शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

नैमित्तिक - डब्ल्यूटीओ करारातून बाहेर पडण्याचे फायदे तपासण्याची गरज!

By admin | Published: April 10, 2017 12:25 AM

केंद्र सरकारचा सध्या राष्ट्रीय खरेदी धोरण निर्मितीवर भर असल्याचे दिसून येत आहे. या नवीन धोरणात सरकारकडून साहित्य

केंद्र सरकारचा सध्या राष्ट्रीय खरेदी धोरण निर्मितीवर भर असल्याचे दिसून येत आहे. या नवीन धोरणात सरकारकडून साहित्य खरेदी केली जात असताना स्वदेशी पुरवठादारांना प्राधान्य दिले जाईल. समजा जर सरकारला दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी फाइल कव्हर खरेदी करायची असेल तर विदेशी पुरवठादार ते आठ रुपये प्रतिकव्हर या दराने द्यायला तयार आहेत. पण स्वदेशी पुरवठादार त्यासाठी दहा रुपये दराची मागणी करत आहेत. अशावेळी सरकार साहजिकच विदेशी पुरवठादाराला प्राधान्य देईल. पण स्वदेशी पुरवठादाराकडून कव्हर घेतल्यास त्याचे उत्पादन इथेच होत असते, देशात नोकऱ्या निर्माण होत असतात आणि करसुद्धा इथेच जमा होत असतो. यामुळे विदेशी पुरवठादारामुळे सरकारचे आर्थिक नुकसानच होणार आहे. विदेशी पुरवठादारांकडून साहित्य खरेदी केल्यास त्यांचे उत्पादन वाढेल, ते तांत्रिक संशोधन वाढवतील आणि विदेशात उद्योजकता वाढेल. जर भारत सरकार फाइल कव्हर किंवा इतर साहित्य स्वदेशी पुरवठादाराकडून मागविले तर याच गोष्टी भारतातही वाढू शकतील. हेच तत्त्व मग विदेशी व्यापाराच्या संदर्भात लागू होते. जागतिक व्यापार संघटनेशी (डब्ल्यूटीओ) केलेल्या करारानुसार भारताला आयातीवरील कर कमी ठेवावे लागत आहेत. त्यामुळे विदेशी पुरवठादार त्यांचा माल कमी दरात इथे विकत असतात. त्याचा परिणाम असा होतो की स्वदेशी उद्योगांना त्याचा जबर फटका बसतो. चीनमधून आयात होणाऱ्या मालाचे उदाहरण याबाबतीत चपखल बसते. थोडावेळ आपण असे समजू या की, सरकारने आयातीचे कर वाढवले तर भारतीय बाजारात त्याच फाइल कव्हरची किंमत ८ वरून ११ रु पये प्रतिकव्हर होईल. अशावेळी मग बाजारातले ग्राहक स्वदेशी उत्पादकाच्या १० रुपये प्रतिकव्हरच्या पर्यायाची निवड करतील. असे घडले तर भारतात रोजगार निर्माण होईल, कर जमा होईल. ग्राहकसुद्धा विदेशी मालापेक्षा स्वस्त असलेल्या स्वदेशी मालाला प्राधान्य देईल. स्वदेशात निर्मित उत्पादनाच्या खपामुळे रोजगार निर्मिती होईलच; पण इथल्या नागरिकांना अनेक दृश्य-अदृश्य फायदे मिळतील. डब्ल्यूटीओचे सध्याचे नियम आयात करात वाढ करण्यास परवानगी देत नाहीत. तसे असले तरी स्वदेशी उत्पादकांकडून सरकारी कामाचे साहित्य घेण्यावर कुठलेही बंधन नाही. आपण एका बाजूला विदेशी बाजारपेठांमध्ये तर पोहोचूच शकतो, पण त्याचबरोबर स्वदेशी उत्पादकांना प्रोत्साहनसुद्धा देऊ शकतो. आपण जर आयात कर वाढवलेच तर आपले डब्ल्यूटीओचे सदस्यत्व जाण्याची शक्यता आहे. स्वदेशी उत्पादनाला प्राधान्य दिले तर ते देशाला फायदेशीर ठरेल. तसेच चित्र सरकारच्या प्रस्तावित राष्ट्रीय खरेदी धोरणातून दिसून येत आहे. यातून होणारा फायदा सरकारला बाजारपेठेतील खरेदीतून होईल. पण स्वदेशी बाजारपेठेतून खरेदी करण्यास प्राधान्य द्यायचे असेल तर आधी डब्ल्यूटीओ कराराच्या तरतुदींशी तडजोड करावी लागेल. म्हणून आपल्याला असेही मूल्यांकन करावे लागेल की स्वदेशी उत्पादकांना प्राधान्य देण्यात जास्त फायदा आहे की डब्ल्यूटीओच्या अख्यत्यारित राहणे जास्त फायद्याचे आहे. स्वदेशी उत्पादकांना प्राधान्य देऊन होणारा फायदा जास्त असेल तर निश्चितच आयात मालावरचा कर वाढवला पाहिजे, स्वदेशी उत्पादकांना प्राधान्य दिले गेले पाहिजे आणि गरज असेल तर डब्ल्यूटीओ करारातून बाहेर पडावे. माल, पेटंट संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक हे डब्ल्यूटीओचे चार स्तंभ आहेत. सध्या तरी डब्ल्यूटीओ करार दोन स्तंभांवर तयार करण्यात आला आहे. माल आणि पेटंट संरक्षण या त्या गोष्टी आहेत. प्रगत राष्ट्रे डब्ल्यूटीओच्या अख्यत्यारित राहून गुंतवणूक मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत, तर प्रगतिशील राष्ट्रे सेवा क्षेत्रात सहज प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या झाल्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टी. सामान्यत: भारताला मुक्त बाजारातून फायदा होत आहे. कार्पेट आणि औषधांसारख्या काही गोष्टींच्या निर्यातीतून तो फायदा होत आहे. पण पेटंट संरक्षणाच्या बाबतीत भारताला तोटाच होत आहे, कारण सर्वात जास्त पेटंट हे प्रगत देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे आहेत. आयात कर वाढवून स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यायचे किंवा नाही हा निर्णय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात असलेल्या पेटंटमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातला पैसा त्यांच्याच देशाकडे जातो किंवा नाही, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातून भारताला होणार फायदा जास्त आहे की कमी यावर अवलंबून आहे. केंद्र सरकारने तातडीने एक आयोग नेमून आंतरराष्ट्रीय व्यापारातून आणि पेटंटमुळे फायदा होतो किंवा तोटा याचा अभ्यास केला पाहिजे. जर आंतरराष्ट्रीय बाजारातून फायदा हा पेटंट गमावण्याच्या तोट्यापेक्षा कमी असेल तर आपण डब्ल्यूटीओ कराराच्या बाहेर यायलाच हवे. डॉ. भारत झुनझुनवाला(अर्थशास्त्राचे अध्यापक)