शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

असहिष्णू परिस्थिती बदलण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 7:23 AM

एकेकाळी भारतातील नागरिकांना आपण सहिष्णू असल्याचा गर्व असे. मात्र गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलू लागली आहे. समाजातील असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

एकेकाळी भारतातील नागरिकांना आपण सहिष्णू असल्याचा गर्व असे. मात्र गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलू लागली आहे. समाजातील असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. समाज मोठ्या प्रमाणात स्वार्थी व असहिष्णू होत चालला आहे. देश जेव्हा पारतंत्र्यात होता त्या वेळी समाज सहिष्णू व नि:स्वार्थी होता. त्यामुळे देशातून परकीय सत्तेला देशाबाहेर घालवणे शक्य झाले. मात्र, आता बदललेल्या परिस्थितीत समाजाचा कट्टरपणा, स्वार्थीपणा व असहिष्णुता सातत्याने वाढत चालल्याने देशाची वाटचाल विनाशाकडे चालली आहे. ही परिस्थिती तातडीने बदलण्याची व देशाला वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या समाजात असहिष्णुता वाढत असते तो समाज टिकू शकत नाही व देशावर आघात होऊ लागतात. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी सर्वांनी सक्रिय होण्याची गरज आहे.

सध्या देशात बापूजींना प्रत्येक बॅनरवर स्थान दिले जात आहे. मात्र बॅनरवर बापूजींची छबी झळकवताना त्यांच्या विचारांवर आचरण करण्याकडे मात्र सर्वांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे. याकडे कुणाचेच लक्ष नाही. बापूंना बॅनरवर स्थान देताना प्रत्यक्षात मनात मात्र बापूंच्या छबीऐवजी बापूंचा मारेकरी असलेल्या नथुरामची छबी आहे. बापूंचा केवळ दिखाव्यासाठी वापर करण्याऐवजी बापूंच्या आचारविचारांवर आचरण करण्याची गरज आहे. बापूंना स्वच्छता अत्यंत प्रिय होती. मात्र स्वच्छतेचा आग्रह धरताना बापू आत्मिक शुद्धी करण्याकडे जास्त लक्ष देत असत. सध्या मात्र त्याच्या विपरीत घडत आहे. गांधीवाद अंगीकारला जातो की नाही हे महत्त्वाचे आहे.

सध्या स्वच्छतेचे नाटक केले जात आहे. ज्या ठिकाणी खरोखर स्वच्छतेची गरज असते त्या ठिकाणी स्वच्छता करण्याऐवजी पूर्ण स्वच्छता असलेल्या ठिकाणीच स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. सत्ताधाऱ्यांना स्वच्छतेबाबत खरोखरच आस्था असेल तर आजही देशात अनेक ठिकाणी सफाईसाठी कामगारांना गलिच्छ गटारात उतरावे लागते. त्यांना पुरेशी साधनसामग्री पुरवली जात नाही. मनुष्याने केलेली घाण साफ करायला दुसºया मनुष्याला गटारात उतरावे लागणे यापेक्षा अधिक वाईट बाब नाही. मात्र त्याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. गटारात काम करणाºयांना विविध व्याधींमुळे हकनाक जीव गमवावा लागतो. मात्र त्यांच्या मृत्यूचे कोणालाही सोयरसुतक पडलेले नाही.

२ आॅक्टोबरला गांधीजींच्या मूर्तीसमोर केवळ हात जोडल्याने गांधीजींच्या विचारांचे पाईक होता येत नाही. त्यासाठी गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याची धमक दाखवावी लागते. परंतु, सध्या सर्व जण दुटप्पी भूमिकेत जगत असल्याने किती गंभीरतेने बापूंचे विचार अमलात आणले जात आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. गांधीवादावर आता कोणाची श्रद्धा राहिली आहे, हाच आता प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय स्वार्थासाठीच बापूंचा उपयोग झाला आहे व होत आहे. सध्या समाजाचा प्रत्यक्ष कार्यापेक्षा प्रतिमेवर जास्त विश्वास असल्याने प्रतिमानिर्मिती करण्याकडे सर्वांचा कल आहे. भिंतीवर महापुरु षांची तसबीर टांगली की आपली जबाबदारी संपली, असा विचार केला जात आहे. मात्र, प्रतिमेच्या प्रेमात पडण्याऐवजी व भिंतीवर तसबिरी टांगण्याऐवजी हृदयात महापुरुषांची प्रतिमा कोरली जावी यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. हृदयात प्रतिमा कोरली गेल्यावर त्या महापुरुषाच्या विचारांवर आपोआप आचरण केले जाते. एकीकडे बापूंचे नाव, त्यांची प्रतिमा वापरली जात असताना प्रत्यक्षात बापूंच्या मारेकºयांचे उदात्तीकरण केले जात आहे. नथुरामचे मंदिर उभारले जात आहे. मात्र आता या बाबीचे जास्त आश्चर्य आम्हाला वाटत नाही व त्यांचा द्वेष वाटत नाही. कारण मारेकºयांची पूजा करणे ही त्यांची संस्कृती आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांना आवडत नाहीत, त्यांना रावणाचा वध करणारे रामच आवडतात. हा प्रकार वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. नथुरामभक्तीमध्ये ते प्रामाणिक आहेत. त्यामध्ये दांभिकता दिसत नाही.

सध्या देशभक्तीलादेखील दिखाऊपणा आला आहे. आपली देशभक्ती नाटकी, प्रचारकी पद्धतीची झाली आहे. समाजाची एकरूपता कमी झाली आहे. नेहमी सुप्तावस्थेत असणारी आपली देशभक्ती पाकिस्तानसोबत युद्ध झाले किंवा भारत-पाक सामना असेल तर उफाळून येते. समाजातील जातीयता, धर्मांधता वाढू लागली आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत स्थानिक व परप्रांतीय असा भेद निर्माण करणे हा याच भूमिकेचा परिपाक आहे. प्रांतीयवाद, जातीयवाद, धर्मांधता यांचा कहर वाढून शेवटी देश-राष्ट्र म्हणून आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती असते, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. राजकीय लाभाच्या हेतूने विविध राजकीय पक्षांकडून अशा प्रवृत्तींना जाणीवपूर्वक वाढवले जात आहे. त्यामुळे समाजात विष पेरले जात आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या धुव्रीकरणामुळे समाज विभागला जात आहे. याचा नेमका लाभ नाझी-फॅसिस्ट शक्तींना मिळत आहे. राजकीय इच्छाशक्तीपुढे सामाजिक सलोखा नष्ट होत आहे. महापुरुषाचे अनुयायी बनण्याची पात्रता आपल्यात उरली आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. सत्ताधाºयांचे आदर्श कोण आहेत हे जगजाहीर आहे. मात्र तरीही बापू त्यांची मजबुरी आहेत. त्यांना वगळून पुढे जाता येणे अशक्य झाले आहे, ही गांधीवादाची शक्ती आहे.- तुषार गांधीमहात्मा गांधीजींचे पणतू,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी