शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

इंद्रदेवांच्या नववर्ष शुभेच्छा

By राजा माने | Updated: January 1, 2018 00:35 IST

आज इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके जाम खूश होता. इंद्रदेवांना त्याने फक्त पटवलेच नव्हते, तर चक्क त्याचे महागुरू नारदांवरही त्याने आज कुरघोडी केली होती. २०१८ चे स्वागत २०१७ च्या शेवटच्या रात्री साग्रसंगीत करण्याचा बेत होता. खरे तर नारदांना नववर्ष शुभेच्छा देण्यासाठी गुढीपाडवा, दिवाळी पाडवा आणि विजयादशमी एवढेच मुहूर्त मान्य होते.

 आज इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके जाम खूश होता. इंद्रदेवांना त्याने फक्त पटवलेच नव्हते, तर चक्क त्याचे महागुरू नारदांवरही त्याने आज कुरघोडी केली होती. २०१८ चे स्वागत २०१७ च्या शेवटच्या रात्री साग्रसंगीत करण्याचा बेत होता. खरे तर नारदांना नववर्ष शुभेच्छा देण्यासाठी गुढीपाडवा, दिवाळी पाडवा आणि विजयादशमी एवढेच मुहूर्त मान्य होते. पण यमके मात्र ‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होता. अखेर त्याने शक्कल लढविली आणि इंद्रदेवांना मराठी भूमीतील त्यांच्या लाडक्या वत्सांना नववर्ष शुभेच्छा संदेश देण्याची गळ घातली. इंद्रदेवांनीही त्याच्या इच्छेखातर नारदांना तसे आदेश दिले. यमकेला सोबत घेऊनच शुभेच्छा संदेशही तयार करण्याचे फर्मान सोडले. अखेर वैतागलेले नारद सोबतीला यमकेला घेऊन संदेश तयार करायला बसले.नारद : अरे यमके, आता तूच कुणाला काय संदेश द्यायचे ते सांग बाबा. कुणापासून सुरुवात करतो ?यमके : गुरू, आपण जाणत्या राजापासूनच सुरुवात करूया का? तर लिहा... ‘२०१९ च्या निवडणुकीसाठी भुजबळांसह तुमचे सैन्य सज्ज होवो...नारद : अरे, निवडणुकीची भाषा सोड, सुशीलकुमार शिंदेंनी शरद पवार राष्ट्रपती होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. अन् तू काय निवडणूक सज्जतेच्या शुभेच्छा देतोस?यमके : हो, खरंच ना... सुशीलकुमारांनी हा ज्योतिष धंदा ...नारद : (यमकेचे बोलणे तोडत) ज्योतिष धंद्याचे हक्क केवळ आपल्या नानांकडे म्हणजे खा. काकडेंकडे असताना सुशीलकुमारांनी त्यांच्याशी स्पर्धा का करावी?यमके : ते जाऊ द्या हो... आधी शुभेच्छा संदेश तयार करू. तर मग घ्या...पहिले नाव शरद पवार.नारद : नववर्ष सुप्रिया-अजित व पवार कुटुंबकबिल्यासह राष्ट्रवादीला बरकतीचे जावोे!यमके : पुढचे नाव देवेंद्र फडणवीसनारद : नाथाभाऊ विनोदभाई व चंद्र्रकांत दादांना ‘सायलेंट मोड’वर ठेवण्याची किमया जारी राहो व तुमचे हेलिकॉप्टर तंदुरूस्त राहो.यमके : नारायणराव राणेनारद : २०१८ मध्ये डिसेंबरपूर्वी शपथविधीचा योग येवो आणि आपल्या व चिरंजीव नीलेश - नीतेशच्या जिभेवर सदैव साखर राहो!यमके : उद्धवराव ठाकरेनारद : कमळा मावशीची माया पातळ न होवो. मुंबईकरांचे प्रेम अबाधित राहो!यमके : सदाभाऊ खोत अन् महादेव जानकरनारद : पंकजातार्इंवरची माया वाढत राहो अन् देवेंद्रभाऊंवरील श्रद्धा तशीच राहो.यमके : रावसाहेब दानवेनारद : बडबडीचे बेअरिंग न सुटो अन् साले-फालेसारखे शब्द तुमच्या शब्दकोषातून डिलिट होवो.यमके : अशोक चव्हाणनारद : नवे वर्ष ‘आदर्शमुक्ती’चे जावो...यमके राज, राजू शेट्टी, पतंगराव, सुभाषबापू यांची नावे सांगत असताना चक्क इंद्रदेवांचाच फोन आला. त्यांनी संदेश न पाठविण्याचे आदेश देऊन जनतेला फक्त सेलिब्रेशनची परवानगी दिली.

टॅग्स :New Year 2018नववर्ष २०१८