शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

नाना.. अण्णा.. अन् दादा.. परतीचे दोर कापले गेलेत !

By सचिन जवळकोटे | Published: September 29, 2019 8:59 AM

लगाव बत्ती..

- सचिन जवळकोटे

प्रिय सरकोलीकर, दुधनीकर अन् निमगावकर..पितृपक्ष संपला. मातृपक्ष तुमची वाट पाहतोय...कारण ऐन सणासुदीत तुम्ही घरदार अन् जीवाभावाचे कार्यकर्ते सोडून मुंबईत तळ ठोकून बसलात. युतीचे अघोषित उमेदवार प्रचाराच्या कामालाही लागले. तुम्हाला मात्र ‘चंदूदादा अन् देवेंद्रपंतां’नी प्रतीक्षेच्या कामाला लावलं. येत्या दोन-तीन दिवसात तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. तिकडं मुंबईत ‘कमळ’वाल्यांच्या मनात काहीही असेल; मात्र इकडं तुमच्या मतदारसंघातील सच्चा कार्यकर्त्यांच्या मनात काय काहूर माजलंय, हे तुम्हाला आता जाणून घ्यावंच लागेल...कारण परतीचे दोर तुम्ही केव्हाच कापून टाकलेत. 

  सरकोलीचे ‘भारतनाना’, दुधनीचे ‘सिद्धूअण्णा’ अन् निमगावचे ‘बबनदादा’ हे स्वत:च्या कर्तृत्वावर पुढे आलेले. तिघांनीही राजकारणात शून्यातून विश्व निर्माण केलेलं. पक्षांतर्गत विरोधकांवर मात करत समोरच्या पक्षाशी सातत्यानं संघर्ष केलेला. ‘भारतनानां’नी ‘थोरले दादा अकलूजकर’ यांचा पंढरपुरात पाडाव करून सोलापूरच्याराजकारणात न भूतो न भविष्यती असा विक्रम करून ठेवलेला. ‘सिद्धूअण्णां’नीही गृहराज्यमंत्रीपद मिळवून अक्कलकोटचं नाव अधिकच मोठ्ठं केलेलं. ‘बबनदादां’नीही एकेकाळी ‘भीमा-सीना’ पाण्यासाठी मंत्रीपदावर लाथ मारलेली. 

 जिल्ह्याच्या राजकारणात या तिघांचाही स्वत:चा असा वेगळा दबदबा. तरीही गेल्या एक महिन्यापासून ज्या पद्धतीनं या तिघांची ‘फिरवाफिरवी’ सत्ताधाऱ्यांकडून केली जातेय, ती तमाम कार्यकर्त्यांसाठी अत्यंत धक्कादायक. क्लेशकारक. सोलापूरच्या सभेत कोल्हापूर, सातारा अन् उस्मानाबादच्या नेत्यांना प्रवेश दिला जातो. व्यासपीठावर मोठ्या सन्मानानं बसविलं जातं; मात्र इथल्या भूमिपुत्रांना या कार्यक्रमापासून पद्धतशीरपणे बाजूला का ठेवलं जातं, हे न ओळखण्याइतपत कार्यकर्ते नक्कीच नसावेत भोळे...    त्यामुळं ‘सत्ताधाऱ्यांचे उंबरठे’ आणखी किती दिवस झिजवायचे, याचा निर्णय घ्यावाच लागेल आता या तिघांना. मात्र या तिघांचीही मानसिकता पुन्हा मातृपक्षाकडे जाण्याची नाहीच. ‘कमळ मिळालं नाही तर हरकत नाही, अपक्ष उभारू; परंतु हात किंवा घड्याळ नको’ या भूमिकेवर म्हणे हे नेते ठाम... कारण यांनी स्वत:च परतीचे दोन कापून टाकलेत. लगाव बत्ती...

खरे निष्ठावंत कोण......मालक की अण्णा ?

   यंदाच्या निवडणुकीत एक नवीनच शब्द अनेक नेत्यांच्या तोंडून ऐकू येतोय. तो म्हणजे ‘सर्व्हे’. तिकीट मागण्यासाठी गेलेल्या प्रत्येकाला ‘वर्षा’ किंवा ‘मातोश्री’वर एवढा एकच शब्द सांगितला जातोय. त्यामुळं इच्छुकांना जळी-स्थळी ‘सर्व्हे’ हाच शब्द दिसू लागलाय. परवा एका स्थानिक नेत्याच्या मुलानं हौसेनं नवीन टू-व्हिलर मागितली तेव्हा त्याला म्हणे पित्यानं शांतपणे सांगितलं,‘थांबऽऽ अगोदर आपण सर्व्हे करू. कुठल्या गाडीची प्रतिमा जनमानसात चांगली आहे. मग निर्णय घेऊ.’ लगाव बत्ती...

  असो. ‘मध्य’मध्येही ‘धनुष्यबाण’वाल्यांनी सर्व्हे केला. या ठिकाणी दोन तगडे इच्छुक. कुमठ्याचे ‘दिलीपमालक’ तर मुरारजीपेठेतले (सॉरीऽऽ विडी घरकुलमधले) ‘महेशअण्णा’. या ठिकाणी गुप्त ‘सर्व्हे’ करणाऱ्या टीमनं लोकांना म्हणे काही प्रश्न विचारले.1. या इच्छुक नेत्यांमध्ये सर्वाधिक निष्ठावान अन् प्रामाणिक कोण ?2. प्रत्येक गोष्टीत जाती-पातीचं राजकारण सर्वाधिक कोण करतं ?3. ठराविक कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यातच कोण रमतं?4. निवडणूक संपल्यानंतरही सर्वसामान्यांना थेट कोण भेटू शकतं ?5. साध्या-सुध्या कार्यकर्त्यांचे फोनही पटकन् कोण उचलतं ?6. आपल्या संस्थेत आपल्याच पै-पाहुण्यांची भरती कोण करतं ?

   ...आता या सर्व्हेचा रिपोर्ट तयार होऊन नुकताच वरपर्यंत पोहोचलाय. दोन-चार दिवसात जाहीरही होईल इथल्या उमेदवारीचा अंतिम निर्णय. तोपर्यंत शोधत बसायला हरकत नाही, आपण या साऱ्या प्रश्नांची उत्तरं. लगाव बत्ती...

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण