- डॉ. भूषण कुमार उपाध्यायभा.पो.से.हे विश्व पंच महाभूतांपासून बनलेले आहे. हे पंच महाभूत आहेत- पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. या पाचही महाभूतांचे आपले-आपले गुण आहेत. पृथ्वीमध्ये गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे पाच गुण आढळतात. शेवटी पृथ्वी सर्वात जास्त स्थूल आहे. दुसरे महाभूत जल हा पृथ्वीपेक्षा कमी स्थूल आहे, कारण त्याच्यात पृथ्वीपेक्षा एक गुण कमी आहे आणि तो गुण आहे गंध. पाण्यामध्ये चारच गुण आढळतात. या चार गुणांमध्ये रस गुण अग्नी या महाभूतामध्ये आढळत नाही. त्यामध्ये फक्त तीनच गुण आहेत. अग्नीच्या तीन गुणांपैकी रूप गुण वायू या महाभूतामध्ये आढळत नाही. या प्रकारे वायूच्या दोन गुणांपैकी स्पर्श गुण आकाश या महाभूतामध्ये आढळत नाही. आकाश यामध्ये केवळ एकच गुण आढळतो आणि तो आहे शब्द. जेव्हा आपण खालीपासून वरपर्यंत जातो तेव्हा असे समजून येते की गुण हळूहळू कमी होत जातात आणि हे पंच महाभूत हळूहळू स्थूलवरून सूक्ष्म बनत जाते. जर आपण वरून खालीपर्यंत येतो, तेव्हा ही प्रक्रिया उलटी होते आणि गुण वाढत जातात आणि महाभूत देखील सूक्ष्मवरून स्थूल होत जाते.या पंच महाभूतांचा अनुभव घेण्यासाठी निसर्गाने आपल्याला पाच इंद्रिये दिली आहेत. कान हे इंद्रिय आकाश तत्त्वापासून बनलेले आहे. ते केवळ ऐकण्याचे काम करते. ऐकण्याचा संबंध हा शब्दांशी आहे. त्वचा ही वायूच्या स्पर्शगुणातून बनलेली आहे. म्हणून ती स्पर्शाचा अनुभव करते. डोळे हे अग्नीच्या रूप गुणापासून बनलेले आहेत. त्यामुळे त्यामध्ये चमक आहे आणि ते पाहण्याचे काम करतात. जीभ ही जलच्या रसगुणातून बनलेली आहे. म्हणून ती रसाचा आस्वाद घेत असते. याप्रकारे घाणेंद्रिय म्हणजेच नाक हे पृथ्वीच्या गंधगुणातून बनलेले आहे. जेणेकरून ते गंध/वास घेण्याचे काम करते.आपल्या पाचही इंद्रियांचे कार्य हे निसर्गाद्वारे पूर्णपणे मर्यादित केले गेले आहे. शेवटी एक इंद्रिय दुसºया इंद्रियाचे काम करू शकत नाही. यामुळेच या इंद्रियाद्वारे प्राप्त अर्जित अनुभव मर्यादित असतात. जरी ही इंद्रिये पंच महाभूतांपासून बनलेली असली तरी शेवटी ती मर्त्य आहेत. भारतातील रहस्यवाद्यांनी या भौतिक जगाच्या पलीकडे देखील एका शक्तीचा अनुभव केला जो आपल्या इंद्रियांचा विषय नाही. त्या इंद्रियांच्या पलीकडील शक्तीला आपल्या तत्त्वज्ञांनी दैवी म्हटले आहे. ही दैवी शक्ती निर्माणदेखील होत नाही आणि नष्टदेखील होत नाही. ती पूर्णपणे सर्वव्यापी आहे आणि साºया भेदांपासून वर आहे.
भौतिक आणि दिव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:12 AM