- डॉ. व्यंकटेश शिवणेआॅस्टियोपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. उतारवयात साधारणपणे वयोवृद्ध स्त्रियांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा पाच ते सहा पटीने अधिक आढळते. उतारवयात कमरेत वा पाठीच्या मणक्यात येणारा बाक, उतारवयात मांडीचे वा पायाचे हाड मोडणे यासाठी हाडांची ठिसूळता कारणीभूत असते. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हाडे ठिसूळ होेण्याचे प्रमाण अधिक असते व अधिक वेगाने होते. हल्लीच्या निष्कृष्ट दर्जाचा आहार, व्यायामाचा अभाव, सूर्यप्रकाशात न जाणे या व इतर गोष्टी आॅस्टियोपोरोसिससाठी कारणीभूत आहेत. हाडांच्या मजबुतीसाठी ‘ड’ जीवनसत्वाची आवश्यकता असते. पुरेशा ‘ड’ जीवनसत्वामुळे आहारातील कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचते.हाडांच्या वाढीची व मजबुतीची सुरुवात आईच्या गर्भातच होते. जन्मापासून ते वयाच्या २५ ते ३५ वर्षांपर्यंत हाडामध्ये जमा होणाऱ्या कॅल्शिअमला पीक बोन मास अथवा हाडांची बँक असे म्हणतात. हीच बँक आपल्या उतारवयात हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. मुळातच जर या बँकेची कॅल्शिअमची मर्यादा कमी असेल, तर वयाच्या ३५शीनंतर आॅस्टियोपोरोसिसचा धोका अधिक असतो. जगभरात आॅस्टियोपोरोसिसचे प्रमाण वाढते आहे. मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार यासारखाच आॅस्टियोपोरोसिस हा आजार आर्थिक बोजा वाढवणारा व तितकाच धोकादायक आजार आहे. म्हणूनच हाडांची काळजी घेणे, कॅल्शिअमयुक्त आहार घेणे, भरपूर व्यायाम करणे या गोष्टी बालवयातच शिकवल्या गेल्या पाहिजेत. आॅस्टियोपोरोसिसचा प्रतिबंध शक्य आहे, पण याची सुरुवात ही बालपणापासूनच व्हायला हवी. पुरेसा कल्शिअमयुक्त आहार जसे दूध, दही, बटर, ताक, नाचणी, फळे, मासे, भरपूर हिरव्या भाज्यांचे सेवन, कडधान्ये व पुरेसा प्रथिनेयुक्त आहार फार महत्त्वाचा! ‘ड’ जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात उन्हापासून मिळते किंवा ‘ड’ जीवनसत्वाच्या गोळ्याही उपलब्ध आहेत. गरोदरपणात व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी कॅल्शिअम व ड जीवनसत्वाच्या गोळ्या अवश्य घ्याव्यात. भरभर चालणे, धावणे सायकल चालवणे, पोहणे, जिने चढउतार करणे, यासारखे व्यायाम आपल्या स्नायंूना मजबुती देतात. पुरुषांनीही धूम्रपान, मद्यपान वर्ज्य करावे. या आजाराविषयी अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. आपले आरोग्य हे आपल्या जीवनशैलीवर अवलंबून आहे आणि आॅस्टियोपोरोसिस हा निरोगी जीवनशैलीने रोखता येतो.कुणाला होऊ शकतो?१) रजोनिवृत्ती२) दोनपेक्षा अधिक वेळा बाळंतपण झालेल्या स्त्रिया३) गरोदरपणात कॅल्शिअमच्या गोळ्या न खाणे४) व्यायामाचा अभाव५) निष्कृष्ट दर्जाचा आहार६) ड जीवनसत्वाची कमतरता७) स्टिटॉइडस, टी. बी. (क्षयरोग), अपस्मार (फीट येणे) मनोविकृतीच्या गोळ्या, यासारख्या औषधांचे सेवन८) धूम्रपान व मद्यपान९) मूत्रपिंड व यकृताचे विकार१0) कर्करोग व तत्सम आजारलक्षणे१) सतत मान, पाठ व कंबर दुखणे२) पाय दुखणे३) पाठीत बाक येणे४) गुडघे दुखणे५) उंची कमी होणे६) मांडीचे वा हाताचे हाड मोडणे७) हातापायात पेटके येणे इत्यादीकुणाला होऊ शकतो?१) रजोनिवृत्ती२) दोनपेक्षा अधिक वेळा बाळंतपण झालेल्या स्त्रिया३) गरोदरपणात कॅल्शिअमच्या गोळ्या न खाणे४) व्यायामाचा अभाव५) निष्कृष्ट दर्जाचा आहार६) ड जीवनसत्वाची कमतरता७) स्टिटॉइडस, टी. बी. (क्षयरोग), अपस्मार (फीट येणे) मनोविकृतीच्या गोळ्या, यासारख्या औषधांचे सेवन८) धूम्रपान व मद्यपान९) मूत्रपिंड व यकृताचे विकार१0) कर्करोग व तत्सम आजार‘आॅस्टियोपोरोसिस’चे निदान पूर्वी या आजाराचे निदान एक्स-रे फिल्मवरून केले जात असे. विशेषत: पाठीच्या व कमरेच्या मणक्याचे फ्रॅक्चर यांचे निदान एक्स-रे वरून होते.डेक्झा स्कॅन : या अद्ययावत मशिनद्वारे हाडांच्या कल्शिअमचे मोजमाप करणे शक्य आहे. या स्कॅनद्वारे कमरेच्या, पाठीच्या मणक्यातील, तसेच मांडीच्या हाडातील कॅल्शिअमद्वारे आॅस्टियोपोरोसिसचे निदान केले जाते, तसेच उपचाराला मिळणारा प्रतिसादही मोजता येतो.उपचार : कॅल्शिअमयुक्त आहार व कॅल्शिअमच्या गोळ्या, ड जीवनसत्वाच्या गोळ्या व इंजेक्शन, हाडांची ठिसूळता रोखणाऱ्या गोळ्या, अॅलेनड्रोनेट व झोलेनड्रोनेट अॅसिडचे इंजेक्शन, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, हाडे मजबूत करणारी इंजेक्शन, जसे पॅराथॉयराइड हार्मोनची इंजेक्शनस.
हाडांच्या ठिसूळतेचे कारण आॅस्टियोपोरोसिस
By admin | Published: June 19, 2016 12:23 AM