गेल्या एप्रिलमध्ये मी ह्युस्टनमध्ये होतो. तेथे मोठ्या प्रमाणात भारतीय लोक राहतात. तेथील काही अनिवासी भारतीयांबरोबर रात्रभोज घेताना आमच्या १६व्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल गप्पा चालल्या होत्या. त्या वेळी मला सांगण्यात आलं, की ह्युस्टमधून जवळपास १00 विद्यार्थी व व्यावसायिक भारतात निवडणूक प्रचारासाठी गेले होते. त्यातील किती जण भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी गेले होते... मी विचारले. किमान नव्वद... माझ्या यजमानांनी उत्तर दिले... नंतर त्यात दुरुस्त करीत ते म्हणाले बहुतेक नव्याण्णव...गेल्या किमान दोन दशकांपासून भाजपा व त्याच्या सहयोगी संघटना अमेरिकेतील भारतीयांमध्ये सक्रिय आहेत. अनेक अनिवासी भारतीयांनी विश्व हिंदू परिषद आणि रा. स्व. संघाला आर्थिक मदत दिली आहे. एका पाहणीनुसार १९९४ ते २00१ या काळात सुमारे २.५ मिलियन डॉलर इतकी मदत विहिंप आणि रा. स्व. संघाला देण्यात आली आहे. अमेरिकेत भारताविषयी सहानुभूती बाळगणारे लोकप्रतिनिधी निवडून यावेत, यासाठी अनिवासी भारतीय प्रचार करीत असतात. तेथील अभ्यासक्रमात हिंदू व त्यांच्या धर्माविषयी काही अयोग्य उल्लेख असतील, तर ते काढण्यासाठी ते मोहीम हाती घेत असतात.गुगलवर मी भाजपाचे परदेशातील मित्र शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला २२,५00 नोंदी मिळाल्या. त्यातली एक अत्यंत आकर्षक अशी मुख्य वेबसाईट होती (ँ३३स्र://६६६.ङ्माु्नस्र.ङ्म१ॅ). शिवाय ब्रिटन, आॅस्ट्रेलिया आदी देशांतल्या काही वेबसाईट्स होत्या व त्यावर भरपूर वृत्तपत्रीय लेखही होते. (त्यातल्या फेब्रुवारी २0१४ मधील एका लेखाचं शीर्षक होतं... अनिवासी भारतीय भाजपाचे सर्वांत मोठे देणगीदार)नंतर मी काँग्रेस पक्षाच्या परदेशी मित्रांचा गुगलवर शोध घेतला तेव्हा मला एकच नोंद मिळाली आणि त्या नोंदीने मला एका फेसबुक पेजवर नेले, तेथे या पेजला दोन लाइक्स मिळाल्या होत्या. त्यानंतर मला इंडियन ओव्हरसीज काँग्रेस या १९६९ साली स्थापलेल्या संघटनेची लिंक मिळाली. अलीकडच्या काळात ही संस्था निष्क्रिय झाल्याचे दिसले. नंतर सोनिया गांधी यांनी न्यूयॉर्कमध्ये उद्घाटन केलेल्या इंडियन नॅशनल ओव्हरसीज काँग्रेसची वेबसाईट सापडली, पण तीही अॅक्टिव्ह नसल्याचे आढळले. २0१४ साली काँग्रेससाठी अनिवासी भारतीय काम करीत असल्यासंबंधीचे कोणतेही वृत्त मला सापडले नाही. पण, ह्युस्टनचे थोडे लोक भाजपाऐवजी आमआदमी पार्टीचे काम करीत असल्याचे मात्र दिसून आले. त्यानंतर मी भारतात परतलो तेव्हा एक जुना अहवाल माझ्या हाती लागला. हा अहवाल एका राजकीय पक्षासाठी १९२२ साली तयार करण्यात आला होता आणि त्याचे शीर्षक होते... अमेरिकेतील प्रसिद्धी कार्य : नवा पण कायम आराखडा. हा अहवाल तयार करण्यास सांगणारा पक्ष होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. हा अहवाल तयार केला होता हुबळी येथील एक राष्ट्रीय कार्यकर्ते एन. एस हर्डीकर यांनी. महात्मा गांधींच्या खास सूचनेवरून काँग्रेस पक्षाने या कामासाठी हर्डीकर यांची नियुक्ती केली होती. हर्डीकरांनी अमेरिका व कॅनडाचा खास दौरा करून तेथील कायम व तात्पुरते निवासी असलेल्या भारतीयांची भेट घेऊ न हा अहवाल तयार केला होता. त्यांनी आपल्या अहवालात पाच शिफारशी केल्या होत्या. त्यातली पहिली शिफारस होती : भारताने आपल्या जनतेच्या हितासाठी परदेशात भारताच्या ध्येयधोरणाचा प्रचार करून तेथील जनमत आपल्याला अनुकूल राहील, याची काळजी घ्यावी. दुसरी शिफारस होती : हा प्रचार भारतीय काँग्रेसच्या नियंत्रणाखाली परदेशात राहणाऱ्या भारतीयांकडूनच झाला पाहिजे. तिसरी : परदेशात प्रसारित करण्यासाठी काँग्रेसने दर आठवड्याला अधिकृत असा सामाजिक व राजकीय वृत्तांत पुरविला पाहिजे. चार : भारतातील काँग्रेसचे नेते त्यांच्या राजकीय कार्यासाठी परदेशात जातील तेव्हा तेथील भारतीयांनी त्यांना मदत केली पाहिजे. पाच : आपल्या काही अभ्यासू व हुशार विद्यार्थ्यांना अशा प्रसिद्धी कार्याचे खास प्रशिक्षण दिले पाहिजे.स्वत: महात्मा गांधींनी हा अहवाल तयार करून घेतला होता, ही यातील महत्त्वाची गोष्ट आहे. ते संपर्कमाध्यमातले तज्ज्ञ होते. आपला संदेश सर्वत्र पोहोचेल, याची ते काळजी घेत असत. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका हे शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयास आल्यामुळे तेथे भारताविषयी सहनुभूती निर्माण करणे राष्ट्रीय चळवळीच्या हिताचे होते. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांसोबत काम केलेले असल्यामुळे अमेरिकेतील भारतीयांसोबत काम करण्याची त्यांना आवश्यकता वाटणे साहजिक होते.१९३0 आणि ४0च्या दशकात भारताच्या हिताची काळजी अमेरिकेत राहणाऱ्या कृष्णलाल श्रीधारणी, ताराकांत दास, जे. जे. सिंग या अनिवासी भारतीयांनी घेतली होती. भारताला ब्रिटिशांच्या वसाहतवादी वर्चस्वातून मुक्त करण्याची आवश्यकता तेथील जनमनावर बिंबवण्यासाठी सिंग यांच्या इंडिया लीग या संस्थेने तर महत्त्वाची कामगिरी बजावली होती.पण, भारत स्वतंत्र झाल्यावर आणि शीतयुद्धाचा प्रारंभ झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा अमेरिकेवरचा विश्वास डळमळीत झाला. त्याच वेळी अमेरिकेचे नेतेही भारतीय नेत्यांकडे संशयाच्या नजरेने पाहू लागले. याच काळात भारतीय व्यावसायिकांची अमेरिकेकडे रीघ लागली, पण ते भारताला पटकन विसरून अमेरिकन समाजात पटकन सामवून गेले.१९९0मध्ये भारताच्या अर्थकारणाने गती घेतल्यानंतरच या अनिवासी भारतीयांचे आपल्या मायभूमीकडे लक्ष गेले आणि त्यांच्या जुन्या आठवणी उचंबळून येऊ लागल्या. पण, या वेळी त्यांच्यापर्यंत काँग्रेसऐवजी भाजपा पोहोचला. अर्थात, त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही; कारण तोपर्यंत काँग्रेस खूप बदललेली होती. तो महात्मा गांधींचा काँग्रेस पक्ष राहिला नव्हता. भाजपाच्या परदेशातील मित्रांनी मात्र हर्डीकरांच्या सर्व पाचही शिफारशींची कसोशीने अंमलबजावणी सुरू केली होती. अर्थात, आज भाजपाला तेथून जेवढा निधी मिळतो तेवढा पूर्वी काँग्रेसला कधीही मिळाला नाही आणि भाजपाचे हे मित्र पूर्वीच्या काँग्रेसच्या मित्रांप्रमाणे सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करीत नाहीत, तर ते फक्त हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात.
अनिवासी भारतीयांचेही मत गमावले
By admin | Published: September 25, 2014 6:05 AM