- सर्बानंद सोनोवाल (केंद्रीय आयुषमंत्री)
'वसुधैव कुटुम्बकम्साठी योग' ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना आहे. आरोग्यसंपन्न, आनंदी शांततामय आणि सर्जनशील जगासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाशी संबंधित सर्व लोकांचे अथक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न, ही संकल्पना अधोरेखित करते. योग सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. 'वसुधैव कुटुम्बकम्'मध्ये 'जग म्हणजे एक कुटुंब' ही भावना अंतर्भूत आहे. या दृष्टीने पाहिल्यास भारताची प्राचीन परंपरा लाभलेला योग हा प्राचीन प्रार्थना 'सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया: (सर्वजण सुखी आणि निरोगी असावेत), साकार करण्यासाठी एक सामर्थ्यवान प्रेरणास्रोत ठरतो.
'आयुष'ने गेल्या नऊ वर्षांत मोठी प्रगती केल्याच मी सुरुवातीलाच पुनरुच्चार करतो. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना, दूरदृष्टी सामूहिक वाढत्या स्वीकाराचा आविष्कार आहे. आणि भारता 'भारताच्या परंपरांची सखोल जाण, यामुळे आयुष झपाट्याने पुढे येत आहे. जनसामान्यांच्या सेवेप्रती त्यांची ठाम कटिवद्धता आणि प्रत्येक क्षेत्रात भारताची कामगिरी उत्कृष्ट राखण्याची इच्छा, यामुळे दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र यांनी 2014 मध्ये दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांमध्ये देतानाच जागतिक कल्याण आणि परिपूर्ण आरोग्याचा मंत्र दिला. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांनी एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि जगाने त्याचा मनापासून स्वीकार केला.
'वसुधैव कुटुम्बकम्साठी योग हा एका दिवसात आलेला विषय नव्हे. अतिशय विचारपूर्वक, चर्चेअंती, अनेकांकडून प्रतिबिंबित झालेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा विषय आहे. जी- 20 राष्ट्रांचे प्रतिनिधी, एससीओ (शांघाय सहकार्य संघटना) सदस्य देश आणि एससीओमधल्या भागीदार देशांनी योग अतिशय सन्मानपूर्वक भावनेने घेतला आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनी, विविध देशांची प्रतिनिधी मंडळे योगाभ्यास करतील.
आपण आता पाहत असलेला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणजे योगाचा सामूहिक वाढत्या स्वीकाराचा आविष्कार आहे. जगभरातले भारतीय दूतावास, परदेशातील भारतीय मिशन, वाणिज्य दूतावासांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय प्रोत्साहन देते. यामुळे जागतिक समुदायामध्ये योगाला प्रोत्साहन मिळून भारताची सांस्कृतिक मुत्सद्देगिरी अधिकच जोरकस होते. त्याचबरोबर इतर मंत्रालयेही आपापल्या क्षेत्रात या कार्यक्रमांसंदर्भात कार्य करतात.
आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 च्या संकल्पनेची संपूर्ण क्षमता जाणून घेण्यासाठी आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावे लागेल. गेल्या वर्षी आपण 'गार्डियन रिंग ऑफ योगा' केले. यावर्षी आपण योग प्रात्यक्षिकातून 'ओशन रिंग' तयार होईल या दृष्टीने योग प्रात्यक्षिके करत आहोत. मुख्य रेखावृत्तावर किंवा त्याच्या जवळच्या त्याच्या आर्क्टिक अंटार्क्टिक देशांमधून योग प्रात्यक्षिके करणार आहोत. 21 जून रोजी होणाऱ्या या दोन प्रात्यक्षिकातून जागतिक समुदायाचा सहभाग मोठ्या प्रमाणात तर वाढेलच, त्याचबरोबर योग करण्याचे ठिकाण कोणतेही असो किंवा परिस्थिती कोणतीही असो, योग ही जीवन तगवणारी शक्ती आहे याची प्रचीती देईल. उत्तर आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशातही योग प्रात्यक्षिके होतील.
आर्क्टिकमधल्या स्वालबार्ड इथल्या भारतीय संशोधन केंद्रात आणि 'भारती' या अंटार्क्टिकामधल्या तिसऱ्या भारतीय संशोधन तळावरही योग प्रात्यक्षिके करण्यात येतील अंतरराष्ट्रीय योग दिन हा प्रत्येक घटकाचा आहे.ग्रामीण स्तरावर कॉमन योग प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, यासाठी सामायिक सेवा केंद्रेही सहभागी करून घेण्यात आली आहेत. राष्ट्रीय आयुष मिशनअंतर्गत आयुष आरोग्य आणि निरामयता केंद्रेही याचे पालन करतील. भारतातली सर्व आरोग्य आणि निरामयता केंद्रांचा यात सहभाग राहील. शैक्षणिक संस्था-रुग्णालये यासारख्या आयुषशी संबंधित सर्व ठिकाणीही कॉमन योग प्रोटोकॉल अनुसरला जाईल. प्रत्येक राज्यातले एक आयुष ग्राम कॉमन योग प्रोटोकॉल प्रात्यक्षिकात सहभागी होईल. यासाठी ठराविक गावांमध्ये योग प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत, जेणेकरून 'संपूर्ण योग ग्राम' हे उद्दिष्ट साध्य करता येईल. ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत योग पोहोचवून 'हर आंगन योगा' हे लक्ष्य साध्य करण्याचे अंतिम उद्दिष्ट यामागे आहे.
या वर्षी योगदिनी मा. पंतप्रधान, न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग प्रात्यक्षिकांचे नेतृत्व करतील. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर योग अभ्यासासाठी मोठेच पाठबळ मिळेल. आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 जा जवळ येऊ लागला आहे, तसतसे प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक ठिकाण अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरावा यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यायचे आहे. थोडा वेळ काढून आपणही माझ्याप्रमाणे दररोज योग करून योगाच्या उपचारात्मक आणि रोग निवारक सामर्थ्यामध्ये स्वतःला झोकून द्या. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाला 'वसुधैव कुटुम्बकम्'च्या सामर्थ्याची जोड लाभल्याने हा आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष असेल, याचा मला विश्वास आहे.