शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

नितीनभाऊ हाजीर हो...!

By राजा माने | Published: April 09, 2018 1:21 AM

इंद्रदेवाच्या या आठवड्यातील फर्मानाने आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके पुरता चक्रावून गेला. भाजप प्रकट दिनाच्या ऐतिहासिक महासोहळ्याची बित्तमबात आणि पवार ब्रिगेडच्या ‘हल्लाबोल’ मोहिमेचा आँखो देखा हाल कळविण्याचा त्याचा बेत होता.

इंद्रदेवाच्या या आठवड्यातील फर्मानाने आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके पुरता चक्रावून गेला. भाजप प्रकट दिनाच्या ऐतिहासिक महासोहळ्याची बित्तमबात आणि पवार ब्रिगेडच्या ‘हल्लाबोल’ मोहिमेचा आँखो देखा हाल कळविण्याचा त्याचा बेत होता. तेवढ्यातच महागुरू नारदांचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज येऊन धडकला. त्याने मेसेज पाहिला....‘नितीनभाऊ हाजीर हो !’ एवढाच तो मेसेज . नितीनभाऊंना इंद्रदरबारात पाचारण करायचे कारणच काय? या प्रश्नाच्या विचारात असतानाच त्याच्या मोबाईलची रिंग खणाणली.‘ नारायण ...! नारायण ..!!’ (नारदांचा डायल टोन असल्याने) यमकेने क्षणार्धात फोन घेतला व बोलू लागला.यमके : प्रणाम..ग़ुरूदेव !नारद : इंद्रदेवांचे फर्मान बघितलेस ना ! मग, आता नितीनभाऊंना कुठं गाठतोस ?यमके : नागपुरात गडकरी वाड्यावर किंवा दिल्लीत ! पण गुरू, हल्लाबोल मोहिमेने पश्चिम महाराष्टÑ ढवळून निघतोय. धनाभाऊ, अजितदादा, तटकरे टीमची जोरदार बॅटिंग सुरू आहे, जाणता राजाही दिल्लीत गतिमान झालाय.यापैकी कुणाला तरी इंद्रदरबारात बोलावण्याऐवजी नितीनभाऊंनाच का बरे बोलवायचे ?नारद : अरे शिष्या, मराठी भूमीतील खणलेले रस्ते तुला कसे दिसत नाहीत ? तुला फक्त चंद्रकांतदादांचे खड्डेच दिसत होते का? हजारो कोटींच्या कामांची भूमिपूजने करण्याचा पराक्रम करणाऱ्या नितीनभाऊंनी मुंबापुरीतील भाजप प्रकट दिन ऐतिहासिक महासोहळ्यात आणखी एक विक्रम नोंदला...यमके : हो, आता नितीनभाऊंनी सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष या पारंपरिक शब्दाला पर्यायी सोईचा शब्द जन्मी घातला.. ‘सर्वधर्मसमभाव’नारद : कडव्या हिंदुत्ववादाचे उदात्तीकरण करण्याचा तो प्रयत्न म्हणावा लागेल. पण त्या प्रयत्नासाठी त्यांना इंद्रदरबारात बोलावले जात नाहीये...यमके : मग कशासाठी बोलावले जातेय? इंद्रदेव त्यांना कशाचा जाब विचारणार?नारद : जाब काय फक्त व्यंगचित्रकार राजनेच विचारायचा का?यमके : अहो , महासोहळ्यात चंद्रकांतदादांची ‘वाळवी’ गाजली. अमितभार्इंचे साप, मुंगूस, श्वान असे प्राणीप्रेमही गाजले. त्यांना इंद्रदरबारात बोलवायला हवे होते. शिवाय भरगच्च भरलेल्या वर्गाचे ‘मॉनिटर’ आमच्या देवेंद्रभाऊंचे तावातावाने झालेले जोशपूर्ण भाषणही गाजले होते. त्यांनाही टाळून नितीनभाऊंनाच का बोलवायचे?नारद : ते जेथे जेथे जातात तिथे लाखोंचे इमले चढवितात, हे आम्हाला ठाऊक होते. पण, आता त्यांनी मुंबापुरीतील महामेळाव्यात कोटी कोटीची उड्डाणे घेतली आहेत. त्यांच्या एकट्याच्या खात्यातून महाराष्टÑासाठी पाच लाख कोटी रुपये राखून ठेवल्याचे त्यांनी जाहीर केले. एक लाख कोटीची कामे वर्षभरातच सुरू होणार असल्याचा दावा केला...मग त्यांना ही आकडेमोड विचारायला नको ?यमके: खरं आहे. त्यांना जाब विचारायलाच हवा. इंद्रदरबाराला नितीनभाऊंचे कोटी कोटी उड्डाणाचे कोडे सुटायलाच हवे. तरीही मला वाटते काही काळ त्यांना कामासाठी देऊन नंतरच बोलवायला हवे.नारद: त्यांना कामासाठी काळ द्यावा असे तुला का वाटते?यमके: गुरूदेव, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे ते जनक असल्याने त्यांना कोटी-कोटीची उड्डाणे घेण्याचा अधिकारच आहे ना !

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी