शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

गावागावात व्हावे अस्थिकुंड

By admin | Published: October 04, 2016 12:25 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पाईक लक्ष्मणदादा नारखेडे परवा भेटले. ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील श्री भूवैकुंठ आत्मानुसंधान आश्रमात ते राहतात.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पाईक लक्ष्मणदादा नारखेडे परवा भेटले. ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील श्री भूवैकुंठ आत्मानुसंधान आश्रमात ते राहतात. हा आश्रम कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्यांनी स्थापन केला आहे. लक्ष्मणदादांनी आपले घरदार राष्ट्रसंतांच्या कार्यात आणि आयुष्य समाज जागरणासाठी समर्पित केले आहे. गावागावात अस्थिविसर्जन कुंड व्हावे, हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. हा तसा क्रांतिकारक विचार, समाजाला पचनी न पडणारा. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या अस्थींचे विसर्जन अलाहाबाद, त्र्यंबकेश्वरलाच व्हावे, हे परंपरेचे जोखड आपल्या मानगुटीवर पिढ्यान्पिढ्यांपासून घट्ट चिकटून असते. त्यामुळे गावातच अस्थी विसर्जित व्हाव्यात, ही गोष्ट आपण सहजासहजी स्वीकारत नाही. गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात करताना आपल्या घरातील ज्येष्ठांचे आक्रसलेले चेहरे अशा वेळी आठवून पाहावेत.अंत्यसंस्कारानंतरच्या अवास्तव धार्मिक विधींमुळे गरीब शेतकऱ्याचे सामाजिक, आर्थिक शोषण होते, ते थांबावे यासाठी तुकडोजी महाराज आयुष्यभर धडपडले. अंत्यसंस्कार, अस्थिविसर्जन त्यानंतर होणारी तेरवी, मासिक श्राद्ध, वर्षश्राद्ध या रुढींवर कर्ज काढून, उधार-उसने घेऊन सामान्य माणूस अवाढव्य खर्च करतो. तो अस्थी घेऊन काशी, अलाहाबादला जातो. तेथील पंडे, पुजारी त्याला लुटतात. या कर्जाच्या ओझ्याखाली तो आयुष्यभर पिचून राहतो, त्यातून कधीच बाहेर येत नाही. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या नष्टचर्याला कारणीभूत असलेली रुढी, परंपरांची ही अवनती राष्ट्रसंतांना ठाऊक होती. पिंडदान, श्राद्ध या कल्पना थोतांड असून त्यामुळे धनाचा, श्रमाचा आणि वेळेचा अपव्यय होतो, हे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून कळवळून सांगितले. परंतु ही जळमटे सहज नष्ट होणार नाहीत, हे वास्तव अनुभवांती लक्षात आल्यानंतर राष्ट्रसंतांनी मोझरी येथील श्री गुरुकुंज आश्रमात एक अस्थिविसर्जन कुंड निर्माण केले. इथे अस्थिविसर्जनासाठी लोक येतात. सकाळचे ध्यान आटोपल्यानंतर हा विधी होतो. अवघ्या पाच-दहा मिनिटांत तो पूर्ण होतो. एका रुपयाचा खर्च नाही तसेच पुजाऱ्याला गाय दान करायची गरजही नाही... असेच एक अस्थिविसर्जन कुंड राष्ट्रसंतांनी मध्य प्रदेशातील सौंसर येथेही निर्माण केले आहे. सहकाऱ्यांसोबत चर्चा करताना गावागावात असे कुंड निर्माण व्हावे, ही त्यांची तळमळ होती. त्यांच्या पश्चात हे कार्य गुरूदेव भक्तांना पुढे नेता आले नाही.परंतु आज धार्मिकस्थळी बजबजपुरी माजली असताना गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात असे अस्थिविसर्जन कुंड निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसे झाले तर धार्मिक विधींवर होणारा खर्च वाचेल व त्यातून शिल्लक रक्कम गावातीलच लोककल्याणाच्या कार्यात उपयोगी पडेल. शिवाय तलाव, नदींचे प्रदूषणही थांबेल. तुकारामदादा गीताचार्यांनी जागृतीचे हे कार्य आयुष्यभर केले. अंत्यसंस्कारानंतर संबंधित कुटुंबीयांची भेट घेऊन कर्मकांडात धन खर्च न करता सत्कार्य करण्याचा संकल्प ते कुटुंबीयांकडून घ्यायचे. अशा कुटुंबांचा जाहीर सत्कारही करायचे. तुकडोजी महाराजांनीच सांगितले आहे. ‘ तुझं गावच नाही का तीर्थ? अरे रिकामा कशाला फिरतं... गावी राहती गरीब उपाशी, अन्नसत्र लावितोस काशी, हे दान नव्हे का व्यर्थ’?या चळवळीच्या निमित्ताने गुरुकुंज आश्रमातील पदाधिकाऱ्यांना एक विनंती करावी वाटते, आश्रमात अस्थिविसर्जनाची प्रक्रिया पहाटेच करावी लागते. तसा दंडक महाराजांनी कधी घातला नाही. दिवसभरात केव्हाही तो करण्याची मुभा राहिली तर गरिबांना ते सोयीचे होईल. हा क्रांतिकारी विचार आपल्या गावात रुजविण्यासाठी सर्व सामाजिक संस्थांनी, शासनाने व त्याही आधी गावातील ग्रामपंचायतने समोर येणे गरजेचे आहे. मेल्यानंतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अस्थिविसर्जन केल्यामुळे स्वर्गसुख मिळते, अशी हिंदूंमध्ये धारणा आहे. परंतु गावातच जर अस्थिविसर्जन केले व त्यातून वाचवलेले पैसे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले तर मृतात्म्यांना स्वर्गही मिळेल व समाजाचे ऋण थोडे का होईना फेडल्याचे एक आंतरिक समाधान कुटुंबीयांच्या पदरात पडेल.- गजानन जानभोर