घटना पहिली : पहाटे पहाटे पोलीस ठाण्याच्या फोनची रिंग वाजली, तेव्हा अंमलदार दचकून जागे झाले. फोन उचलताच तिकडून घाबऱ्याघुब-या आवाजात शब्द आदळले, ‘साहेबऽऽ इकडं लवकर या. इथं मर्डर झालाय अन् दरोडाही पडलाय.’ अनपेक्षित दोन मोठी कलमं कानावर पडताच अंमलदार कामाला लागले. पोलीस गाड्या घटनास्थळी धावल्या.बंगल्याचा दरवाजा सताड उघडा. आतमध्ये सामान अस्ताव्यस्त पसरलेलं. एका वृद्धेचा मृतदेह पडलेला. मात्र, कुठंच रक्त नव्हतं. पंचनामा करून डेडबॉडी पोस्टमार्टेमला पाठविली. घरमालकाच्या तक्रारीनुसार सुमारे पन्नास-साठ तोळं सोनं लुटलं गेलेलं. मात्र, पोस्टमार्टेमचा रिपोर्ट येताच पोलीस खातं चक्रावलं; कारण आजीबाईचा मृत्यू म्हणे हार्टअटॅकनं झालेला. मारहाणीचा उल्लेख नव्हता.पोलिसांनी चोरट्यांना पकडून मुद्देमाल जप्त केला. ‘प्रेस कॉन्फरन्स’मध्ये जाहीर केलं गेलं की, सोनं अन् रोख रकमेसोबतच एक प्लास्टिकची पिशवीही चोरट्यांकडं सापडली. जणू पोलिसांसाठी पिशवी हस्तगत करणं, हीच मोठी कामगिरी होती. मीडियावाल्यांनाहीे खरी ब्रेकिंग न्यूज मिळालीे. त्या पिशवीवर फटाऽऽफट फ्लॅश चमकले.पालिकेची टीमही पाच हजारांची पावती घेऊन खुशीत पुढं सरसावली. खरा मुद्देमाल मात्र बाजूलाच पडला. एका पत्रकारानं विचारलं, ‘पण त्या आजीबाईच्या मृत्यूचं कारण काय?’ तेव्हा अधिकारी गंभीरपणे कुजबुजला, ‘प्लास्टिकसोबतच तिच्या गादीखालची एकुलती एक कापडाची पिशवीही चोरट्यांनी पळविली म्हणून तिला मोठा धक्का बसला.’घटना दुसरी : आज ठुमीला बघायला पाहुणे मंडळी येणार होती. आजपर्यंतची सर्व स्थळं तिच्या घरच्यांनी स्पष्टपणे नाकारली होेती. ठुमीच्या बापाला जावयाचं घराणं खानदानी अन् शेतीवाडीवालं पाहिजे होतं. मात्र, हुंडा द्यायची इच्छा नव्हती. ठुमीच्या आईला जावई एकुलता एक हवा होता... तर ठुमीला स्मार्ट नवरा पुण्यात नोकरी करणारा अन् आई-वडिलांपासून दूर राहणारा हवा होता.आज येणारे पाहुणे मात्र वेगळे अन् मोठे असावेत. त्यांच्यासाठी केली जाणारी वेगळी सरबराई शेजाºयांच्याही लक्षात येत होती. अखेर घरासमोर खटारा रिक्षा येऊन थांबली. पाहुणे खाली उतरले. मात्र, सगळ्यांच्या अंगावर चुरगाळलेली कापडं.बघणं झालं. पोहे झाले. मुलाच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं, ‘माज्या पोराला तीन भैनी आन चार भौ हायती. आमी संमदीजण पत्र्याच्या घरामंदी राहतूया. आमचं पोरगंबी जिंदगीभर आमच्या संगटच राहणार. आमची शेतीवाडी-बिडी नाय. चौकातल्या कॉर्नरवरती येक टपरी हाय. पसंत आसल तर सांगा. फकस्त धा लाखाचा हुंडा पायजे.’ ठुमीच्या बापानं हात जोडत सांगितलं, ‘आम्हाला तुमचं स्थळ पसंत.’ मग बैठकीतच सुपारी फुटली.पाहुणे गेले. शेजारच्या रमाकाकूंनी आत येत विचारलं, ‘एवढ्या झटपट लग्न कसं काय ठरविलं ? मुलगा आयटी-बियटी आहे की काय?’ तेव्हा ठुमीच्या आईनं मोठ्या ठसक्यात सांगितलं, ‘त्याचं किन्हईऽऽ रद्दीचं दुकान आहे. रोज पाचशे कागदी पुड्या बनवितो म्हणे तो.’(२ंूँ्रल्ल.्नं५ं’‘ङ्म३ी@’ङ्म‘ें३.ूङ्मे)
वो प्लास्टिक की कश्ती..
By सचिन जवळकोटे | Published: June 28, 2018 5:36 AM