शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

...तरच स्त्रिया खऱ्या अर्थाने सुरक्षित!

By admin | Published: May 08, 2016 2:03 AM

स्त्री आणि पुरुष दोघंही समान आहेत. प्रकृती - पुरुष या २ तत्त्वांवर निसर्गचक्र चालू आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले अशा थोर व्यक्तींनी स्त्री-सुधारणेसाठी आयुष्य वेचलं, हे आपला इतिहास

- अश्विनी एकबोटेस्त्री आणि पुरुष दोघंही समान आहेत. प्रकृती - पुरुष या २ तत्त्वांवर निसर्गचक्र चालू आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले अशा थोर व्यक्तींनी स्त्री-सुधारणेसाठी आयुष्य वेचलं, हे आपला इतिहास सांगतो. तरी, आपल्याला स्त्रीचा सन्मान करा, आदर करा हे शिकवावं लागतंय यासारखी लज्जास्पद ती दुसरी कुठली गोष्ट असेल?स्त्री पुरुषापेक्षा कधीच कमी नव्हती, कमी नाही. हे सिद्ध करायची काहीच गरज नाही. आपण हे सिद्ध करण्याचा अट्टाहास करतो. याचाच अर्थ कुठेतरी आपण हे मान्य केल्यासारखं होतं. परत हे सिद्ध करण्यासाठी कुठला मार्ग अवलंबतो हेही महत्त्वाचं आहे. उत्तम मार्ग म्हणजे आपल्या क्षेत्रात इतक्या उंचीला पोचायचं की पर्यायच ठेवायचा नाही. ज्या स्त्रिया मोठ्या झाल्या त्यांनी ‘आधी केलं मग सांगितलं!’ नुसती बडबड केली नाही, तर स्वबळावर मोठ्या झाल्या, त्या सगळ्यांनी खरा पुरुषार्थ जाणला. फक्त विरोधाला विरोध करून समाज परिवर्तन होत नसतं. २०१५ची गोष्ट, परदेशी महिलेसमोर एका भारतीय पुरुषाने अश्लील चाळे केले. तिने अत्यंत हुशारीने स्वत:च्या मोबाइलवर त्याचं शूटिंग केलं आणि ट्विटरवर टाकलं. त्या पुरुषाला लगेच पकडण्यात आलं आणि शिक्षाही झाली. खूप आनंद झाला. ‘अतिथी देवो भव:’ अशी आपली भारतीय संस्कृती. ती मातीत मिळवणारी आपलीच काही असंस्कृत माणसं. या परदेशी माणसांना लुटतात तरी किंवा त्या बायकांकडे अशा पद्धतीने पाहतात. बरं ही माणसं दुसऱ्या देशात गेली तरी देशाला बदनाम करायला मागेपुढे पाहत नाहीत, मग बाहेरच्या देशात सगळ्या भारतीयांना एकाच मोजपट्टीने मोजतात. त्यांना तरी काय बोलणार? असो. मनात आलं की जितकी झटपट त्याला शिक्षा झाली तशी, ज्या महिलांवर, चिमुकल्यांवर बलात्कार झाले त्यांचे निर्णय मात्र का रखडतात? परदेशी पाहुण्यांबरोबर असं वागल्यावर इतक्या पटकन निर्णय होत असतील तर आपल्या भारतीय महिलांबाबतीत तर क्षणात कृती व्हायला हवी. अश्लील चाळे केल्यावर जर तुरुंगवास तर बलात्काराला मृत्युदंडच हवा. कायद्याला भावना कळत नाहीत म्हणे! अरे, पण ज्या लोकांसाठी कायदा बनवला त्यांना त्याचा उपयोग नसेल आणि मग संतप्त होऊन एखाद्याने भलतंसलतं केलं तर, कायद्याने न्यायही मिळणार नाही आणि कायदा हातातही घ्यायचा नाही. फक्त मुस्कटदाबी सहन करायची.भारतात ३ मिनिटांना १ बलात्कार अशी आकडेवारी समोर येते. पण, दुबई-सिंगापूरला असे गैरवर्तन खपवूनच घेतलं जात नाही. कारण तिथे कायद्याची भीती आहे, बलात्काराला देहदंड होतो. सिंगापूरला मला एका पुरुषाचा चुकून धक्का लागला, तो मला किमान ४ वेळातरी सॉरी म्हणाला, त्याच्या डोळ्यांत दिलगिरी होती, आदर होता, आणि भीतीही! आपल्याकडे चुकून धक्का लागला तर माफी मागणं तर लांबचीच गोष्ट, उलट काही झालंच नाही असा आव आणतात. मला मुंबईतील घटना आठवते. मुंबईहून पुण्याला निघाले होते. ३ पुरुषांनी एक टॅक्सी शेअर केली. मी एकटीच होते. त्या ड्रायव्हरने तिघांना विनंती केली की, ही बाई आहे. तिला पुढे बसू दे. एक म्हणाला, मी आधी आलोय, पैसे दिलेत. मी मागे बसणार नाही. मागचा म्हणाला, मी विंडो सिट सोडणार नाही. त्यावर तो ड्रायव्हर म्हणाला, तुमचे पैसे परत घ्या, मला जायचंच नाही, तुमच्या घरी आई-बहीण नाही का? त्यावर ती माणसं म्हणाली, पैसे परत घेणार नाही, याच गाडीतून, याच सिटवर बसून जाणार! आम्हाला शिकवू नकोस, आमच्याही घरी बायका आहेत, आम्हाला कळतो स्त्रिचा सन्मान कसा करायचा ते. हे सगळं पाहून मला हसायला आलं. म्हटलं, यांना फक्त घरातल्या स्त्रियांचा आदर करायला शिकवलं वाटतं? तेही खरं का खोटं कुणास ठाऊक? शिक्षण फक्त पुस्तकातच राहिलं, आचारांत-विचारांत संस्कार उतरलेच नाहीत. पुरोगामित्व विचारात असायला हवं. माणसाचे विचार बदलले तरच समाज कृतिशील होईल. आता माणसांच्या मनाची कवाडं, डोळ्यांवरची बुरसटलेली झापडं कशी उघडतील यावर काम करायला हवं. आपण सगळ्यांनी आता सुरुवात केली तर कदाचित ४० वर्षांनंतर जन्माला येणाऱ्या आपल्या मुली खऱ्या अर्थाने सुखी, समाधानी, सुरक्षित सबला नारी असतील.