शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

खमक्या नेतृत्वाची सैरभैर फौज

By admin | Published: October 28, 2016 4:50 AM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निमित्ताने अजित पवार राजकारणाची नव्याने मांडणी करीत आहेत... या खमक्या नेत्याच्या सैरभैर फौजेची बांधणी ते कसे करणार?

- राजा मानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निमित्ताने अजित पवार राजकारणाची नव्याने मांडणी करीत आहेत... या खमक्या नेत्याच्या सैरभैर फौजेची बांधणी ते कसे करणार?सोलापूर जिल्हा आणि शरद पवार यांचे तसे जुने जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे राजकीय नाते! ७० च्या दशकात कृषी राज्यमंत्री असलेल्या पवारांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळताना या नात्याची बांधणी केली. त्यामुळे राजकारणात ते जसजसे मोठे होत गेले तसतसे ते नातेही घट्ट होत गेल्याचा अनुभव सर्वांना आला. त्याच कारणाने सोलापूर जिल्ह्यातील कोणतेही पद त्यांनी पाठविलेल्या बंद पाकिटातील नावावरून निश्चित व्हायचे. पण गेल्या दशकात परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्यांचा संपर्क मर्यादित नेत्यांपुरताच राहू लागला आणि जिल्ह्याचे आणि त्यांचे राजकीय नाते ठिसूळ बनले. या पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात तब्बल चार दिवस जिल्ह्यात घेतलेल्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने त्या राजकीय नात्याची आठवण सर्वांनाच झाली असावी. शरद पवार आणि अजित पवार या दोघांची राजकीय कार्यपद्धती तशी भिन्न जातकुळीचीच! काका कुणालाही तळ शोधू न देणारे तर पुतणे अजितदादा रोखठोक बोलून ‘आत एक - बाहेर दुसरेच’ तत्त्वाला हद्दपार करणारे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना कार्यकर्त्यांच्या दोन स्वतंत्र फळ्या नैसर्गिकरीत्या तयार झाल्या. त्या फळ्यांनी थोरले पवार व धाकले पवार यांच्या कार्यपद्धतीशी सोयीने जुळवून घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षात सर्वकाही आलबेल असल्याचा आभास निर्माण झाला. त्याच आभासाने पक्ष आणि नेते यांचा वापर आपले ‘सवतेसुभे’ मजबूत करण्यासाठी केला. परिणामी सवतेसुभे मजबूत झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेतेही जनतेपासून कधी दूर गेले हे कोणाला कळले नाही. आपल्या सुभ्यातील सत्ताकारणाला मदत करणारा सोयीचा नेता हे सूत्र गेल्या १०-१५ वर्षांत जिल्ह्यात रूढ झाले. देशात सर्वाधिक साखर कारखाने असणारा ३८ कारखान्यांचा जिल्हा म्हणून ख्याती निर्माण झाली. ते निर्माण करणारा राष्ट्रवादी पक्ष मात्र कागदावरच राहिला. निवडणुकीत सोयीचा आणि उमेदवारी देणारा तो आपला पक्ष अशीच काहीशी गणिते राष्ट्रवादी पक्षाची फौज मांडू लागली. ही पार्श्वभूमी घेऊन जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मोर्चेबांधणीसाठी अजित पवार गतिमान झाल्याचे दिसले. यावेळी त्यांच्या गतिमानतेतील वेगळा दृष्टिकोन मात्र दिसला. परंपरेने चालत आलेल्या तथाकथित गाजावाजा करणाऱ्या मेळाव्यात न गुंतता थेट लोकांमध्ये जाण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचे दिसले. ७० हजार कोटी रुपयांच्या जलसंपदा विभागातील घोटाळ्याचा बनाव विरोधकांनी कशा पद्धतीने केला आहे हे ते आकडेवारीसह स्पष्ट करताना दिसले. आपला स्वभाव फटकळ नसून स्पष्टवक्तेपणाचा असल्याचे देखील ते कृतीने पटवून देताना दिसले. चितळे समितीने दिलेल्या दाखल्याच्या हवाल्याने राज्यात सहा टक्के सिंचन क्षेत्र वाढल्याचे ठासून सांगताना ते दिसले. उजनी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय त्यांनीच घेतला व धरणाची पाणी साठवण क्षमता ११४ टक्क्यांवर गेली हे देखील ते पहिल्यांदाच बोलताना दिसले. उजनी धरणासह कृष्णा खोऱ्यात त्यांनी उभ्या केलेल्या प्रकल्पाची माहिती देताना सोलापूर जिल्हा रब्बी हंगामाचा होता तो बागायती कसा झाला? हेही ३८ साखर कारखान्यांचा पुरावा देत बोलताना दिसले. पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात त्यांना विश्वासाने सोबत घेण्याची निती त्यांनी अवलंबिली. ते करतानाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क राहावा यासाठी आता ते जाहीर भाषणातच आपला मोबाईल क्रमांक कार्यकर्त्यांना देताना दिसले.कार्यकर्त्यांचा तोंडदेखलेपणा, फुका बडेजाव आणि पुढे पुढे करण्याच्या वृत्तीवर अजित पवार तुटून पडताना दिसले. एक आक्रमक आणि दूरदृष्टी असलेला स्पष्टवक्ता नेता अशी प्रतिमा नव्याने निर्माण करू पाहणाऱ्या अजित पवारांकडे ‘खमक्या’ नेता म्हणून पाहिले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेल्या महापालिका-नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य मात्र त्यांच्या जिल्ह्याजिल्ह्यांत सैरभैर झालेल्या फौजेच्या बांधणीवरच अवलंबून आहे.