवाढव्य भिंत उभी करायची आहे, तशी भिंत इस्रायलने गाझा पट्टीत केव्हाच उभारली आहे. शिवाय या चिरेबंदी भिंतीला काटेरी कुंपणे, कॅमेरे, ड्रोन, शस्त्रसज्ज सैनिक, अवकाशातून उपग्रहाची नजर आदींचा जबरदस्त चिलखती बंदोबस्त आहे. समुद्री मार्गाने होणारी अत्यल्प वाहतूक वगळता तेल अविव येथील विमानतळ हाच इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचा अधिकृत राजमार्ग होय.वर्षाचे बारा महिने आणि दिवसाचे चोवीस तास हा देश कडेकोट पहाऱ्याने वेढलेला असतो. उत्तरेकडील सी ऑफ गॅलिलीच्या आसपासच्या टेकड्या असोत, की पश्चिमेचे नेगीव्ह वाळवंट असो, सीमेवरच्या प्रत्येक इंचावर डोळ्यात तेल घालून पहारा केला जातो. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. कुठलीही हालचाल त्यापासून लपत नाही. इस्रायली सैनिकांशी बोलत असताना एका अधिकाऱ्याने सांगितलेले एक वाक्य माज्या लक्षात राहिले. आमच्या अनुमतीशिवाय जमिनीवरुन एखादी मुंगी किंवा आकाशातले एखादे पाखरुसुद्धा आमची सीमा ओलांडून आत येऊ शकत नाही, असे तो म्हणाला होता.  अर्थात जगाच्या इतिहासातला कोणताही पहारा किंवा कसलीही सुरक्षा व्यवस्था अभेद्य राहू शकत नाही. केव्हा? तर जेव्हा स्वत:च्या जीवाची पर्वा नसलेले दहशतवादी आत्मघातकी हल्ले करतात तेव्हा. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, रशिया हे शक्तीशाली देशही आत्मघातकी हल्ल्यांचे बळी ठरत असल्याचे गेल्या दोन दशकांपासून सातत्याने दिसते आहे. इस्रायल याला अपवाद नाही. गेल्या पाच-सात वर्षात तर इस्रायलमध्ये अशा आत्मघातकी हल्यांची लाटच उसळली आहे. दस्तुरखुद्द राजधानी जेरुसलेम आत्मघातकी हल्ल्यांनी रक्तबंबाळ होते आहे. तीन वर्षांपूर्वी इस्रायली सैनिकांच्या ताफ्यात वेगवान ट्रक घुसवण्यात आला होता. त्यात चार सैनिक चिरडून मारले गेले तर तेरा जण जबर जखमी झाले. सिनेगॉगवर हल्ले झाले. इस्रायली पोलिस-सैनिकांना धारदार शस्त्राने भोसकण्याचे, सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करण्याचे प्रकार इस्रायलला थांबवता आलेले नाहीत. गेल्या दशकभरात पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्यांमध्ये मरण पावलेल्या इस्रायली सैनिक, पोलिस, नागरिकांची संख्या शेकड्यात आहे. जायबंदी त्या पेक्षा जास्त आहेत. अशा दहशतवादी आत्मघातकी हल्ल्यांचा सुगावा लावणे मोसादलाही शक्य होताना दिसत नाही. आत्मघातकी हल्लेखोरांन रोखणारी यंत्रणा, 'अलोन वुल्फ'चा खात्मा त्यांच्या उद्दिष्टपूर्ती आधीच करणे जवळपास अशक्य असते. मात्र, आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यामागे कोणत्या संघटनेचा हात आहे, त्यांचे स्थानिक साथीदार कोण, शस्त्रास्त्रे कुठून मिळवली, त्यांचे अन्य सहकारी कोण हा तपास करण्यासाठी जंग जंग पछाडण्यात इस्रायल वाकबगार आहे. दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढणे ही इस्रायलची ख्याती आहे. त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्याची त्यांची तयारी असते. एक इस्रायली मारला तर आमचा प्रयत्न शत्रुचे दहा मारण्याचा असतो, हे मला इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याने ऐकवले होते. इस्रायलींची ही विजिगिषू वृत्ती त्यांच्या शत्रुच्या मनात धाक निर्माण करणारी ठरते. मोसादचे एजंट, शत्रु राष्ट्रांमध्ये त्यांनी निर्माण केलेले धागेदोरे, जगभरातून माहिती मिळवण्याची त्यांची यंत्रणा, कारस्थाने रचण्याची पद्धत या सर्वांवर विपुल लेखन झालेले आहे. या पलीकडे जाऊन मोसाद किंवा सीआयए या नावाजलेल्या गुप्तचर यंत्रणांनी अफवांचा बाजार गरम करणारी प्रचंड व्यवस्था उभारल्याचेही ध्यानात घ्यावे लागते. भ्रम पसरवणे, संशयाचे धुके गडद करणे, सत्याचा अपलाप करणे, प्रतिमानिर्मिती, प्रतिमा भंजन, कपोल कल्पितांचे फुगे उडवणे, षडयंत्र रचणे, या सारखे खेळ गुप्तचर यंत्रणा खेळत असतात. मोसादचा धसका वाटावा, या हेतूने अशा अनेक गुढरम्य कानगोष्टी जगभर पसरवल्या जातात. त्या खऱ्या किती आणि खोट्या किती याचा शोध घेणेही मुश्किल ठरावे, इतका बेमालुमपणा त्यात असतो.

भारतासारख्या खंडप्राय देशातले धार्मिक-जातीय वैविध्य, आर्थिक विषमता आणि भाषा-भुगोल-संस्कृती यातली कमालीची तफावत लक्षात घेता उठसुठ मोसाद किंवा इस्रायलशी थेट तुलना करता येणार नाही. मोसादची उदाहरणे देऊन भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांच्या क्षमतांवर बोट ठेवणेही योग्य होणार नाही. परंतु, मोसादच्या विजिगिषू गुणाचा आदर्श तर जरुर ठेवावा लागेल. इस्रायली कडवेपणाचेही अनुकरण करावे लागेल. अचानक, अकल्पित, आश्चर्यकारक ठरणाऱ्या आत्मघातकी हल्ले रोखणे जवळपास अशक्यप्राय असल्याचे मान्य केल्यानंतर दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे काय, हा प्रश्न विचारावाच लागेल. यात भारतीय गुप्तचर यंत्रणा, तपास यंत्रणा किती यशस्वी ठरतात याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. नव्वदच्या दशकात मुंबईत बॉम्बस्फोट घडवणारा दाऊद कराचीत सुखैनैव स्थायिक झाल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणांना माहिती असते. अझर मसुदच्या कार्यक्रमांचे लाईव्ह टेलिकास्ट भारतात बसून पाहता येते. दाऊद, मसुदसारख्या अनेकांना भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांची जरब वाटत नाही, ही मोठी त्रुटी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना 'जेम्स बॉंड' ठरवणारा मोठा वर्ग भारतात आहे. डोवाल यांच्याकडून मोसादसारख्या कामगिरीची अपेक्षा धरता येईल का, हा प्रश्न आहे.   

-------(समाप्त)--------- 

टॅग्स :Puneपुणेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाAjit Dovalअजित डोवालNarendra Modiनरेंद्र मोदीIsraelइस्रायल