शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

निवाडा अधिकाऱ्यांचे वाक्यम् प्रमाणम्

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 6:32 AM

देशातील सर्व जनतेला पेयजल मिळावे म्हणून जलसाठवण व जलवितरण व्यवस्था असते. त्या व्यवस्थेतील अनेक पातळ्यांवर पाणीवाटप अधिकारी असतात.

- कॅप्टन आनंद जयराम बोडसदेशातील सर्व जनतेला पेयजल मिळावे म्हणून जलसाठवण व जलवितरण व्यवस्था असते. त्या व्यवस्थेतील अनेक पातळ्यांवर पाणीवाटप अधिकारी असतात. सर्वसामान्य जनतेला रास्त किमतीत अन्नधान्य मिळावे म्हणून शिधावाटप व्यवस्था व त्या व्यवस्थेत वेगवेगळ्या व पातळ्यांसाठी शिधावाटप अधिकारी असतात. त्याचप्रमाणे जनतेत व्यक्तिगत किंवा समूहासमूहात मतभिन्नता असते. विचारभिन्नता, स्वार्थभिन्नता, मतभिन्नता या सर्वाला एकमेकातील तंटा-बखेडा हा सोपा पर्यायी शब्द आहे.मतभिन्नतेचे म्हणजे त्या तंट्याचे रूपांतर सामाजिक शांतता भंगात अथवा व्यक्तिगत व सामूहिक हिंसेत होऊ शकते. हे टाळण्यासाठी तंटा निवारण व निवाडा व्यवस्था आपल्या देशात आहे. या तंटा निवाडा व्यवस्थेत शिधावाटप व्यवस्थेप्रमाणेच निवाडावाटप अधिकारी नेमलेले असतात. पाणीवाटप अधिकारी, शिधावाटप अधिकारी तसेच हे तंट्या-बखेड्यातील निवाडावाटप अधिकारीसुद्धा पगारी नोकर असतात. त्यांना पगाराबरोबर भत्ते, राहायला चांगली घरे, वाहने, पोलिसी रक्षण वगैरे असते. परंतु इंग्रजांनी स्वार्थासाठी रूजवलेल्या पद्धतीचा आपण आंधळेपणाने स्वीकार केल्यामुळे पाणीवाटप अधिकारी व निवाडावाटप अधिकारी यातील प्राथमिक समानता उल्लेखित पातळीवर संपते. त्यानंतर त्या पगारी वाटप अधिकाºयांच्या कार्यपद्धतीत भयावह फरक होतात.पाणी, शिधावाटप अधिकारी जसे सरकारी इमारतीत बसून स्वत:च्या स्वार्थाच्या तुंबड्या भरत वाटपाची कामे करतात तसेच निवाडावाटप अधिकारीसुद्धा सरकारी इमारतीत बसून स्वत:चा स्वार्थ साधत उर्मटपणे निवाडा वाटप करतात. उल्लेखित इतर वाटप अधिकारी जेथे बसतात त्याला कार्यालय-आॅफिस म्हणतात. पण निवाडावाटप जेथे चालते त्याला निवाडा कट्टा-कोर्ट म्हणतात. तालुका कट्टा, जिल्हा कट्टा व प्रत्येक राज्याचा उच्च कट्टा असे लहान-मोठे निवाडा कट्टे असतात. तेथील निवाडावाटप करणाºयांना उगाचच ईश्वरीय वाटावे असे संबोधन वापरतात. त्यांना निवाडाधीश म्हणतात. या पगारी निवाडाधीशांच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र गट मार्ग असतो. त्यावरून अन्य लोक चालू शकत नाहीत.देशातील सर्व राज्यांतील उच्च निवाडा कट्ट्यांच्याहून भारी, मजबूत, उंच काटेरी असा सर्वोच्च निवाडा कट्टा दिल्लीला आहे. सर्वोच्च व उच्च निवाडा कट्टा चावलणारे निवाडाधीश आपण पगारी नोकर आहोत हे विसरून आपण सर्वात ताकदवान परमेश्वराचे बापच आहोत असे समजून कोणावरही ताशेरे झाडत मनमानी पद्धतीने आदेश बजावत असतात. पाणी व शिधावाटप अधिकाºयाने चूक केली व ती उघड झाली तर त्याची चौकशी होऊन त्या चुकलेल्या वाटप्याला जाब विचारला जातो. त्याला सजा होते, पण निवाडाधीशांनी दिलेले चुकीचे व हास्यास्पद निवाडे उच्च व सर्वोच्च कट्ट्यावर पूर्णपणे चुकीचे ठरून बदलले गेले तरी चुकीचा निवाडा करणाºया निवाडामूर्तीला वा निवाडाधीशाला बडतर्फी किंवा तुरुंगवास होत नाही. कारण निवाडाधीशांच्या ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ला घटनात्मक रक्षण असते.निवाड्यासाठी समोर आलेल्या तंट्याला पुढच्या म्हणजे दोन-चार महिन्यांनंतरच्या तारखा देणे हा विटीदांडूचाच खेळ निवाडाधीश नेहमी खेळतात. म्हणजे तंटा ज्या माणसांमुळे सुरू झाला तो माणूस मेल्यावर, त्याचा मुलगा मेल्यावर त्याच्या म्हाताºया नातवाला आपल्या आजोबांचा विवाह बेकायदा होता हा निवाडा ऐकावा लागतो. निवाडाधीशाचा अवमान हे फारच हास्यास्पद व भयानक प्रकरण आहे. ‘साहेब, तुम्ही म्हणता ते मला मुळी पटत नाही’, असे सामान्य माणसाने निवाडामूर्तींना सांगितले तर कोठल्याही एफआयआर, पंचनामा, पुरावा उलटतपासणीशिवाय निवाडाधीशांचा अवमान झाला, अशी उलटी बोंब मारून सामान्य माणसाला तुरुंगात टाकतात. डॉक्टरने आॅपरेशनमध्ये चूक केली व त्यामुळे रुग्णाला मनस्ताप झाला व आर्थिक भुर्दंड सोसावा लागला तर डॉक्टरला नुकसानभरपाई द्यावी लागते. त्याची पदवी रद्द होते. पण निवाडामूर्तींनी एखाद्याला १0 वर्षे तुरुंगात डांबले व वरच्या निवाडा कट्ट्यावर तो निर्णय चुकीचा ठरला तरी त्या चुकलेल्या निवाडावाटप अधिकाºयाला शिक्षा होत नाही. ज्याची दहा वर्षे उगाचच तुरुंगात फुकट गेली त्याला नुकसानभरपाई निवाडाधीशाने दिली पाहिजे. पण तसे होत नाही.एखादा तंटा उच्च व सर्वोच्च निवाडा कट्ट्यावर निकाली स्वरूपात संपला तर निवाडा वाचन लगेचच केले जात नाही. निवाडा राखून ठेवला जातो आणि आठ-दहा महिन्यांनी किंवा निवाडाधीशांच्या निवृत्तीअगोदरच्या दोन-चार दिवसांत निवाडा जाहीर केला जातो. असे शेवटच्या दिवसात जाहीर झालेले निवाडे बरेच वादग्रस्त व गुन्हेगारांच्या फायद्याचे असतात.निवाडाधीशांनी तंट्यातील दोन्ही बाजंूची विवेचने ऐकल्यावर दोन आठवड्यांच्या आत निवाडा जाहीर केलाच पाहिजे, असा नियम हवा. निवाडा जाहीर करायला विलंब लावतात तो निवाड्याबद्दल बोली लावण्यास व आर्थिक घासाघीस करण्यासाठी असतो हे सर्वांना अवगत असते. ज्या विषयातील गमभनसुद्धा म्हणजे धोंडेसुद्धा समजत नाही त्या तंट्यात हे निवाडामूर्ती धुडगूस घालतात. कारण त्यांना घटनात्मक रक्षण असते.

टॅग्स :Courtन्यायालय