शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

थकबाकीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:35 AM

आपण लोकप्रतिधी झालो म्हणजे आपल्याला सर्वकाही माफ असते, अशी प्रवृत्ती येत्या काळात वाढीस लागली आहे. काल-परवा नागपुरात वीज बिल थकबाकीसाठी पुढाकार घेणा-या एसएनडीएलच्या कार्यालयात माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात...

आपण लोकप्रतिधी झालो म्हणजे आपल्याला सर्वकाही माफ असते, अशी प्रवृत्ती येत्या काळात वाढीस लागली आहे. काल-परवा नागपुरात वीज बिल थकबाकीसाठी पुढाकार घेणा-या एसएनडीएलच्या कार्यालयात माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी घातलेला धुडगूस व युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांच्या कुटुंबीयांनी एसएनडीएलच्या पथकाला केलेली मारहाण ही याची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. महावितरणतर्फे ‘शून्य थकबाकी’ मोहीम राबवून पहिल्या दोन दिवसातच नागपूर परिक्षेत्रातील १५ हजार ७०२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आला. या सामान्य नागरिकांनी ओरड केली नाही. उलट सोय नसतानाही थकीत बिल भरण्यासाठी पुढाकार घेतला. तर दुसरीकडे नगरसेवकांकडे थकबाकी असल्यामुळे वीज कापण्यास गेलेल्या पथकाला विरोध करीत हल्ले करण्यात आले. पंतप्रधान मोदी जनतेची कशी फसवणूक करीत आहेत हे सांगण्यासाठी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके वाराणशी पर्यंत बाईक रॅली काढतात. तर दुसरीकडे त्यांचेच कुटुंबीय वीज बिल थकवितात व वसुलीसाठी येणाºया पथकावर हल्ला चढवतात. व्यक्तिगत हितापेक्षा सार्वजनिकहिताला प्राधान्य द्या, असे गडकरी, फडणवीस वारंवार सांगतात. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते आपल्या नगरसेवकांची थकबाकी वाचविण्यासाठी यंत्रणेवर दबाव टाकताना दिसतात. हा विरोधाभास न पटण्यासारखा आहे. वीज बिल आकारणीवर कुणाचाही आक्षेप असू शकतो. मात्र, तो आक्षेप कायदेशीर मार्गाने नोंदवायला हवा. त्या विरोधात न्यायालयीन लढा द्यायला हवा. मात्र, आलेले बिल आपल्याला मान्य नाही असे सांगून ते भरणारच नाही, अशी उद्दाम भूमिका घेणे लोकशाहीच्या संस्कारात बसत नाही. लोकहिताची कामे करण्यासाठी आपण राजकारणात आलो, असा कांगावा करणारे नगरसेवक जर स्वत:ची देणी थकविण्यासाठी आपल्याचा राजकीय प्राबल्याचा वापर करीत असतील तर त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का, याचे आत्मचिंतन त्या ‘सेवकांनी’ करण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांकडे हजार रुपयांचे बिल थकीत असले तरी एसएनडीएल लगेच कारवाई करते. सामान्यांच्या विनंतीला काही तासांचीही मुदत दिली जात नाही. तर दुसरीकडे नगरसेवक म्हणून वावरणाºयांकडे तब्बल १० हजारापासून ते ५० हजार रुपयांपर्यंत थकबाकी होईपर्यंत मीटरला हातही लावला जात नाही. एसएनडीएलने सुरुवातीलाच दिलेली सवलत नंतर मग अशी त्यांच्याच अंगावर येते. यापासून यंत्रणेनेही धडा घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र