शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

चेहरा वाचता येणे गरजेचे !

By किरण अग्रवाल | Published: November 09, 2017 7:31 AM

चेहरा वाचता येतो, असे नेहमी म्हटले जाते. बव्हंशी ते खरेही असते. कारण चेहरा कसाही असो, त्यावरील भाव बरेच काही बोलून जाणारे असतात.

चेहरा वाचता येतो, असे नेहमी म्हटले जाते. बव्हंशी ते खरेही असते. कारण चेहरा कसाही असो, त्यावरील भाव बरेच काही बोलून जाणारे असतात. आपापल्या आकलनानुसार ते भाव समजणे अगर जाणता येणे म्हणजेच चेहरा वाचता येणे. चेहरा व त्यावरील किंवा त्यामागील मुखवटा ओळखणे त्यामुळेच तर शक्य होते. पण हे चेहरा वाचन सर्वांनाच जमते असे नाही. जेव्हा ते जमत नाही किंवा चेहरा वाचता येत नाही, तेव्हा ठोकर खाणे स्वाभाविक ठरते. चेह-यांचे पुस्तक, म्हणजे ‘फेसबुक’च्या माध्यमातून ओळख-परिचय घडून आलेल्यांमध्ये फसवणुकीचे, गंडवणुकीचे वा बदनामी केल्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत ते त्यामुळेच. सोशल माध्यमांवरचे मित्र कितीही सज्ञान वा उच्चशिक्षित असले तरी, ते या चेहरे वाचनात अपयशीच ठरत असल्याचे या घटनांतून अधोरेखित होणारे आहे.

भ्रमणध्वनी व सोशल माध्यमांनी जग जवळच नव्हे तर मुठीत आणले आहे हे खरे, त्यातून माणूस नको तितका ‘सोशल’ झाला. अगदी गावातली किंवा गावाजवळचीच नव्हेे तर दूरदेशीची, दुरान्वयानेही कधी काही संपर्क-संबंध नसलेली व्यक्तीही फेसबुकसारख्या सोशल माध्यमावर परस्परांशी मैत्रीचे आवतण देण्यास व आलेले निमंत्रण स्वीकारण्यास आसुसलेली दिसून येते. खरा आहे की खोटा, याची फारशी फिकीर न बाळगता किंवा खात्री करून घेण्याच्या भानगडीत न पडता स्क्रीनवरचा चेहरा पाहून या माध्यमांवर अनेकांची मैत्री जुळते. मैत्रीतून ओळख, संपर्क, भेटीगाठी असे एकेक टप्पे ओलांडत विश्वासाची पातळी जेव्हा गाठली जाते, तेव्हा काहींचे हे मैत्रीचे बंध नात्यांमध्ये परिवर्तित होतात. काही जण त्यातून उद्योग-व्यवसायाच्या, भागीदारीच्या संधी शोधतात. यात ‘स्क्रीन’च्या माध्यमातून पुढे आलेला चेहरा नीट वाचता आला तर चांगले काही घडते. ‘फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्री जुळली अन् नंतर जुळल्या रेशीमगाठी’, सोशल माध्यमामुळे लाभला आधाराचा हात; यासारखे प्रकार त्यामुळे वाचावयास मिळतात. परंतु चेहरा वाचता आला नाही तर फसवणूकही घडून आल्याखेरीज राहात नाही. शिवाय काही प्रकरणांत बदनामीस सामोरे जावे लागून मनस्ताप सहन करण्याची वेळ येते. आता अशा सोशल माध्यमांद्वारे ओळख वाढवून गंडविले गेल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने या माध्यमांचा वापर सावधपणे केला जाणे गरजेचे ठरून गेले आहे.

हल्ली ‘कॅशलेस’ व्यवहार वाढविण्यासाठी प्रोत्साहित केले जात असताना दुसरीकडे तांत्रिक पद्धतीने किंवा आॅनलाइन फसवणुकीचे प्रकार घडून येऊ लागले आहेत. मुंबई, पुणेपाठोपाठ नाशकातही अशा स्वरूपाच्या घटना वरचेवर घडू लागल्याने खास ‘सायबर पोलीस ठाणे’ स्थापले गेले आहेत. यातच आता फेसबुक फ्रेंडशिप व चॅटिंगच्या माध्यमातून जवळीकता साधत फूस लावण्याचे व गंडविण्याचे प्रकार समोर येत आहेत. देशातील सायबर गुन्ह्यात महाराष्ट्र अव्वल असून, ‘सायबर दहशतवादा’चेही प्रकार येथे घडू लागले आहेत. नाशकातले उदाहरण घ्या, येथे सायबर पोलीस ठाणे सुरू झाल्यानंतर मे २०१७ पासून आतापर्यंत, म्हणजे ६ महिन्यात असे ३१ गुन्हे नोंदविले गेले असून, यात फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढवून फसवणूक व बदनामी केली गेल्याच्या १० गुन्ह्यांचा समावेश आहे. कॅन्सरसाठी औषध देतो असे सांगून फेसबुक फ्रेण्ड्सची सहानुभूती मिळवणाºया व नंतर त्यांच्याकडून पैसे उकळणाºया एका नायजेरीयन तरुणास मागे अटक केली गेली होती, तर व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्क वाढवून अश्लील संदेश पाठविणाºयास राजस्थानातून पकडून आणले होते. आता एका टीव्ही मालिकेत काम करणाºया अभिनेत्रीशी फेसबुकवरून ओळख वाढवून, ब्रिटनमध्ये हॉटेल सुरू करण्याचे आमिष दाखवत ठाणे येथील एका तरुणाने सुमारे अडीच लाख रुपयांस तिला लुबाडल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अर्थात, हे प्रकार यापुढील काळातही वाढणारच आहेत. कारण इंटरनेटवर टाइमपास करणाºयांची संख्या ४५ कोटींपेक्षा अधिक असून, २०२१ पर्यंत ती सुमारे ८० कोटींहून अधिक होण्याचा अंदाज न्यूज १८ लोकमत वृत्तवाहिनीने अलीकडेच वर्तविला आहे. त्यातून सायबर क्राइम वाढणे अगदी स्वाभाविक आहे. तेव्हा, प्रश्न आहे तो चेहरा वाचता येण्याचा. आपण परिचयातल्या, नातेसंबंधातल्या व प्रसंगी घरातल्या व्यक्तींशी तुसडेपणाने किंवा त्रयस्थपणे वागतो आणणि अनोळखींशी मात्र मैत्री वाढवतो. अशा मैत्रीत चेहरा वाचता येत नसेल तर धोका अगर अपघात टाळता येणे शक्यच नसते. ‘आ बैल मुझे मार’ या प्रकारात बसणारेच आहे हे सारे. पण, हे लक्षात घेणार कोण? त्यासाठी शासनाच्या चावडी वाचन योजनेप्रमाणे चेहरा वाचन कार्यक्रम राबविण्याची किंवा तसे प्रशिक्षण देण्याची गरज भासावी इतके हे प्रमाण वाढू पाहते आहे. तेव्हा सावधानता बाळगलेलीच बरी !

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया