शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

नव्या शैक्षणिक धोरणाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य संशोधनाला चालना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 2:18 AM

हे नव्या शैक्षणिक धोरणाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणातील नॅशनल रिसर्च फाउंडेशनमुळे देशातील शैक्षणिक संस्थांमधील संशोधनाला निश्चितच चालना मिळेल. परंतु, या फाउंडेशनच्या माध्यमातून संशोधनासाठी दिला जाणारा अधिकाधिक निधी संशोधन संस्थांऐवजी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना द्यायला हवा. त्याचप्रमाणे फाउंडेशनच्या कामातही पारदर्शकता असणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही संशोधक होत नाही, तोपर्यंत तुम्हाला चांगला शिक्षक होता येत नाही, अशीच जगभर मानसिकता आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली तर निश्चितच विद्यापीठ व महाविद्यालय यांना चांगला फायदा होईल.

नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना संसदेकडून केली जाणार असल्याने ही संस्था स्वायत्त असेल. त्यासाठी सध्या केलेली वीस हजार कोटींची तरतूद ही चांगली बाब आहे. डीएसटी, डीबीटी, यूजीसी यांसारख्या संस्थांकडून संशोधनासाठी निधी मिळत आहे. मात्र, आयसर, आयआयटी, केंद्रीय विद्यापीठ, एनसीएल यांसारख्या संस्थांनाच या निधीचा ९० ते ८० टक्के लाभ मिळाला. विद्यापीठ व महाविद्यालयांना यातून फारसे काही मिळत नाही. त्यामुळे रिसर्च फाउंडेशनमधून केवळ शैक्षणिक संस्थांना निधी मिळणे महत्त्वाचे आहे. संशोधन प्रकल्पाची गुणवत्ता तपासूनच निधी दिला पाहिजे.रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून रिसर्च फेलोशीप, प्रोजेक्ट, सेमिनारसाठी निधी मिळणार आहे. विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील प्राध्यापक हे पूर्णवेळ संशोधन करीत नाहीत. विद्यार्थ्यांना शिकविणे यास ते पहिले प्राधान्य देतात व त्यांचे संशोधनाला दुसरे प्राधान्य असते. पूर्णवेळ संशोधनाला दिले जात नसल्यामुळे त्यांच्याकडून सादर केला जाणारा संशोधन प्रकल्प संशोधन संस्थेमधील संशोधकांच्या तुलनेत कमकुवत होतो. त्यामुळे संशोधन प्रस्ताव कसा तयार करावा, याबाबतचे प्रशिक्षण प्राध्यापकांना देण्याची आवश्यकता आहे.विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावर सुरू असलेल्या संशोधनाशी निगडित संदर्भ देण्यासाठी पुरेसे साहित्य उपलब्ध होत नाही. केंद्रीय विद्यापीठातआणि परदेशात संशोधन प्रकल्प तयार करण्याबाबतचे मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातीलकिंवा नव्याने संशोधन करू इच्छिणाºया संशोधकांना संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी येणाºया अडचणी दूर कराव्या लागतील. भारतातील एक किंवा दोन शिक्षण संस्था जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत याव्यात या दृष्टीने प्रयत्न करण्याऐवजी दोनशे-तीनशे संस्थांवरलक्ष केंद्रित करावे लागेल. केवळ विज्ञान शाखेतच नाही, तर सामाज विज्ञान शाखेतही विद्यार्थ्यांना चांगले संशोधन करता येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नॅशनल रिसर्च फाउंडेशनकडे सकारात्मकपणे पाहायला हवे. पुढील काळात संशोधनासाठी लागणाºया पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. प्रयोगशाळा, अत्याधुनिक यंत्रसामग्री, डिजिटल ग्रंथालये उपलब्ध होतील. त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायला हवा.

आतापर्यंत केवळ शासनाच्या संशोधन संस्थांनानिधी उपलब्ध होत होता. परंतु, आता सर्व विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना निधी उपलब्ध होणार आहे.तसेच सीएसआर कंपन्यांकडून दिला जाणारा निधीरिसर्च फाउंडेशनमध्ये जमा करता येणार आहे. त्यामुळेया निधीचा लाभ देशातील सर्वच शिक्षण संस्थांना मिळणार आहे.डॉ. वासुदेव गाडेमाजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र