शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

‘नीट’ आणि ‘एनटीए’मुळे अनेक ‘भूमिकां’च्या स्वप्नांचा चुराडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 07:15 IST

‘नीट’ आणि ‘एनटीए’ घोटाळ्याच्या फटक्याने यंदा देशभरात हजारो विद्यार्थी हादरले. या घोटाळ्याचे नवे-नवे पदर अजूनही बाहेर येताहेत. त्याला काही अंत आहे?

गजानन चोपडे वृत्तसंपादक, लोकमत,  अमरावती 

‘नीट’च्या परीक्षेत यंदा मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार, गोंधळ झाला. या गोंधळाचा फटका अनेक होतकरू विद्यार्थ्यांना तर बसलाच, पण अनेकांचं डॉक्टर होण्याचं स्वप्नही पुरतं भंगलं. या महाघोटाळ्यात यवतमाळ जिल्ह्यातील भूमिका राजेंद्र डांगे ही विद्यार्थिनीही बळी ठरली. भूमिकाने फेरपरीक्षा दिली नसतानाही तिच्या नव्या गुणपत्रिकेत तब्बल ४६८ गुण कमी करण्याचा प्रताप नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) केला आहे. ६४० गुण प्राप्त करणाऱ्या भूमिकाला नव्या गुणपत्रिकेत केवळ १७२ गुण देण्यात  आले आहेत!  या प्रकारामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. भूमिकानं लगेच ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ला  ई-मेल केला; पण या मेलला साधे उत्तर देण्याची तसदीही अद्याप या संस्थेनं घेतलेली नाही.

५ मे रोजी झालेल्या ‘नीट’ परीक्षेच्या दिवशीच या परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला. बिहार पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या गोरखधंद्यातील ‘नटवरलाल’, ‘मुन्नाभाई’, ‘गंगाधर’सारखे महाभाग गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असतील, परंतु भूमिकासारख्या विद्यार्थ्यांचे काय? त्यांच्या  भवितव्याशी खेळ का? भूमिकाने तर फेरपरीक्षाही दिली नव्हती. ज्या विद्यार्थ्यांना ‘ग्रेस’ गुण मिळाले होते, त्यांची ‘एनटीए’ने फेरपरीक्षा घेतली. मग भूमिकाला नवी गुणपत्रिका देण्याचा जावईशोध कुणाचा? तिची ऑल इंडिया रँक आधी किती होती व नंतर किती खाली घसरली याचा शोध कोण घेणार?.. या प्रश्नांनी डांगे कुटुंबीयांना अस्वस्थ केलं आहे.  भूमिकाही या प्रकारामुळे प्रचंड हादरली आहे. आपण घेतलेली इतकी मेहनत आणि डॉक्टर होण्याचं इतक्या वर्षांपासून बाळगलेलं स्वप्न. सगळंच पाण्यात जाणार की काय, या भीतीचा धसका तिनं घेतला आहे.

यवतमाळमधील भूमिकाचं उदाहरण म्हणजे केवळ हिमनगावरील टोक ठरावं इतके घोटाळे यंदा ‘नीट’च्या परीक्षेत घडले आहेत. याविरुद्ध दाद तरी कोणाकडे आणि कशी मागावी, त्याला न्याय मिळेल का आणि कधी, तोपर्यंत आपल्या स्वप्नांचं, मेहनतीचं आणि भविष्याचं काय, असे असंख्य प्रश्न फेर धरून विद्यार्थ्यांसमोर नाचत आहेत. हतबल झालेल्या या विद्यार्थ्यांसमोर सध्या तरी आशेचा एकच किरण आहे, तो म्हणजे न्यायालय. तिथेच आपल्याला काही न्याय मिळू शकेल, या अपेक्षेत ते आहेत. त्यामुळे भूमिका आणि तिच्या वडिलांनीही नाईलाजानं न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे; पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं आणि खर्चाची तजवीज करायची कशी, याची एक नवीनच चिंता त्यांना भेडसावते आहे. भूमिकाचे वडील आर्णीच्या ग्रामीण रुग्णालयात सुरक्षा रक्षक आहेत.

महाराष्ट्र आणि देशात भूमिकासारखे कितीतरी विद्यार्थी ‘नीट’ महाघोटाळ्याला बळी पडले आहेत. दिल्लीत बसून नीट घोटाळ्याची सूत्रं हलविणाऱ्या गंगाधरवर पोलिसांनी चौकशीचा पाश आवळला आहे. काही पालक आणि विद्यार्थीदेखील चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. तिकडे ‘सीबीआय’ने बिहारमधून अटक केलेल्या मनीषकुमार, आशुतोषकुमार या आरोपींच्या चौकशीतून दररोज नवीन माहितीचा उलगडा होत आहे. माफियांनी शिक्षण व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. 

‘नीट’संदर्भात देशपातळीवर झालेल्या या महाघोटाळ्याचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. विद्यार्थी आणि पालक त्यामुळे हतबल झाले आहेत. यवतमाळातील भूमिका हे त्याचं एक उदाहरण. ज्यांना ‘ग्रेस’ गुण मिळाले, त्यांची फेरपरीक्षा घेण्यात आली, परंतु त्यात समावेश नसलेल्या विद्यार्थ्यांना नवी गुणपत्रिका पाठवून ‘एनटीए’ने पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘नीट’ स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा कारभार इतका ढिसाळ असेल, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासमोर आणि भविष्यासमोरच अंधार पसरणार असेल तर त्यांनी दाद मागावी तरी कुठे? शिवाय व्यवस्थेवरचा आणि शिक्षणावरचा उडालेला विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात कायमची काजळी धरेल त्याचं काय?

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीक