- मिलिंद बेल्हेविधानसभेच्या निवडणुक ीत जे व्हायचे ते होवो, पण लोक सभा निवडणुक ीत क से क ा होईना शिवसेनेला भाजपासोबत ठेवण्याचेजेवढे जमतील तेवढे प्रयत्न त्या पक्षाच्या नेत्यांक डून सुरू आहेत. सत्तेत राहून विरोधी भूमिक ा बजावण्याच्या शिवसेनेच्याप्रयत्नांक डे दुर्लक्ष क रण्याचा पवित्रा भाजपा नेत्यांनी आजवर घेतला. पण लोक सभा निवडणुक ा जसजशा जवळ येत आहेत, तशीभाजपा नेत्यांची घालमेल वाढतेआहे. म्हणजे ते तसे दाखवून तरी देत आहेत. आंध्रात चंद्राबाबू नायडू यांनी वेगळी चूल मांडल्यावरपक्षाध्यक्ष अमित शहा यांनी वेगवेगळ््या क्षेत्रातील मान्यवरांसोबतच मित्रपक्षांसोबतही संपर्क अभियान सुरू के ले. शिवसेनेचेपक्षप्रमुख उद्धव ठाक रे यांच्याशी दोन महिन्यांपूर्वी शहा यांनी केलेली चर्चा हा त्याचाच भाग होता. त्याला शिवसेनेचा प्रतिसाद हवा तितक ा समाधानक ारक नाही.खरंतर दिल्लीत जाऊ न तेथील नेत्यांच्या भेटीगाठी घेणे, त्यांच्याक डेपत्रेदेऊ न आपल्या मागण्या रेटणे ही क ाही ठाक रे कुटुंबीयांच्याराजक ारणाची परंपरा नाही. जेआदेश द्यायचे ते मुंबईतूनच. तरीही शिवसेनेच्या नव्या पिढीचे नेते असलेल्या आदित्य यांनी ती‘परंपरा’ दूर सारत गेल्या आठवड्यात दिल्लीत विविध मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. वेगवेगळ््या विषयावरील मागण्यांची निवेदनेदिली. तेव्हाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेवरळी क ोळीवाड्यात सी लिंक च्या पार्श्वभूमीवर क न्व्हेन्शन सेंटरउभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जलसंपदामंत्री नितीन गडक री यांनी मांडला. पालिकेची तीन एक र आणि बीपीटीची दोन एक र अशा पाच एक रांच्या प्रशस्त जागेत हेसेंटर उभारण्याची ही क ल्पना आहे. ती राबवण्यासाठी वरळी क ोळीवाड्याच्या पुनर्विक ासाची योजना आधी राबवावी लागेल. सोबतच पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे हटवून तेथे पुनर्वसन योजना राबवावी लागेल. त्यानंतर ही जागा मोक ळी होईल आणि त्यात सेंटर उभारले जाईल, अशी ही क ल्पना आहे. वस्तुत: दादरला महापौर निवासाच्याजागेत बाळासाहेब ठाक रे यांच्या स्मारक ाच्या क ल्पनेवर क ाम सुरू आहे. तेथून मुंबईच्या महापौरांना राणीच्या बागेत हलवायचे होते.पण तो बंगला रिक ामा होत नाही आणि त्या जागेत जाण्याची कुणाचीच मनापासून इच्छा नाही. त्यामुळे मूळचे स्मारक सध्या जागेच्यावादाभोवतीच फि रते आहे. ते मार्गी लागण्यातील हे अडथळे दूर होण्यापूर्वीच क न्व्हेन्शन सेंटरच्या क ल्पनेचे इमले उभारले जात आहेत. ते पाहता बाळासाहेबांच्या पुण्याईचे दान मागत नव्याने शिवसेनेला चुचक ारण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असे वाटणेस्वाभाविक आहे. या साऱ्या क ल्पनांना शिवसेना क सा प्रतिसाद देते त्यावर भाजपाच्या प्रयत्नांचे फ लित अवलंबून आहे.
नव्या स्मारकाचे मधाचे बोट?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 6:19 AM