शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

खलनायक नहीं..!

By admin | Published: February 28, 2016 2:23 AM

तुरुंगातून शिक्षा भोगून सुटलेल्या कैद्याकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी आहे, हे आता तपासण्याची वेळ आली आहे. त्याला त्याची प्रतिष्ठा उभी करण्याची संधी द्यायची,

(सोळा आणे सच)- विनायक पात्रुडकरतुरुंगातून शिक्षा भोगून सुटलेल्या कैद्याकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी आहे, हे आता तपासण्याची वेळ आली आहे. त्याला त्याची प्रतिष्ठा उभी करण्याची संधी द्यायची, की कायम बहिष्कृत नजरेने त्याच्याकडे पाहायचे, हेही समजावून घेण्याची गरज आहे.अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेव्हीन्सीचे प्रकरणही गाजले होते. पण माफीनंतर अमेरिकन जनतेने जाहीरपणे कुठेही बिल क्लिंटन यांच्यावर ठपका ठेवला नाही. याचा अर्थ स्वैराचाराला किंवा गुन्हेगारी वृत्तीला बळकटी द्यायची का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परंतु माणसाच्या हातून चुका होतात आणि तो माणूस जर वलयांकित असेल तर त्या चुकांच्या वाट्याला प्रसिद्धीचे भोग येतात. एखाद्या महिलेवरच्या अत्याचाराच्या घटनेत त्या महिलेची अब्रू टिकविण्यासाठी तिचे नाव न प्रसिद्ध करण्याचा संकेत बरीच प्रसारमाध्यमे पाळतात. अगदी वाहिन्यांवरही एखाद्या अत्याचारग्रस्त महिलेचा फोटो दाखविताना चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतली जाते. हे करताना आम्ही मोठी सामाजिक जबाबदारी पार पाडीत आहोत असा आवही आणला जातो. महिला किंवा अल्पवयीन मुलांच्या बाबतीत सजग असलेला आपला समाज आहे. आपल्यापैकी अनेकांनी शाळेतही शिक्षा भोगलेली असते. चुका, खोडकरपणाबद्दल शिक्षकांचे फटकेही खाल्ले आहेत. वर्गात बाकावर उभे राहण्याची शिक्षा, वर्गाबाहेर अंगठे धरण्याची शिक्षा वगैरे.. या शिक्षेनंतर पाप धुऊन निघाल्याचे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसायचे. काही जण दिवसभर खाली मान घालून घालवितात. पण हे सगळे तेवढ्यापुरते असते. दुसरा दिवस पुन्हा ताजातवाना. लहानपणापासून या मानसिकतेतच आपली वाढ झालेली असते. चूक झाली की शिक्षा या धारणेतून हळूहळू सर्वसमावेशक अशा न्यायव्यवस्थेचा जन्म झाला. न्यायव्यवस्थेतही प्रतिमा जपत आज समाजव्यवस्थेत सर्वोच्च असे बळकट स्थानही मिळविले आहे. लोकांनीही न्यायाला देवतेचे महत्त्व दिले आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेने शिक्षा दिलेला मनुष्य पुन्हा नव्याने जीवन जगण्यास उत्सुकही असतो आणि तयारही. अभिनेता संजय दत्त जेव्हा शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला तेव्हा तो ‘सेलीब्रिटी’ असल्याने कॅमेऱ्याच्या विळख्यात अडकला गेला. आपल्याकडे आज शेकडो नव्हे, हजारो कैदी तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर येतात. त्यांच्या गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा भोगल्यानंतर ते नव्याने आयुष्यही उभे करतात. पण ते सेलीब्रिटी नसल्याने त्यांच्याकडे कॅमेरे वळत नाहीत. संजय दत्तची पडद्यावरची प्रतिमा लोकांच्या मनात असल्याने त्याच्या गुन्ह्याच्या प्रमाणालाही प्रतिमेचे वलय चिकटले. त्यामुळे बेकायदा शस्त्र बाळगणारा संजय दत्त थेट दहशतवाद्यांच्या रांगेत जाऊन बसला. मुळात वडील सुनील दत्तकडे पाहून अनेकांनी संजय दत्त म्हणजे ‘चांगल्या घरचा बिघडलेला मुलगा’ अशी प्रतिमा घट्ट करून ठेवली होती. ती काहीशी खरीही होती. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्तच्या वलयामुळे इतर अनेक गंभीर आरोपींकडे, त्यांच्या गुन्ह्यांना तितकी प्रसिद्धी मिळाली नाही हेही खरे आहे. संजय दत्तने २० वर्षे न्यायालयीन लढा दिला. त्यात त्याला शिक्षा ही झालीच. ती त्याने स्वीकारली आणि नव्याने पुन्हा आयुष्य जगण्यास सुरुवातही केली. त्याला प्रसिद्धीचे वलय असल्याने अनेकांनी इतक्या प्रसिद्धीची गरज आहे का? तो काही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून परत आला नाही वगैरे टोमणेवजा शेरेबाजी केली. यात त्याच्याकडे सातत्याने गुन्हेगार म्हणून पाहण्याचा आपला दृष्टिकोन स्पष्ट होतो. मुळात आपली मानसिकता दांभिक आणि दुटप्पी असल्याने आपण कोणत्याही घटनेकडे निखळ नजरेने पाहात नाही. एकीकडे पोर्नस्टार सनी लिओनचे हिंदी सिनेमे कोणताही ‘किंतू’ मनात न ठेवता पाहतो आणि संजय दत्तला मात्र शिक्षा भोगून आल्यावरही माफ करण्यास तयार नसतो. त्याला कायम खलनायक ठरविण्यात आपल्याला विकृत आनंदही मिळत असतो. यात संजय दत्तच्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. त्याने जो गुन्हा केला त्याची शिक्षा त्याने आपल्या न्यायाच्या चौकटीत भोगली तेव्हा त्याच्या गुन्ह्याचा विषय तिथे मिटवायला हवा. संजय दत्तने जेव्हा प्रसारमाध्यमांना विनंती केली की, यापुढे माझा उल्लेख करताना दहशतवादी असा करू नका, मी केवळ बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी होतो आणि कायद्याने शिक्षा भोगलेली आहे. याचा अर्थ हाच होता, की मला सतत गुन्ह्याच्या नजरेतून पाहू नका. त्याची ही विनंती बदलत्या मानसिकतेमध्ये रास्तही म्हणायला हवी. संजयने न्यायालयीन लढाई तर दिली; पण सलमान खान अजूनही कायद्याच्या पळवाटा शोधतो आहे. दोन गंभीर खटले त्याच्यावर आहेत पण शिक्षेचा मागमूस अजून दिसत नाही. त्यालाही प्रसिद्धीचे मोठे वलय आहे. तोही अजून निर्दोष असल्याच्या भूमिकेत वावरताना दिसतो. अर्थात न्यायव्यवस्था त्याचाही जो असेल तो निकाल लावेल. प्रश्न आहे तो शिक्षा झालेल्या मनुष्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार याचा. बदलत्या सामाजिक धारणीत आणि वेगवान समाजरचनेत अनेक गोष्टी एकतर आपण विसरून जातो अथवा काळाच्या उदरात त्या गडप होतात. लोकांची सामाजिक घटनांमधील स्मृती तेवढी तीव्र नसते, जितकी वैयक्तिक घटनांमधील असते. तीच दृष्टी बाळगायला हवी. सातत्याने एकाच चष्म्यातून एखाद्याकडे पाहणे हा त्याचाही अपमान आणि आपल्या संकुचित दृष्टिकोनालाही बळकटी दिल्यासारखे आहे. आपल्या प्रत्येक माणसामध्ये कुणी नायक नसतो अथवा खलनायकही. प्रत्येक जण इतरांकडे पाहताना मात्र न्यायाधीश असतो, तो न्यायाधीश बऱ्याच वेळा पूर्वसंस्कारित अथवा पूर्वग्रहदूषित असतो. त्यामुळे अनेकदा समन्वयाची दृष्टी चुकते हे समजून घेतले तरी पुरे.

(लेखक मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)