शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पर्यावरणाच्या जतनासाठीच आरे कारशेडला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 5:38 AM

आरेमध्ये फक्त कारशेडच नाही तर या ठिकाणी भविष्यात विविध प्रकल्प होणार आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतीलच नाही तर हे जगातील एकमेव असे जंगल आहे की जे एका शहरामध्ये नैसर्गिकरीत्या वसलेले आहे. आरे कॉलनी हा त्याचा बफर झोन आहे. हा विभाग इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने येथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ शकत नाही. तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडून मेट्रो- ३ साठी कारशेड बनवले जात असल्याने आम्ही त्यास विरोध केला. आम्ही पर्यावरणाचे जतन करण्यासाठी लोकचळवळीतून विरोध दर्शवला.

आरेमध्ये फक्त कारशेडच नाही तर या ठिकाणी भविष्यात विविध प्रकल्प होणार आहेत. यामुळे येथील वनसंपत्ती, नैसर्गिक स्रोत आणि वन्यजीव हे घटक नष्ट होणार असल्याने यांच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व पुढे आलो आहोत. आम्ही विकास प्रकल्पांच्या विरोधात नाही, पण निसर्गाचे नुकसान करून विकास होत असेल त्याविरोधात आहोत. आरेमध्ये कारशेडच्या निमित्ताने येथे प्रवेश मिळवणे हा त्यांचा हेतू आहे. यानंतर या ठिकाणी अनेक विकासक आरेमध्ये येणार असून अनेक प्रकल्प राबवण्याचा सरकारचा मानस आहे. याचा मोठा परिणाम येथील पर्यावरणावर होणार आहे. आरेमध्ये अनावश्यक मेट्रो स्टेशन बांधणार आहेत. यासह येथे ९० एकरांच्या जागेवर एसआरएमार्फत अडीच लाख झोपडीधारकांचे पुनर्वसन करणार आहेत. भव्य मेट्रो भवन उभारण्यात येणार आहे. येथे २४० हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. तसेच आरेमध्ये आरटीओ कार्यालयही उभारण्याचा त्यांचा मानस आहे. यामुळे आरेमध्ये अवजड वाहनांची वर्दळ वाढणार आहे. इतके प्रकल्प जर आरेमध्ये आले तर येथे किती जंगल उरेल? यानंतर सर्वसामान्य माणसालाही तेथे जाण्यासाठी तिकीट घेऊनच जावे लागेल. आरे कॉलनीचे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) करण्याचा घाट घातला जात आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) आरे कारशेडच्या जागेवर वर्षभरापासून मातीचा भराव घालण्याचे काम सुरू केले. यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईत चार वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली होती. भविष्यातही अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

आरेतील झाडे जेव्हा रात्रीची तोडली जात होती तेव्हा जे उत्स्फूर्त आंदोलन झाले त्या वेळी १४४ कलम लावण्यात आले. एखादे जंगल, नदी अथवा नैसर्गिक स्रोत हे वाचवणे घटनात्मक अधिकार आहे. तरीही आंदोलकांवर चुकीच्या केसेस दाखल करण्यात आल्या.एमएमआरसीएलच्या वतीने २४ हजार झाडे लावल्याचा दावा केला जात आहे, हा दावा चुकीचा आहे. झाडे नाही तर रोपे लावली जातात. पण त्यांनी ही रोपे कुठे लावली किती हेक्टरमध्ये लावली हे सांगावे. किती हेक्टरवरील झाडे तोडली आणि किती हेक्टरवर झाडे लावली हे जाहीर करावे. एमएमआरसीएलचे असे म्हणणे आहे की त्यांनी २१४१ झाडे तोडली, पण पर्यावरणवाद्यांनी एक व्हिडीओ बनवला आहे त्यात फक्त ३०० ते ४०० झाडे तोडली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आंदोलकांची दिशाभूल करण्यासाठी हा आकडा फुगवून सांगण्यात आला. पर्यावरणाचे जतन करणे आपले कर्तव्य आहे आणि आम्ही ते करतच राहू.- हर्षद तांबेआरे कन्झर्व्हेशन ग्रूपचे सदस्यकारशेडच्या जागेवरील १,०८९ झाडे वाचवलीआरेमध्ये मेट्रो-३ मार्गिकेचे कारशेड ज्या ठिकाणी उभारले जात आहे तिथे एकूण ३,६९१ झाडे होती. त्यातील २१४१ तोडण्यात आली तर १०८९ झाडे वाचवली आहेत. कारशेड उभारण्यासाठी आवश्यक जागेवरील झाडे वृक्ष प्राधिकरण आणि उच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार तोडली असून ४६१ झाडांचे त्याच भागात पुनर्रोपण करण्यात आले आहे.

मेट्रो मार्गिकेसाठी कारशेड किंवा मेट्रो यार्ड हे मार्गिकेच्या कोणत्या तरी एका टोकाजवळ असणे आवश्यक असते. कारण रोजचे मेट्रोचे चलनवलन म्हणजे आॅपरेशन तेथूनच होत असते. रात्री सर्व मेट्रो ट्रेन मुक्कामाला तेथे परत जातात. त्यांची रोजची देखभाल तेथे होते. आॅपरेशन कंट्रोल सेंटर तेथे असते. दर तीन मिनिटांच्या फ्रिक्वेन्सीने पूर्णत: आॅटोमॅटिक आणि चालकरहित तंत्रज्ञान असणाऱ्या या ट्रेन पूर्ण कार्यक्षमतेने चालवायच्या असतील, ट्रेन आणि प्लॅटफॉर्मची स्वयंचलित दारे आणि इतर प्रणाली विनाअडथळा चालवायच्या असतील आणि रोजचे १७ लाख प्रवासी जर वाहून न्यायचे असतील तर या प्रत्येक बाबीमध्ये डेपो आणि त्यातील विविध प्रणालींचा सहभाग असतो. त्यामुळे डेपो कुठे असला पाहिजे याचे नियम ठरलेले आहेत. मेट्रो आॅपरेशनची तांत्रिकताच हे नियम निश्चित करते. कोणीही व्यक्ती तिच्या आवडीनिवडीनुसार डेपो कुठे असावा यावर सवंग भाष्य करू शकत नाही.सध्या कांजूरमार्ग येथे डेपो करणे कसे शक्य आहे हे पुन्हा पुन्हा सांगितले जाते. पण वस्तुस्थिती अशी आहे की आजही त्यावरील न्यायालयीन स्थगिती उठलेली नाही आणि आजही ही जागा उपलब्ध नाही. मेट्रो-३ साठीही नाही आणि एमएमआरडीए करत असलेल्या मेट्रो-६ साठीसुद्धा नाही. त्यावरील खासगी जमीन असल्याचा दावा सिद्ध झाल्यास ती जागा संपादित करावी लागेल. त्यासाठीची प्रक्रिया वेळखाऊ आणि प्रचंड आर्थिक भार टाकणारी असेल.मेट्रो-३ चे अर्ध्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे, सर्व प्रणालींचे कामही सुरू झाले आहे. सद्य:स्थितीत कोणत्याही परिस्थितीत कार डेपोचे क्षेत्र आरे येथून अन्य ठिकाणी नेणे शक्य नाही. आरे कॉलनीत एकूण ४.८० लाख झाडे आहेत. त्यापैकी केवळ २,७०० झाडे कार डेपोने बाधित होतात. ती अशा जागेवरची की ज्याच्या तिन्ही बाजूंनी रस्त्यांवरील वाहतूक सुरू आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडला लागून आहे. केवळ ३० हेक्टर क्षेत्राच्या या भूभागावर कोणतेही वन्यजीवन नाही. आदिवासींचा रहिवासही नाही. यात झाडे असली तरी १० हेक्टरपेक्षा अधिक जागा मोकळी म्हणजे चराऊ कुरणाच्या स्वरूपात आहे. यापैकी ४६१ झाडांचे पुनर्रोपण जवळच करण्यात आले असून उर्वरित २,१४१ झाडांच्या बदल्यात आतापर्यंतच एकूण २४,००० झाडे एमएमआरसीने लावली आहेत. त्यापैकी २१,५०० झाडे जवळच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लावली आहेत आणि ती उत्तमपणे वाढत आहेत.दररोज १७ लाख प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मेट्रो-३ मुळे दररोज रस्त्यांवरील ६ लाख वाहनफेºया कमी होतील. परिणामी ३.५ लाख लीटर इंधनबचत तसेच प्रतिवर्षी २.६१ लाख प्रदूषित वायूंचे उत्सर्जन कमी होणार आहे.मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ(एमएमआरसीएल)ंंं

टॅग्स :Aarey ColoneyआरेMetroमेट्रो