शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

नवे वर्ष आणि नवनवे संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:45 PM

नव्या वर्षात नवनवे संकल्प करण्याची पूर्वापार पद्धत आहे. काही बहुचर्चित मंडळींचे नवे संकल्प

- संदीप प्रधान(नव्या वर्षात नवनवे संकल्प करण्याची पूर्वापार पद्धत आहे. काही बहुचर्चित मंडळींचे नवे संकल्प)नरेंद्र मोदी : १ एप्रिल २०१८ रोजी सर्व भारतीयांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करीन.देवेंद्र फडणवीस : नाथाभाऊ आणि पोट दोघांनाही नियंत्रणात ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करीन.शरद पवार : २०१९ च्या निवडणुकीकरिता तिसरी आघाडी बांधून स्वत: चौथ्या किंवा पाचव्या आघाडीत जाईन आणि समजा भाजपा किंवा काँग्रेसचे सरकार येत असेल, तर मंत्रिपदाकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून बसेन.उद्धव ठाकरे : सत्तेला लाथ मारण्याचे इशारा देण्याचे रेकॉर्ड गिनिज बुकात नोंदवेन. इशारे देऊन देऊन तोंड दुखले तर ‘ठाकरे’ चित्रपटाचे शुटिंग पाहायला जाईन.राज ठाकरे : फेरीवालाविरोधी आंदोलनाकरिता दररोज भायखळ््याला जाण्याचे रेल्वेचे तिकीट काढीन. मात्र, छबिलदास शाळेच्या गल्लीतील वडा खाऊन घरी येऊन व्यंगचित्र काढीत बसेन.नितीन गडकरी : पत्रकार परिषदेत अथवा भाषणात तोंडातून एकही संख्या उच्चारणार नाही.हंसराज अहिर : सर्दी-पडसे झाल्यावर फॅमिली डॉक्टरकडे जाऊन औषध घेईन आणि दिवाळीतील टिकल्या उडवण्याची बंदूक दाखवून डॉक्टरांना घाबरवून टाकीन.अशोक चव्हाण : ‘आदर्श’ विद्यार्थी, वक्ता, कार्यकर्ता अशा कुठल्याही पुरस्कारांच्या कार्यक्रमालाही प्रमुख पाहुणा म्हणून हजर राहणार नाही.अजित पवार : ‘वेड्या बहिणीची वेडी माया’ हा कथासंग्रह प्रकाशित करीन.नारायण राणे : ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या स्वत: स्थापन केलेल्या पक्षातून कंटाळून बाहेर पडणार नाही.एकनाथ खडसे : ‘घरचा आहेर’ देतदेत स्वत:चे नाव गॅझेटमध्ये ‘नाथाभाऊ आहेर’ असे बदलून घेईन.लसिक मलिंगा : जगात माझ्यासारखा कुणी फेकू निर्माण होऊ नये, याकरिता तुफान फेकूगिरी करीन आणि कुणी फेकूगिरी करीत असेल तर त्याची बोलती बंद करीन.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस