- विनायक पाटील
वडणुका सुरू होण्यापूर्वी मी लेख लिहिला होता, त्यात असे विधान केले होते, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून नेते भाजप-सेनेत जात आहेत. हे खरे असले, तरी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात पवार-वेळ नावाचा एक कालावधी असतो आणि तो कालावधी निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुरू होतो आणि सरकार स्थापन होईपर्यंत राहतो. निकाल जाहीर झाला आहे.
भारतात आणि महाराष्ट्रात आता नावापुरतेही विरोधक उरले नाहीत, असे गृहित धरून भाजप आणि सेना वक्तव्य करीत होती व वागतही होती. आपला अश्वमेधाचा वारू आता कोणीही अडवू शकणार नाही, या भ्रमात ते होते. अशा अवस्थेत कार्यकर्ते गाफील राहतात. नेते स्वप्नरंजनात राहतात. आपण सांगू ती पूर्व, आपण ठरवू ते धोरण, आपण देऊ ते उमेदवार, असा पक्ष चालतो. तसा तो चालला. येईल त्याला प्रवेश देण्याचा सपाटा लावला. त्यात आपण ज्यांना गेली अनेक वर्षे भ्रष्ट आणि कूचकामी म्हणत होतो, त्यांचाही समावेश करीत आहोत, याचा नेत्यांना विसर पडला, परंतु मतदारांनी ते लक्षात ठेवले. भावनिक विषयांवर लोकसभेच्या दोन निवडणुका जिंकल्या.
भावनात्मक निर्णयांनी पोट भरत नाहीत, हे समजायला काही कालावधी जावा लागतो. तो गेला आहे. प्रत्यक्षात हाती असलेल्या नोकऱ्या लोक गमावत होते, आणि जाहीरनाम्यात आणखी १ कोटी लोकांना आम्ही नोकरी देऊ अशा आश्वासनांचा परिणाम होत नाही. म्हणून अशी वचने वाºयावरची वरात ठरतात. अश्वमेधाचा वारू थांबविण्यासाठी महाराष्ट्रात पन्नास वर्षांपासून सत्तेच्या प्रांगणात असलेल्या शरद पवार नावाच्या बलदंड आणि जनतेशी नाळ जुळलेल्या आणि मातीत पाय रोऊन उभ्या असलेल्या नेत्याला कमी लेखून राजकीय गणिते आखली गेली. त्यामुळे शंभरपेक्षा अधिक संख्या असलेला एक अनुभवी गट विरोधात आहे, याचा विसर पडता कामा नये. पवार वेळेपैकी फक्त अर्धा वेळ संपला आहे. अजून अर्धा उरला आहे, तो महत्त्वाचा आहे. सत्तेचे गणित कशाही प्रकारे मांडता येऊ शकते.
पवार साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन सत्तेत येण्याचा सूतराम विचार नाही, असे विधान केले आहे, तसेच सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन धोरण ठरवू, असेही ते म्हणाले. काय ठरेल, तेही महत्त्वाचे ठरणार आहे. कालावधी ५ वर्षांचा आहे. लोकमत जलद गतीने विरोधी जात आहे. नंबर गेम म्हटला, तर अनुकूल आहे. अति महत्त्वाकांक्षी सहकाºयाच्या भरवशावर तो टिकवायचा आहे. ही केवळ सुरुवात आहे. गालीब साहेबांच्या भाषेत सांगायचे तर ‘आगे आगे देखिए होता हैं क्या!’ अशी अवस्था आहे. या शेरचा स्वैर अनुवाद असा आहे, ‘अरे वेड्या रडतोस काय, ही तर केवळ सुरुवात आहे, पुढे काय काय वाढून ठेवले आहे, ते तू पाहतच राहा.’
राजकारणातील पवार वेळेचा प्रखर काळ आहे. ‘आगे आगे देखिए होता हैं क्या’
भारतात आणि महाराष्ट्रात आता नावापुरतेही विरोधक उरले नाहीत, असे गृहित धरून भाजप आणि सेना वक्तव्य करीत होती व वागतही होती. आपला अश्वमेधाचा वारू आता कोणीही अडवू शकणार नाही, या भ्रमात ते होते. अशा अवस्थेत कार्यकर्ते गाफील राहतात. नेते स्वप्नरंजनात राहतात. (लेखक माजी मंत्री आहेत.)