शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 6:07 AM

जैतापूरमध्ये जमीन दिलेल्यापैकी २१३ जणांना ‘तुम्हाला त्या वेळी जमिनीचा मोबदला म्हणून जास्त रक्कम देण्यात आल्याने ती रक्कम परत करावी,’ अशा नोटिसा सरकारने ७ वर्षांनंतर पाठविल्या आहेत

- अशोक वालमजैतापूरमध्ये जमीन दिलेल्यापैकी २१३ जणांना ‘तुम्हाला त्या वेळी जमिनीचा मोबदला म्हणून जास्त रक्कम देण्यात आल्याने ती रक्कम परत करावी,’ अशा नोटिसा सरकारने ७ वर्षांनंतर पाठविल्या आहेत. नाणार प्रकल्पातील जमिनीला कितीही मोबदला दिला, तरी कोणत्याही परिस्थितीत जमीनविक्री करण्यात येणार नाही, असा ठाम निर्णय स्थानिकांनी घेतला आहे. कोकणी माणसाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. मात्र, आता कोकणी माणूस सरकारच्या या भूलथापांना बळी पडणार नाही.प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच काही नोकऱ्या दिल्याचा दावा कंपनीने केला आहे. या नोकºया परप्रातीयांना दिल्या आहेत. आमच्या बागांमध्ये काम करण्यासाठी आम्ही १ लाख १३ हजार नेपाळी, उत्तर भारतीय मजुरांना नोकºया देत आहोत. २५ वर्षांच्या एका हापूस आंब्याच्या झाडाच्या माध्यमातून आम्हाला वर्षाकाठी ४० ते ४५ हजार रुपये मिळतात. आम्हाला रोजगार देण्याची गरज नसून, आम्ही इतरांना रोजगार देत आहोत. त्यामुळे एक लाख रोजगार निर्माण होण्याचा सरकारचा दावा आमच्या दृष्टीने हितकारक नाही.नाणार प्रकल्पासारखे प्रकल्प देशहिताचे नाहीत. जागतिक तापमान वाढीला कारणीभूत ठरणाºया या प्रकारचे प्रकल्प जगात कुठेही उभारू नयेत, यासाठी डिसेंबर २०१५ला पॅरिसमध्ये करार झाला. १९६ देशांच्या प्रमुखांनी त्यावर स्वाक्षºया केल्या आहेत. त्यामुळे आमची सर्वप्रथम मागणी पॅरिस कराराचे पालन करावे, ही आहे. या कराराप्रमाणे अशा प्रकारचे प्रकल्प जगभरात कुठेही उभारणे चुकीचे आहे. जम्मू-काश्मीरप्रमाणे कोकण भूमी नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहे. कोकण हे एक नंदनवन आहे. अशा विघातक प्रकल्पांमुळे कोकणची नैसर्गिक साधनसंपत्ती व सौंदर्य नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.या प्रकल्पासाठी १५ हजार एकर जमीन आवश्यक असून, त्यामध्ये १७ गाव प्रकल्पग्रस्त होत आहेत. विशेष म्हणजे, या १७ गावांपैकी १ गाव इकोसेन्सिटिव्ह म्हणून यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. भूकंप रेषा नाणार रिफायनरी प्रकल्प क्षेत्रापासून ५ किमी अंतरावर असलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाखालून जात आहे. या प्रकल्पामध्ये ८० टक्के जमिनीवर साडेबारा लाख आंब्यांची झाडे आहेत. ६ लाखांपेक्षा जास्त काजूची झाडे आहेत. फणस, सुपारीची लाखो झाडे आहेत. करवंदे, रतांबे यासह अनेक झाडांनी बहरलेला हा परिसर आहे. या परिसरात ६ कोटींपेक्षा जास्त जंगली झाडे आहेत. प्रकल्पासाठी ही सर्व झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी १ लाख झाडे लावणार, असे सरकार सांगत आहे, हा मूर्खपणाचा कळस आहे. खोटारडे व फसवे सरकार नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत आहे.१८ मे २०१७ रोजी भूमी अधिग्रहणचा अध्यादेश काढण्यात आला. त्यापूर्वी या परिसरात रिफायनरी प्रकल्प येणार असल्याची माहिती स्थानिक जनतेला नव्हती. मात्र, राजकारणातील नेतेमंडळींना याबाबत ठोस माहिती असल्याने, त्यांनी आपल्या बगलबच्च्यांना पुढे करून, प्रकल्पाची घोषणा होण्यापूर्वीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करण्यास प्रारंभ केला होता. नेतेमंडळींनी आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी या ठिकाणी जमीन खरेदी केल्या. सत्तेमध्ये असलेल्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना गोपनीयतेची शपथ घेतात. मात्र, प्रत्यक्षात त्याचे उल्लंघनच होते. या प्रकल्पाची अधिसूचना काढण्यापूर्वीच जमीन खरेदीचा घोटाळा झाला आहे. मोदी, चांडक, शहा हे कोकणात शेतकरी कसे झाले, याची चौकशी व्हावी. २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्ष आमच्यासोबत आहेत. ७० टक्के जमीन मालकांची संमती असल्याशिवाय प्रकल्प पुढे रेटणे सरकारला शक्य होणार नाही.(लेखक कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष आहेत.)(शब्दांकन : खलील गिरकर)

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्प