शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

परिसे गे सूनबाई...

By admin | Published: October 28, 2016 4:56 AM

‘वाण नाही पण गुण लागला’, ही म्हण रतन टाटा यांनी सपशेल खोटी ठरवली आहे. ‘जेआरडी टाटा’ आणि ‘रतन टाटा’ हे दोन परस्परांपेक्षा पूर्णपणे भिन्न वाण आहेत, हे उभ्या औद्योगिक

‘वाण नाही पण गुण लागला’, ही म्हण रतन टाटा यांनी सपशेल खोटी ठरवली आहे. ‘जेआरडी टाटा’ आणि ‘रतन टाटा’ हे दोन परस्परांपेक्षा पूर्णपणे भिन्न वाण आहेत, हे उभ्या औद्योगिक विश्वाला ठाऊकच होते. मात्र, टाटांच्या विशाल अशा औद्योगिक कुटुंबाच्या प्रमुखपदाची सूत्रे जेआरडी टाटा यांच्याकडून स्वीकारत असताना त्यांच्या ठायीच्या गुणांचाही अंगीकार रतन टाटा यांनी शक्य तेवढा केला असावा, असा जो कयासवजा विश्वास आजवर अनेकांनी मनीमानसी बाळगलेला असेल त्याला रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्या दरम्यानच्या संघर्षमय विसंवादापोटी पूर्णपणे तडा गेलेला आहे. वाण नव्हताच पण गुणही नाहीतच, हेच या सगळ्यांवरून सिद्ध होते. वास्तविक पाहाता, जेआरडी टाटा यांच्याकडून सूत्रे हाती घेतल्यानंतर, तत्कालीन अर्थविश्वाशी सुसंगत अशा पद्धतीने टाटा उद्योग समूहाची पुनर्रचना घडवण्याबाबत जी भविष्यदृष्टी मनाशी जपत रतन टाटा यांनी पावले उचलली होती, तशाच प्रकारची काहीशी पावले उचलण्याचा पवित्रा सायरस मिस्त्री यांनी स्पष्ट करताच सारे प्रकरणच त्यांच्या अंगावर शेकले. रतन टाटा हे ज्यावेळी टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्व बनले त्यावेळी मिठापासून ते मोटारींपर्यंत उद्योग उत्पादनाच्या विविध क्षेत्रांत टाटांची नाममुद्रा कोरलेली होती. जागतिकीकरणाच्या लाटेमुळे पूर्णपणे पालटलेल्या जागतिक औद्योगिक पर्यावरणात पाय रोवून टिकून राहायचे तर प्रत्येकाने आपल्या ‘कोअर कॉम्पिटन्सी’चे संवर्धन एकीकडे करत असतानाच दुसरीकडे नव्याने उदयास येत असलेल्या व्यवसाय क्षेत्रांमध्ये तांब्याभांडे स्थिर करण्याची गरज असल्याची भूमिका स्वीकारत रतन टाटा यांनी टाटांच्या औद्योगिक विश्वाची पुनर्रचना आरंभली. त्या फटक्यात टाटा आॅईल मिलसारखी एक भारदस्त कंपनी खालसा करण्यासही त्यांनी मागेपुढे बघितले नाही. टाटा उद्योग समूहाच्या गाभा क्षमतांच्या परीघावर असणाऱ्या उद्योग क्षेत्रांमधून पाय बाहेर काढत असतानाच, टाटा समूहातील विविध कंपन्यांच्या धोरणात्मक बाबींमध्ये अधिक एकात्मता प्रस्थापित करण्याच्या हेतूने टाटा उद्योग समूहाच्या व्यवस्थापनात्मक संरचनेमागील जेआरडी टाटा यांनी जपलेली मूल्यदृष्टीही रतन टाटा यांनी बेधडक हद्दपार केली. दरबारी सेठ, नानी पालखीवाला, रूसी मोदी, अजित केरकर... यांसारख्या, जेआरडी टाटा यांच्या अमदानीत बळजोर बनलेल्या मनसबदारांना रतन टाटा यांनी नेटाने नेस्तनाबूत केले आणि टाटांच्या औद्योगिक घराण्यावरील आपली पकड घट्ट केली. हे सगळे जेआरडी टाटा यांना मनोमन रुचले असेलच याची खात्री कोणीच देऊ शकणार नाही. सायरस मिस्त्री यांनी असे काहीच केल्याचे गेल्या चार वर्षांच्या त्यांच्या अमदानीत दिसलेले नाही. मात्र, २००८ साली उद्भवलेल्या जागतिक मंदीनंतर मोटारी, पोलाद, हॉटेलिंग यांसारख्या उद्योगव्यवसायांचे भागधेय बदलल्याने जी उपाययोजना आजच्या परिस्थितीत करणे मिस्त्री यांना टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू या नात्याने अनिवार्य वाटले ती मलमपट्टी रतन टाटा यांना मनोमन न पटल्यामुळे मिस्त्री यांची गच्छन्ती झाली असावी, असा कयास माध्यमांद्वारे प्रसृत होत असलेल्या वृत्तांवरून तरी वाटते. वास्तविक पाहाता, वाहननिर्मिती, हॉटेलिंग आणि पोलाद या तीनही उद्योगांची वैश्विक कामगिरी खालावण्यास कारणीभूत ठरते आहे ते अमेरिकी ‘सबप्राइम’ कर्जांच्या फुटलेल्या फुग्यातून प्रसवलेले वित्तीय अरिष्ट. हे कमी नव्हते म्हणून की काय, अथवा त्याच प्रक्रियेचा पुढील अंक म्हणूनही असेल पण आता चिनी अर्थव्यवस्थेची तीन दशकी घोडदौडही एकदमच ढपलेली आहे. परिणामी पोलादासह वेगवेगळ्या प्रकारच्या औद्योगिक कच्च्या मालाची बकासुरी भूक प्रज्वलीत झालेली चिनी अर्थव्यस्थाही जबर मंदावलेली आहे. याचा फटका जगभरातील पोलाद उद्योगाला बसतो आहे. युरोप-अमेरिकेतील बेरोजगारी आणि वाढता दहशतवाद याची आच हॉटेल व्यवसायाला बसते आहे. तेव्हां ज्या हिशेबाने रतन टाटा यांनी त्यांच्या काळात या तीन उद्योगक्षेत्रांमध्ये हनुमान उड्या घेतल्या ते हिशेब ढासळलेल्या वैश्विक अर्थकारणापायी व्यवहारात साकारले नाहीत, याबद्दल सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्त्वावर ठपका ठेवणे अनाठायी ठरते. म्हणजेच, हा सगळा संघर्ष रतन टाटा आणि सायरस मिस्त्री या दोन व्यक्तींमधील ‘केमिस्ट्री’ बिनसल्यामुळे उद्भवला असावा, असे मानण्यास भरपूर जागा आहे. जेआरडी टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा असलेला प्रगल्भ संयम आपल्या अंगी बाणवण्यात रतन टाटा अयशस्वी ठरले. टाटांच्या औद्योगिक कुटुंबातील आता चव्हाट्यावर आलेला हा कलह तुकोबांच्या एका अभंगाची आठवण करून देतो. शरीराने पंढरीला निघालेली परंतु मनाने प्रपंचातच पुरती गुंतलेली एक सासू प्रवासासाठी निघताना ‘‘परिसे गे सूनबाई! वेचू नको दूधदही!!’’ इथपासून रोजच्या कामकाजाबद्दल अगदी बारीकसारीक सूचना सुनेला देण्याचा धडाका लावते. परंतु, त्या सूचनांचे पालन आपली सून आपल्या मागे निगुतीने करीलच याची शाश्वती न वाटल्याने, अखेर, पंढरीला निघालेली ती सासू गावच्या वेशीपासूनच घरी परत फिरते, असे तुकोबा म्हणतात. रतन टाटा यांची अवस्था, बहुधा, त्या सासूसारखीच झाली असावी. सोडू म्हणता सत्ता सोडवत नाही, हेच शेवटी खरे!