शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

पीतरौ रक्षति स पुत्र:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:25 AM

आजकाल एकच मुलगा, एकच मुलगी, दोन मुली, एक मुलगा व एक मुलगी असे काहीसे चित्र समाजात आढळून येते, तेव्हा निवृत्तीनंतर म्हातारपणी कसे होईल याची काळजी करताना बरेच लोक दिसतात.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारआजकाल एकच मुलगा, एकच मुलगी, दोन मुली, एक मुलगा व एक मुलगी असे काहीसे चित्र समाजात आढळून येते, तेव्हा निवृत्तीनंतर म्हातारपणी कसे होईल याची काळजी करताना बरेच लोक दिसतात. काहींना तर अपत्यच नसतात. माझ्या माहितीतील काकू सध्या ८५ वर्षाची आहे. तिला पाच मुली व दोन मुले आहेत.४० वर्षापूर्वी काकूकडे लक्ष्मीची भरभरून कृपा होती. मुलामुलींचे लग्न थाटामाटात झाले. दोन मुले अती श्रीमंतीमुळे काही व्यवसाय न करताच घरी बसले. काकांचे निधन झाले. आज परिस्थिती संपूर्ण बदलली. काकूजवळचे होते नव्हते ते मुला व मुलींनी आपसामध्ये वाटून घेतले व काकू लंकेची पार्वती झाली.आता मुलांनी काकूला घराबाहेर काढले. काकू रस्त्यावर आली. लाजेखातर दूरच्या नातेवाईकाने ठेवून घेतले. जावई अब्जोपती पण एकही मुलगी न्यायला तयार नाही. दोन्ही मुलांनी काकूसाठी घराचे दरवाजे कायम बंद केले. याविपरीत, माझा सध्या ५५ वर्षे वयाचा मित्र अमेरिकेत स्थायिक होता. म्हाताºया आईसाठी संपूर्ण परिवारासहित अमेरिकेतून सगळे सोडून भारतात आला. आता म्हाताºया आईची सेवा करतो. गांधारीला शंभर कौरव व कुंतीला पाच पांडव. मुलगा असावा की मुलगी, किती मुले किती मुली असाव्या, श्रीमंत जावई की गरीब जावई, मुलगा आणि सून शिकलेली की अशिक्षित असावी, कोण देईल म्हातारपणी काठीला आधार? कोणते महत्त्वाचे घटक ! काय असावा निकष! कसे असावे संस्कार? अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना शिकलेले आॅप्टीमायझेशनचे तंत्र लावून पाहिले पण व्यर्थ ! सगळे गणिताचे सूत्र लावले मात्र उत्तर काही सापडले नाही पण चाणक्य सूत्र म्हणते,दुर्गते: पीतरौ रक्षति स पुत्र:म्हणजेच मनाला शोक देणारे आणि हृदयाला व्यथा देणारे अनेक पुत्र असूनही काय लाभ? कुळाला आधार देणारा व वाईट परिस्थितीत सुद्धा आईवडिलांचे रक्षण व पोषण करणारा एकच सुपुत्र असला तरी पुरेसे आहे. या एकाच सुपुत्रामुळे परिवार आनंदी व सुखी होतो.

टॅग्स :Familyपरिवार