शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

तेल गेले, तूपही गेले

By admin | Published: January 25, 2015 12:46 AM

सुरेशच्या दुसऱ्या विवाहानंतर रजनीला तिची चूक समजली. सुरेशची कदरही वाटू लागली. हे लग्न अशा प्रकारे अवैध ठरल्यानंतर तिचे दुसरे लग्न होईना.

सुरेशच्या दुसऱ्या विवाहानंतर रजनीला तिची चूक समजली. सुरेशची कदरही वाटू लागली. हे लग्न अशा प्रकारे अवैध ठरल्यानंतर तिचे दुसरे लग्न होईना. माहेरचेही तिच्याशी दुराव्याने वागू लागले. न्यायालयीन आदेशानंतर ६ महिने ती आमच्या कार्यालयात येऊन तिला सुरेशकडे परत कसे जाता येईल याचा प्रयत्न करा, अशी गयावया करीत होती. रजनीच्या माहेरच्यांनी तिच्या भौतिक सुखाचा, आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून हे लग्न ठरवले. त्यांची एकच चूक झाली, म्हणजे जिला संसार करायचा तिचे मत विचारात घेतले नाही. स्वकेंद्रित वृत्ती व जोडीदाराशी, कुटुंबातील सदस्यांशी असंवेदनशीलपणे वागल्याने जवळची नाती कायमची तुटू शकतात. याचेच हे एक उदाहरण आहे, असे म्हणता येईल. कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन रंजनाने संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती. रजनीने नव्या नात्याची कदर ठेवली असती तर सुरेशचा व सर्वांचाच मनस्ताप, न्यायालयीन खर्च, वेळ हे सर्व टाळता येणे शक्य होते. अशा वेळी विवाहपूर्व मार्गदर्शन घेणे, हा एक मार्ग असू शकतो...‘‘मला हे लग्न करायचेच नव्हते. तुम्ही काळे आहात. मला हात लावू नका. मला काळी मुले नकोत.’’ लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवपरिणीत वधू रजनीने पती सुरेशला सांगितले. त्याला तर याचा धक्काच बसला. माझ्यासमोर तो हताश होऊन बसला होता. रजनीची मर्जी नसताना हे लग्न झाले; तेव्हा हे लग्न मोडून तिला मोकळी करावी, या विचाराने तो आमच्याकडे आला. झाल्या प्रकाराने तो अस्वस्थ होता, पण तोल सांभाळून होता. तो सर्व घटना सांगत गेला. रजनी सुस्वरूप होती. सुरेश रूपाने थोडा डावा होता. निर्व्यसनी सुरेशला नोकरी चांगली होती. रजनीच्या घरच्यांनी सुरेशला रजनीचा वर म्हणून पसंत केले. तिला हे स्थळ पसंत आहे का, ते विचारले गेले नाही. तिनेही तिच्या घरच्यांना नापसंती वेळेवर सांगितली नाही.सुरेशचे आई-वडील त्याच्या लहानपणी अपघातात वारले होते. मामाने त्याचा सांभाळ केला; पण मिळवता झाल्यावर सुरेशने स्वत:च्या जिवावर घर थाटून स्वतंत्र राहायचे ठरवले. मामाने रजनीचे स्थळ पाहिल्यावर त्याला नाकारावेसे वाटले नाही. त्यालाही रजनी जोडीदार म्हणून पसंत पडली. त्यानेही सुखी संसाराची काही स्वप्ने रंगवली. त्यातच अनपेक्षितपणे त्याच्यावर हा आघात झाला. त्यानंतर लगेच तो नोकरीवर हजर झाला. शांतपणे विचार करण्यासाठी त्याने थोडा वेळ घेतला. त्यांच्यात शारीरिक संबंध आले नाहीत. सुरेशला रजनीवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायची नव्हती. दोघांतील संवाद संपलाच होता. लग्नानंतर महिनाभरातच हे लग्नबंधन विस्कटले. सुरेश सल्ल्यासाठी आला होता. पण यासाठी काही कायदेशीर अडचणी होत्या. स्वतंत्र कौटुंबिक न्यायालये असली तरी विवाह टिकवण्याकडे या यंत्रणेचा कल होता. त्यामुळे घटस्फोटास वेळ लागला असता. एका जोडीदाराने एका घरात राहूनही दुसऱ्याचा त्याग केला आहे तेव्हा घटफोट दिला जावा, असा अर्ज करण्यास त्याला दोन वर्षे थांबावे लागले असते. पण लग्नानंतर लगेच रंजनाने शरीरसंबंध नाकारल्यामुळे विवाहाचे स्वरूपच बदलत होते. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत हा विवाह करण्यात सुरेशची फसवणूक झाली होती, असा मुद्दा घेऊन हे लग्न अवैध ठरावे व तसे आदेश न्यायालयाने द्यावेत, असा अर्ज करणे सुरेशला शक्य होते. त्याने रजनीला लगेच तिच्या माहेरी पाठवावे, असा आम्ही सल्ला दिला व त्वरित त्याने वरील पद्धतीने लग्न अवैध ठरण्यासाठी अर्ज करावा, असा सुरेशला आम्ही सल्ला दिला. त्यानंतर सुरेशची या लग्नातून सुटका झाली. त्यानंतर लगेचच त्याने दुसरा विवाहही केला.अ‍ॅड. नीलिमा कानेटकर