शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

लोकशाहीच्या संरक्षणासाठी उभे राहण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 4:50 AM

या लोकसभा निवडणुकीत सक्षम व लोकशाही मूल्यांना मानणाऱ्या तगड्या उमेदवारांनाच निवडून द्यावे, असे नम्र आवाहन आम्ही जबाबदारीने व एकजुटीने करीत आहोत.

- विश्वास उटगीया लोकसभा निवडणुकीत सक्षम व लोकशाही मूल्यांना मानणाऱ्या तगड्या उमेदवारांनाच निवडून द्यावे, असे नम्र आवाहन आम्ही जबाबदारीने व एकजुटीने करीत आहोत. कामगार संघटनांनी यापूर्वी कधीही निवडणुकांमध्ये अशी राजकीय भूमिका घेतली नव्हती. मग याच वेळी हे आग्रहाचे आवाहन का?६ फेब्रुवारी, २०१९ रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने मुंबईत राज्यव्यापी परिषद घेऊन एकमताने ठराव करून, भाजप व शिवसेना युतीच्या उमेदवाराविरुद्ध मतदान व प्रचार करण्याची भूमिका घेतली. १८ मार्च, २०१९ रोजी इंटक, एआयटीयूसी, सीटू, एचएमएस, एनटीयूआय, एआयसीसीटीयू, टीयूसीआय या केंद्रीय कामगार संंघटनांचे नेते व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, शेकाप या धर्मनिरपेक्ष व लोकशाही मूल्यांना मानणाºया पक्षांच्या नेत्यांची संयुक्त बैठक व विचारविनिमय होऊन, भाजप व सेना उमेदवारांच्या विरोधात मतांची बेरीज होण्याकरिता जिल्हानिहाय कृती समिती स्थापन करणे, कामगार, शेतकरी व मध्यमवर्गातील नागरिकांची प्रचार समिती सक्रिय करणे, प्रत्येक लोकसभा मतदार संघात १ लाख पत्रके वाटणे, सोशल मीडियातून २ कोटी जनतेपर्यंत पोहोचणे, अशी व्यूहरचना करण्यात आली.गेल्या पाच वर्षांत भारतीय संविधानातील निधर्मी राष्ट्राची डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी मांडलेली संकल्पना बदलून मनुवादी हिंदू राष्ट्राची कल्पना भाजप नेत्यांनी वारंवार मांडली. लोकसभा, राज्यसभा या व्यासपीठावरून कित्येकदा पक्षीय प्रचार केला. घटनेतील व्यक्ती व्यातंंत्र्य, आचार-विचार स्वातंत्र्य, कोणत्याही धर्माच्या आचरणाचे स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता, जगण्याच्या मूलभूत गरजांच्या हक्कांचे कायदे पायदळी तुडविण्याचे काम सरकारी यंत्रणेमार्फत भाजपने केले. योजना आयोग मोडणे, सुप्रीम कोर्ट, रिझर्व्ह बँक, राष्ट्रीयकृत बँका, विमा, एमटीएनएल, बीएसएनएल, पोर्ट ट्रस्ट, तेल कंपन्यांवर सत्तेचा गैरवापर करून राजकीय स्वार्थासाठी वापर केला. भाजपने सरकारी जाहिरातींचा पाऊस पाडून सर्व मीडिया ताब्यात ठेवल्या. अर्थव्यवस्थेची मोडतोड, चुकीचे आकडे सादर करणे, नोटाबंदी, जीएसटीसारखे भयानक अफरातफरीचे प्रयोग करून राजकीय स्वार्थ साधला. अर्थव्यवस्थेची माती केली. जवळजवळ ६ कोटी संघटित व असंघटित रोजगार संपविला. नवीन राजगार निर्मितीचे धोरण कागदावरही नाही, तर मुद्रा लोनमधून फसव्या आकड्यांची, जाहिरातबाजी भाजपने केली. कष्टकरी, शेतकरी यांचे उत्पन्नाचे हिरावून त्यांची क्रयशक्ती भाजप सरकारने खिळखिळी केली. युवा व महिलांची असुरक्षा व त्यांच्या हक्कावर गदा आणणे, सरकारविरोधात आवाज उठवून, संघर्ष करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले.

सार्वजनिक क्षेत्राची विक्री खासगी उद्योगपतींना करणे, राष्ट्रीय संपत्ती मोजक्या बड्या भांडवलदार मित्रांना म्हणजे, गौतम अदानी, अंबानी बंधू, टाटा, एस्सार इत्यादींना जणू दान दिली आहे! राफेल प्रकरणात ‘चौकीदार चोरे आहे’ व ‘अंबानीला फायदा झाला’ हे जनतेला समजले आहे. बँकांमधील गरीब, मध्यमवर्गीय कामगार शेतकरी यांच्या ठेवींतून विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीसारख्या ७,००० कर्जबुडव्या उद्योगपतींनी कर्जे घेऊन परतफेड न करता देशाबाहेर पलायन करताना भाजप सरकारची मदत घेतली आहे, याची सामान्य जनतेला कल्पना आहे. या कर्जबुडव्या चोराकडून भाजपच्या निवडणूक निधीत करोडो रुपये जमा होत नाहीत काय?
देशाच्या इतिहासात हे सर्र्वात जास्त कामगारविरोधी सरकार आहे. सर्व ४४ कामगार कायदे संपुष्टात आणले जात आहेत. मालकाचे हात बळकट करणाºया आणि कामगार संघटना आणि कामगारांना कमकुवत करणारे चार भांडवलदार-धार्जिणे कायदे या सरकारने सादर केले आहेत. गेल्या चार वर्षांत शेतकºयांचे उत्पन्न कमी झाले आहे. शेतकरी जीवघेण्या संकटात सापडले आहेत. भाजपने पाच वर्षांत शेतकºयांसाठी काहीच केले नाही! मात्र, फसवणुकीची घोषणा केली! प्रश्न असा आहे की, कृती समितीची राजकीय भूमिका म्हणजे काय आहे, तर ‘आपल्याला हुकूमशाहीचा पराभव करून, भारतीय स्वातंत्र्यानंतरची, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्य घटनेवर आधारित लोकशाही व्यवस्था टिकवायची आहे! तसे झाले, तर देशातील सर्वसामान्य, सर्वभाषिक, सर्वधर्मीय जनतेला भवितव्य आहे!’ भारताचे सार्वभौमत्व संकटात असताना जनतेने संविधान व लोकशाहीच्या संरक्षणासाठी उभे राहिलेच पाहिजे.( कामगार नेते)

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा