शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

रंगले या रंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 12:35 AM

रंगाशी नाते सांगणारा एकमेव सण म्हणजे रंगपंचमी़ रंग लावून घ्यायचा आणि इतरांना लावायचाही. माणसांचे चेहरे ओळखता न आले पाहिजेत एवढी रंगाची उधळण. बाहेर रंग खेळायला जाण्यापूर्वी घरच्या देवांवर चिमूटभर रंग टाकून त्याला नमस्कारायचे. एका अर्थाने देवालासुद्धा आपल्यात सहभागी करून घ्यायचे़ केवढा सुंदर विचार.

- डॉ. गोविंद काळेरंगाशी नाते सांगणारा एकमेव सण म्हणजे रंगपंचमी़ रंग लावून घ्यायचा आणि इतरांना लावायचाही़ माणसांचे चेहरे ओळखता न आले पाहिजेत एवढी रंगाची उधळण़ बाहेर रंग खेळायला जाण्यापूर्वी घरच्या देवांवर चिमूटभर रंग टाकून त्याला नमस्कारायचे़ एका अर्थाने देवालासुद्धा आपल्यात सहभागी करून घ्यायचे़ केवढा सुंदर विचाऱ तसे रंगाबद्दलचे बरेच काही घरात वेळोवेळी कानी पडत आले़ माधव शाळेतून खूप उशिरा घरी आला़ वडील धास्तावलेले़ एकदम ओरडले़ ‘तुझे थोबाड रंगवायला पाहिजे’़ म्हणजे थोबाड रंगवतात तर! सणासुदीला विडा खाण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच़ कोणाची जीभ जास्त रंगते याची स्पर्धा हमखास रंगायची़ शकूला पाहायला मुलाकडची मंडळी आली होती़ सुधीरच्या हातातून चहाचा कप पडला नि फु टला़ पाहुणे गेल्यावर बाबा खूपच रागावले ‘सगळ्या कार्यक्रमाचा बेरंग करून टाकला म्हणूऩ’ रंगाचा बेरंगही होतो तर!पावसाळ्यात केव्हा तरी इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान दिसते म्हणतात़ खरेच सांगतो त्यात सातरंग मला केव्हाच दिसले नाहीत़ शाळेत असताना सात रंगांची नावे लक्षात राहावी यासाठी विजयने ‘जातानाही पाणी पी’ असे सूत्र सांगितले होते़ जा-जांभळा, ता-तामडा, ना-नारिंगी, हि-हिरवा, पा-पांढरा, नि-निळा, पि-पिवळा़ तर असे हे सूत्र ‘जातानाही पाणी पी’सुरेश भट नावाचे गजलकार आले नि त्यांनी आपला वेगळा रंग जोपासला़‘रंगूनी रंगात साºया रंग माझा वेगळागुंतुनी गुंत्यात साºया पाय माझा मोकळा’वेगळ्या रंगाचे गारुड तर काही वर्षे आमच्या मनावर अधिराज्य करून होते़ वेगळ्या रंगाची जपणूक करण्यापेक्षा ‘अवघा रंग एक झाला’ हे अद्वैत तत्त्वज्ञान अधिक जवळचे वाटे़ द्वैत काय नि अद्वैत काय? अंतिम घडीला सारेच रंग सरतात़ अण्णा माडगूळकरांनी संपलेल्या मैफिलीचे केवढे सुंदर वर्णन स्वभावोक्ती अलंकारातून केले आहे‘कोन्यात झोपली सतार सरला रंगपसरली पैंजणे सैल सोडूनी अंग’रंगाच्या दुनियेत किती काळ रमायचे? नि रंगायचे? कोणता रंग जीवनाला आत्मतृप्ती देईल की जो लावल्यानंतर सारे रंग विस्मृतीच्या गर्तेत जातील़ शेवटी शरण तुकोबांनाच जायचे़‘रंगले या रंगे पालट न धरी़खेवले अंतरी पालटेना’श्रीकृष्णाच्या रंगात मन रमले की तो रंग पालटत नाही़ ते रूप अंतरी बिंबले की हलत नाही़

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Holiहोळी