शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

बदलत्या राजकीय समीकरणात पवार-ठाकरेंचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:19 PM

मिलिंद कुलकर्णी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शनिवार, दि.१५ रोजी ...

मिलिंद कुलकर्णीमाजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शनिवार, दि.१५ रोजी खान्देश दौऱ्यावर येत आहेत. दोघे प्रथमच एकत्र खान्देशात येत असून स्वतंत्र कार्यक्रमदेखील त्यांनी स्वीकारले असल्याचे आतापर्यंत प्राप्त झालेल्या दौºयावरुन दिसून येत आहे.पवार यांचे बंधू पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार यांच्या नावाने जळगावचे जैन इरिगेशन आणि भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार देण्यात येतो. प्रतिष्ठीत असलेल्या या पुरस्कारासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांची निवड करण्यात येते आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि पवार हे उपस्थित असतात, हा पायंडा आहे. तो यंदाही पाळला गेला. गेल्यावेळी पवार होते, परंतु, फडणवीस यांनी दांडी मारली होती.मुक्ताईनगरला शेतकरी मेळाव्यात हे दोन्ही नेते एकत्र असतील. शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद््घाटन त्यांच्याहस्ते होईल. दोन्ही कृषी क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम आहेत. पवार हे कृषीमंत्री होते. महाराष्टÑाचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात शेतीविषयक चांगले निर्णय झाले. शेतकºयांना आधुनिक शेतीसाठी तंत्र आणि मंत्र त्यांनीच दिला. शेतकºयांचा माल निर्यात व्हायला हवा, यासाठी ते आग्रही असतात.मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष असले तरी त्यांना राष्टÑवादीने पुरस्कृत केले होते. मात्र ते मूळ शिवसैनिक आहेत. अनेक वर्षे जिल्हाप्रमुख होते. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत ते सेनेचे उमेदवार असताना ठाकरे त्यांच्या प्रचारासाठी आले होते. यंदा युती असल्याने एकनाथराव खडसे यांच्या कन्येच्या विरोधात अपक्ष म्हणून ते उभे राहिले आणि निवडून आले. दोघांच्या दौºयामागे ही राजकीय पार्श्वभूमी आहे.पवार-ठाकरेंचे दोन स्वतंत्र कार्यक्रमदेखील आहेत. पवार हे चोपडा येथे तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या सुतगिरणीचे चेअरमन हे माजी आमदार कैलास पाटील हे आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा पराभव करुन आमदार झालेले हेच ते कैलास पाटील. चोपड्यातील अरुणभाई गुजराथी आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यात आघाडीवर असलेल्या पाटील यांनी काँग्रेस, भाजपची मदत घेत नगरपालिकेसह काही संस्था ताब्यात घेतल्या होत्या. हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे प्रा.चंद्रकांत सोनवणे हे निवडून येत आहेत. परंतु, सोनवणे आणि पाटील यांच्यात वितुष्ट आले. आणि यंदाच्या निवडणूक काळात कैलास पाटील आणि इंदिराताई पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली.या सुतगिरणीचे उद्घाटन उध्दव ठाकरे यांच्याहस्ते व्हावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील असलेले पाटील हेच आता सेनेत नसल्याने मुख्यमंत्री असूनही ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. आणि पवार यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होत आहे. राजकारण याला म्हणतात. सेनेतील अंतर्गत राजकारणाची किनार या कार्यक्रमाला राहील, हे निश्चित.तिकडे नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री ठाकरे हे पालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘शिवबंधन’ बांधले. अक्कलकुवा-धडगावचे सेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांच्यामागे पाठबळ उभे केले. ठाकरे यांची सभादेखील झाली. पण थोड्या मतांनी पाडवी पराभूत झाले. पण शिवसेनेचे अस्तित्व यानिमित्ताने नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झाले. अलिकडे झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ७ जागा जिंकून किंगमेकर ठरलेल्या सेनेची दखल काँग्रेस आणि भाजपला घ्यावी लागली. रघुवंशी यांचे हे यश आहे, म्हणून ठाकरे यांच्या दौºयाला महत्त्व आहे.पवार हे चोपडा येथे साखर कारखान्याच्या उद्घाटनासाठी सुमारे २५ वर्षांपूर्वी आले होते. धोंडूअप्पा पाटील यांनी चहार्डीत हा कारखाना उभा केला होता. शेतकºयाच्या कुटुंबाचा विस्तार आणि शेती ़क्षेत्राचा होणारा संकोच लक्षात घेऊन शेतकºयांच्या कुटुंबातील काही मुलांनी पूरक व्यवसाय, नोकरी याकडे वळायला हवे, असे आवाहन पवार यांनी केले होते. पवार हे द्रष्टे नेते आहेत, शेतीची बिकट अवस्था त्यांनी २५ वर्षांपूर्वी ओळखून शेतकºयांना जागे करायचा प्रयत्न केला. आज तर आणखी बिकट स्थिती आहे. कृषी विद्यापीठे आणि महाविद्यालये आहेत, पण तीदेखील शेती आणि शेतकºयाला मार्गदर्शन करण्यात, या परिस्थितीतून बाहेर काढण्यात कमी पडत आहेत, हे वास्तव आहे.तीच अवस्था सहकार क्षेत्राची आहे. पवारांनीच उद्घाटन केलेल्या चोपडा साखर कारखान्याची अवस्था दयनीय आहे. मधुकर कारखानादेखील यंदा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न सुरु आहे. खडका, नगरदेवळा या सुतगिरण्या कधीच बंद पडल्या.शेती आणि सहकारासाठी हे दोन्ही नेते काय भूमिका घेतात, याकडे आता खान्देशचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव