- प्रा. सुरेंद्र जाधवथॅलेर यांनी मानसिक लेखा परीक्षणाची संकल्पना मांडून सिद्ध केले की लोक आर्थिक निर्णय घेताना केवळ परिपूर्ण मूल्यांचा नव्हे तर पर्यायी मूल्यांचा जास्त प्रकर्षाने विचार करतात. त्यामुळे एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूचे केवळ मूल्य महत्त्वाचे नसून खरेदी करताना केलेली घासाघीससुद्धा महत्त्वाचे समाधान देऊन जाते. रॅशनल चॉइस थेअरी (निवडीचा विवेकवादी सिद्धांत) हा नव-सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कक्षेत महत्त्वपूर्ण सिद्धांत. वस्तू आणि सेवांचे दुर्भिक्ष असताना जेव्हा व्यक्तीस निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते, तेव्हा व्यक्ती विवेकी निर्णय घेतात. कारण, व्यक्तीचे स्वत:वर आणि बाह्य परिस्थितीवर नियंत्रण असते. याउलट, वर्तनाचे अर्थशास्त्र मात्र प्राप्त परिस्थितीत विवेकी होण्यापेक्षा अविवेकी राहण्यास जास्त प्राधान्य देते.सन १९६८ साली अर्थशास्त्र विषयात नोबेल पुरस्कार देण्याची सुरुवात झाली, तेव्हापासून आजतागायत अर्ध्याहून अधिक पुरस्काराचे मानकरी केवळ अमेरिकन अर्थतज्ज्ञच राहिले असून रिचर्ड थॅलेर या परंपरेतील २०१७ चे मानकरी. वर्तणुकीचे अर्थशास्त्र, वित्त, निर्णय घेण्याचे मानसशास्त्र या विषयांच्या अध्ययन अध्यापनात त्यांची विशेष रुची असून ते १९९५ साली ते शिकागो विद्यापीठाच्या सेवेत रुजू झाले होते. विचारप्रणालीच्या दृष्टीने त्यांचे टीकाकार त्यांचे वर्णन राजकीयदृष्ट्या उजवे असे करतात, तर डाव्यांच्या मते ते नवउदारमतवादी आहेत. ७२ वर्षांच्या रिचर्ड थॅलेर यांच्या योगदानाची चर्चा करताना नोबेल समिती आवर्जून सांगते की, आर्थिक निर्णय घेताना माणूस कसा विचार करतो आणि कसा वागतो याबद्दलचे थॅलेर यांचे लिखाण अतिशय वास्तववादी आहे. त्यांच्या प्रमुख लिखाणात ‘मिसबिहेविंग : द स्टोरी आॅफ बिहेविरीयल ईकॉनॉमिक्स (२०१५)’, ‘नुज : इम्प्रोविंग डिसिजन्स आॅन हेल्थ, वेल्थ अँड हॅप्पीनेस (२००८)’, ‘द विनर्स कर्स : पॅराडॉक्स अँड अनामलीस आॅफ ईकॉनॉमिक लाइफ (१९९१)’ आणि ‘क्वासी - रॅशनल ईकॉनॉमिक्स (१९९१)’ ग्रंथसंपदेत पाहावयास मिळते.वर्तणुकीचे अर्थशास्त्र म्हणजे काय?वर्तणुकीचे अर्थशास्त्र प्रामुख्याने आर्थिक निर्णय प्रक्रियेत मानसशास्त्रीय सिद्धांताचा आधार घेऊन आर्थिक निवड प्रक्रिया प्रभावित करणाºया घटकांवर प्रकाश टाकते. म्हणजेच आर्थिक निर्णय घेताना माणूस अविवेकी का असतो, याची शास्त्रीय मीमांसा करते. खरे तर वर्तनवादी अर्थशास्त्राने सनातनी आणि नव-सनातनी अर्थशास्त्रज्ञांच्या गृहीतकांवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत, ते असे - एक, बाजारप्रणीत अर्थव्यवस्थेत उपभोक्ता सार्वभौम, विवेकी असतो आणि उद्योजकाचा अंतिम उद्देश नफा मिळवणे हा असतो, हे खरे आहे काय? दुसरे, माणसे अपेक्षित व्यक्तीनिष्ठ उपयोगिता महत्तम स्तरावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतात का? वर्तनवादी अर्थशास्त्राच्या चष्म्यातून पहिल्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी तर दुसºया प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे.थॅलेर यांनी मानसिक लेखा परीक्षणाची संकल्पना मांडून सिद्ध केले की, लोक आर्थिक निर्णय घेताना केवळ परिपूर्ण मूल्यांचा नव्हे तर पर्यायी मूल्यांचा जास्त प्रकर्षाने विचार करतात. त्यामुळे एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूचे केवळ मूल्य महत्त्वाचे नसून खरेदी करताना केलेली घासाघीससुद्धा महत्त्वाचे समाधान देऊन जाते. रॅशनल चॉइस थेअरी (निवडीचा विवेकवादी सिद्धांत) हा नव-सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कक्षेत महत्त्वपूर्ण सिद्धांत. वस्तू आणि सेवांचे दुर्भिक्ष असताना जेव्हा व्यक्तीस निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते, तेव्हा व्यक्ती विवेकी निर्णय घेतात. कारण, व्यक्तीचे स्वत:वर आणि बाह्य परिस्थितीवर नियंत्रण असते. याउलट, वर्तनाचे अर्थशास्त्र मात्र प्राप्त परिस्थितीत विवेकी होण्यापेक्षा अविवेकी राहण्यास जास्त प्राधान्य देतात, अविवेकी आर्थिक निर्णय घेतात.रिचर्ड थॅलेर यांचे योगदानसनातनी अर्थशास्त्रज्ञ आर्थिक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचे ठोकळबाज विश्लेषण करतात, तर नव-सनातनवादी पसंतीक्रमाला आणि निवडीचा विवेकवादी सिद्धांत यांच्या आधारे व्यक्तीच्या आर्थिक मनोव्यापाराचा आढावा घेतात. सनातनी आणि नव-सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या सिद्धांताची प्रमुख गृहीतके म्हणजे बाजारात उपभोक्ता किंवा आर्थिक एजंट सार्वभौम आणि विवेकी असतो / वागतो, त्याला आपले हित-अहित चांगल्याप्रकारे माहीत असते आणि त्याने देऊ केलेल्या किमतीपेक्षा जास्त उपयोगिता असलेली वस्तू/सेवा तो खरेदी करतो. अगदी दुर्भिक्ष असलेल्या परिस्थितीतसुद्धा त्याचे स्वत:वर, त्याच्या बाह्य परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असते आणि तो विवेकी निर्णय घेतो.याउलट वागणुकीचे अर्थशास्त्र मात्र अविवेकी आर्थिक निर्णय प्रक्रियेला वाव देऊन त्यामागची शास्त्रीय कारणमीमांसा उलगडून दाखवण्यासाठी प्रयत्नशील असतात, या वास्तववादी मांडणीतच वर्तणुकीच्या अर्थशास्त्राचे यश आहे. वर्तनवादी अर्थशास्त्रज्ञ त्यांचे विश्लेषण माणसाच्या आर्थिक मनोव्यापाराचा खोलवर जाऊन त्या प्रेरणांचा सखोल अभ्यास करतात. रिचर्ड थॅलेर पुढे म्हणतात की, आर्थिक निर्णय घेताना बºयाचदा लोक ठरावीक रक्कम एका ठरावीक कारणासाठी आहे, असे ठरवूनही टाकतात. परंतु त्यांचा हा निर्णय त्यांच्या मानसिक अभिलेखाच्या विरुद्ध असतो, कारण असं ठरवलं गेल्याने त्यांना आता नवीन कार विकत घेता येत नाही. परंतु जर अशा व्यक्ती आर्थिक निर्णय घेताना अविवेकी वागल्या तर मात्र त्यांची कार घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते आणि त्यामुळेच लोकांच्या अविवेकी आर्थिक मनोव्यापाराचा वेध घेणे महत्त्वाचे ठरते. सनातनी आणि नव-सनातनवादी गृहीतकांशी फारकत घेत रिचर्ड थॅलेर स्पष्ट करतात की, उपभोक्ता किंवा आर्थिक एजंट ही सर्वसामान्य माणसेच असतात, ते अविवेकी वागू शकतात. जर आपणास या अविवेकी आर्थिक मनोव्यापाराचा अचूक अंदाज घेता आला तर, वाढलेले उत्पन्न कुठल्या गोष्टींवर खर्च होऊ शकते, याचाही अंदाज बांधता येतो.
(लेखक चेतना महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.)