शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नवीन शैक्षणिक धोरण 2020 सहज शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 2:14 AM

नव्या शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राजकीय इच्छाशक्ती किंवा फार निधीचीही गरज नाही. प्रबळ इच्छाशक्ती पुरेशी आहे!

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या ‘व्हिजन’ मध्येच ‘ग्लोबल’ हा शब्द तीन वेळा आलेला आहे़ त्यातच या धोरणाचे इंगित आहे़ जगातील श्रीमंत देश आपल्या मुलांना एकविसाव्या शतकातील कौशल्ये शिकवीत असताना सहा नवीन पेडागॉजी (पद्धती) वापरतात. भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जवळ-जवळ त्या सर्व पेडागॉजीचा उपयोग केला जाणार आहे़ शिक्षण हे विद्यार्थ्यांसोबत घडणाऱ्या आंतरक्रियेतून घडते. ही आंतरक्रिया जेवढ्या उत्कृष्ट पद्धतीने केली जाणार तेवढे चांगले शिक्षण घडेल. दुसरा महत्त्वपूर्ण बदल शिक्षक या संकल्पनेमध्ये आहे. नवीन धोरणामध्ये सहअध्यायी म्हणजेच मित्रांनी शिकविणे (पीअर ट्युटरिंग), प्रशिक्षित स्वयंसेवक, तसेच तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आहे. हा धोरणाचा गाभा आहे. त्यासाठी फार जास्तीचा निधी किंवा राजकीय इच्छाशक्तीचीही गरज नाही. हे सहज राबविणे शक्य आहे.

आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने सुरूकेलेल्या पथदर्शी शाळांपैकी यशस्वी झालेली एक शाळा वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे)! इथे राबविलीजाणारी नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धती, पेडागॉजी हे वर उल्लेखिल्याप्रमाणेच आहेत़ ज्यात मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान, स्व आणि पीअर लर्निंग तसेच तंत्रज्ञानाच्या वापराचा समावेश आहे. बालमानसशास्त्राच्या दृष्टीने मुलांनी मुलांकडून शिकण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे मुलांच्या शिकण्याच्या गतीत प्रचंडवाढ होते.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झालेले असतानाही छत्तीसगड राज्यातील ४२,००० शिक्षकांनी आपल्या मोबाईलचा वापर करून नव्या शिक्षण पद्धतीचे, पेडागॉजीचे आॅनलाईन प्रशिक्षण घेतले आहे. एकविसाव्या शतकाचे कौशल्य, ‘एकमेकास सहकार्य करणे’ हे आहे़ शिकत असताना मुले मोबाईल नसलेल्या मुलांना ‘मोबाईल मित्र’ म्हणून मदत करतात. या उदाहरणांवरून या धोरणामध्ये केल्या गेलेल्या विचारांची अंमलबजावणी शक्य आहे़प्रगत देशांमध्ये शंभर टक्के पूर्वप्राथमिक शिक्षणाची सोय असते. त्याची व्यवस्था या धोरणामध्ये कालबद्ध पद्धतीने केली जाणार आहे. यासोबतच तिसºया वर्गातील शंभर टक्के मुलांना २०२५ पर्यंत मूलभूत भाषा आणि गणित हे अभियानस्वरूप शिकविले जाणार आहे. पूर्वप्राथमिकच्या वयापर्यंत मुलांना मूलभूत बाबी जमल्यास पुढील शिक्षण सोपे जाते. याचा परिणाम गळती थांबविण्यातसुद्धा होईल.सहअध्ययन आणि प्रतिभावंत, बुद्धिवान मुलांच्या एकत्रीकरणाचा विचार केल्यावर सर्वच मुलांना लाभ होईल. मात्र, शिक्षकांनी शिकविण्याऐवजी शिकण्याचे नेतृत्व, व्यवस्थापन आणि नियोजन योग्य पद्धतीने करावे. धोरणामध्ये पहिल्यांदा प्रशिक्षणाऐवजी सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाची संकल्पना, सोबतच मेन्टॉरिंग मिशन आणि राष्ट्रीय शिक्षक व्यावसायिक मानक हे सर्व स्तरावरच्या यशस्वी बाबींचा प्रसार करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. धोरणामधील बहुभाषिक व्यवस्था, त्यात भाषा शिकण्यातील आनंद, तसेच जीडीपीच्या सहा टक्के ऐवजी एकूण महसुलाच्या २० टक्के बजेट या नावीन्यपूर्ण व दूरगामी परिणाम करणाºया संकल्पना आहेत़नंदकुमारप्रधान सचिव,महाराष्ट्र शासन

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र